• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    अकृषक वापर धोरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    अकृषक वापर धोरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    ११ फेब्रुवारी, २०२६

    अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत.

      

     
     शासनाने दिनांक 10.०२.२०२६ च्या शासन निर्णया नुसार या पुढे राज्य सरकारने अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे शासन निर्णया नुसार आता अकृषक वापरा साठी सनद ,अकृषक परवानगीची आवश्यकता नसेल. सरळ online प्रणाली द्वात्रे नियोजन प्राधिकरण यांचे कडे अर्ज करून थेट अकृषक व बांधकाम परवानगी नियमा नुसार मिळेल .
          तसेच या पुढे आता दरवर्षी अकृषक कराचा भरणा करण्याची गरज नसेल त्या ऐवजी एक वेळ अधिमुल्य भरावे लागेल हे अधिमुल्य रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे १००० चौ मी पर्यंत दाराच्या 0.10% , १००० ते ४००० चौ मी पर्यंत 0.२५% आणि ४००० चौ मी चे वर 0.५०% एवढा असेल.. हे दर ०१.०१.२०२६ पासून अकृषक वापराबाबत असेल 
        या आधी २००१ पूर्वी झालेले अकृषक भूखंडा साठी २००१ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील व २००१ नंतर  झालेले अकृषक भूखंडा साठी २००२ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील. यात शासन निर्णय दिनांकापासून मागील थकीत अकृषक करास सूट दिली आहे. परंतु शासन निर्णय दिनांकापासून एक वर्षात वरील नमूद दराने एक वेळ अधिमुल्य भरणे आवश्यक आहे एक वर्ष झाल्यावर त्या अधिमुल्यावर व्याज व दंड आकारला जाणार आहे.


    लेख व प्रकाशन 

    कामराज ब चौधरी   
    ग्राम महसूल अधिकारी पुसद 
    ता पुसद जिल्हा यवतमाळ 




    १३ ऑक्टोबर, २०१८

    महसुली कायद्यात वसुली अनुषंगाने झालेल्या सुधारणा

    महसूल विभागाच्या निर्मिती ही शासनास महसूल (वित्त) मिळवून देण्या करीता झाली आहे .त्या नुसार महसूल विभागामध्ये महसूल वसुली साठी अनेक नियम केलेले आहेत .त्या नियमात शासन आवश्यकते नुसार वेळोवेळी बदल करत असते अश्याच मागील 2 ते 3 वर्षात ह्या वसुली नियमात झालेले बदला बाबत विस्तृत माहिती बाबत श्री शशिकांत जाधव नायब तहसिलदार सावंतवाडी यांनी तयार केली आहे ती pdf स्वरूपात मिळवण्या साठी खालील लिंक चा वापर करा.

    लेख 
    श्री शशिकांत जाधव नायब तहसिलदार सावंतवाडी
    संकलन
    कामराज चौधरी तलाठी पुसद खंड 1 जिल्हा यवतमाळ



    १९ एप्रिल, २०१८

    गावठाण हद्यीपासुन २०० मी परिघीय क्षेत्रास अकृषक बाबत कार्य पध्दती.


                                        
                         गावाच्या ,नगराच्या ,शहराच्या हद्यीपासुन २०० मी आतील क्षेत्रातील जनतेस अकृषीक वापराची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधिल कलम ४२ ड नुसार गावठाणाच्या २००मी हद्यीपासुन परिघीय क्षेत्राातील जमीन अकृषक रुपांतरणासाठी खालील प्रमाणे तरतुद करण्यात आली आहे.