• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २२ डिसेंबर, २०१५

    अनधिकृत बिनशेती वापरा बाबत करावयाच्या कार्यवाहीचा नमुना.

                                          आपले साज्या अंतर्गत अनेक वेळा शेतजमिनी वर अनधिकृत, विना परवाना  वाणिज्य किवां औद्योगीक वापर केला जातो. अशा प्रकारचे अनधिकृत , विनापरवाना बिनशेती वापरात बदलाची प्रकरणे आढळुन आल्यावर त्यावर तलाठी या नात्याने कशा प्रकारे अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा या बाबतचा नमुना श्री. शशिकांत सानप तलाठी .पनवेल जि.रायगड यांनी उदाहरणा दाखल तय्यार केला आहे. तो मिळविण्या साठी खालिल लिंक चा वापर करा.

       

    १८ डिसेंबर, २०१५

    तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका.

                            तलाठी हा महसुल प्रशासनाचा कणा मानला जातो. शासनाच्या स्टील फ्रेम प्रशासनाचा  तो गतिमान घटक आहे . नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी  मा. श्रीकर परदेशी सर यांनी या घटकाचे महत्व ध्यानात घेवुन तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांना प्रशिक्षण देवुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले. व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली.                                                                                                    हे पुस्तक सोप्या सहज भाषेत असल्याने ती सर्व तलाठी याना उपलब्ध व्हावी म्हणुन त्या संकलित पुस्तकाची soft copy नांदेड जिल्हातील तलाठी श्री दुगमवार तलाठी देगलुर यांनी उपलब्ध करुन दिली आहे. सदर पुस्तक pdf डाउनलोड करण्याची लिंक  खाली आहे. तरी सर्वांनी याचा फायदा करुन घ्यावा.या पुस्तकाचे सर्व श्रेय तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर व त्यांचे तत्कालीन अधिकारी यांना जाते.

                                 




    १३ डिसेंबर, २०१५

    ७/१२ सदरी बिनशेती नोंद व ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती.

    • मा.जिल्हाधीकारी , मा.अप्पर जिल्हाधीकारी, मा, उपविभागीय अधिकारी  ई  वरिष्ठ कार्यालयातुन आपनास बिन शेती (N.A) आदेश प्राप्त होत असतात .त्याची नोंद आपले ७/१२ सदरी कशी करावी सर्वप्रथम काय कार्यवाही करावी याची माहीती साठी  व  
    • अनेक वेळा तलाठी यांना म.ज.म.अधि.१९६६ चे कलम ८५ अन्वये आदेशची अंमलबजावणी करतांना , न्यायालयीन आदेशा नुसार शेत जमिनीच्या सहधारकां मध्ये वाटणीची नोंद घेतांना संबंधीत व्यक्तीचे क्षेत्रा नुसार  आकार वेगळा दर्शविने व गा.नं. ८अ सदरी नोंद करावी लागते. त्यानुसार  ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती साठी खाली दर्शविलेल्या दुव्यावर जावुन मिळवा 
    लेखक - मा .श्री. डॉ. संजय कुंडेटकर सर.            उपजिल्हाधिकारी सातारा.


    १ डिसेंबर, २०१५

    उत्तराधिकार अधिनियम १९५६ - महत्वाच्या तरतुदी.

    वारसा बाबत फेरफार घेतांना आपनास बऱ्याच अडचणी येते असतात  त्या अडचणी सोडवण्यासाठी मा. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तयार केलेल्या माहीतीचा आपनास फायदा होईल.
    • वारसदार म्हणजे काय व कोण ?
    • उत्तराधिकारी हेाण्यास पात्र व्यक्ती कोण ?
    • वारसाचे वर्ग किती व त्यात समाविष्ठ व्यक्ती कोणत्या ?
    • वर्ग १,२,३,४ चे वारस कोण ?
    • वारसा हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोणत्या ?
    • महत्वाये न्याय निर्णय.
    • भारतीय वारसा अधिनियम १९२५ मधिल महत्वाच्या तरतुदी.
    • एकत्र कुटूंबातील मिळकतीचे वाटप. ईत्यादी संपुर्ण माहीती साठी खालील लिंक चा वापर करा.