- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
७ डिसेंबर, २०१७
महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 42 ते 45 मधिल सुधारणा
महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 42 ते 45 मध्ये गेल्या 4 वर्षात अनेक सुधारणा केल्या आहेत.नगर परिषद परिसर येेेेथे शासनाने विकास योजने अंतर्गत क्षेत्र निश्चीत करुन अकृषक वापर करणे बाबत धोरण ठरविले आहे.ज्या ठिकाणी विकास आराखडा अंतीम रित्या प्रसिध्द झाला नाही त्या साठीचे धोरण .त्या सर्व सुधारणा बाबत काय कार्यवाही करावी यांची माहीती सर्व महसुल अधिकारी,कर्मचारी,तलाठी,नागरीक यांना व्हावा या साठी सर्व सुधारणांचे PDF कॉपी खालील लिंक वर ठेवण्यात आल्या आहे.
* संकलन*
२८ ऑक्टोबर, २०१७
विभागीय दुय्यम सेवा परीक्षा नमुना उत्तर पत्रिका (ssd notes)
तलाठी संवर्ग सेवा प्रवेश केल्यानंतर सेवेत कायम होणेसाठी 4 वर्षात 3 संधीत विभागीय दुय्यम सेवा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.त्यानुसार शासन निर्णया नुसार दरवर्षी सप्टेंबर / ऑक्टोबरमध्ये सदर परीक्षेचे आयोजन प्रत्येक जिल्हावार होत असते नवीन तलाठी यांना सदर परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही किंव्हा परीक्षेचे स्वरूप माहिती होत नाही. या साठी आपले महसूल मित्र श्री मोहसीन शेख तलाठी ता.कर्जत जिल्हा अहमदनगर यांनी विभागीय दुय्यम सेवा परीक्षेच्या सर्व 1 ते 4 पेपरच्या नमुना उत्तर पत्रिका तयार केल्या आहे. त्या आपल्याला खलील पेपर क्रमांक नुसार लिंक वरून pdf स्वरूपात डाउनलोड करता येईल
- प्रश्न पत्रिका क्र 1 म ज म अधि.वरील नियम
- प्रश्न पत्रिका क्र 2 तगाई ,मु पो अधि,ग्राम पंचायत इ
- प्रश्न पत्रिका क्र 3 म ज म अधि खंड 4
- प्रश्न पत्रिका क्र 4 संकीर्ण बाबी
लेख
महसूल मित्र श्री मोहसीन शेख तलाठी ता.कर्जत
४ ऑगस्ट, २०१७
नविन खाता मास्टर पुर्व तयारी software फाईल
खाता मास्टर मध्ये दुरुस्ती साठी आपनास खात्याची पुर्व तयारी करावी लागेल .त्यात समान आलेली नावे,नावातील स्पेलींगमध्ये चुका ई. शोधावे लागेल. त्यासाठी आपनास Excel sheet मध्ये सदर Data घ्यावा लागतो व वरिल कार्यवाही करावी लागते. ती पुर्वतयारी अधिक सुलभ व्हावी या करिता आपनासर्वां साठी New Data arrange software Split file श्री इकबाल मुलाणी तांत्रीक सहाय्यक यांनी तयार केले आहे.हे सॉफ्टवेअर वापरुन आपन अगदी कमी वेळात खाता मास्टर पुर्व तयारी अचुक तय्यार करु शकाल.
ई-फेरफार किंवा रिएडीट मधून जी ८अ ची यादी आपण खाते विभागणी व एकत्रीकारणासाठी
वापरत होतो त्याच यादीचा उपयोग करून आपण Split_Final मध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने उत्कृष्ट
प्रतीचे काम करू शकतो. आपणास हस्तलिखित अभिलेखामध्ये खातेदारांच्या नावांमध्ये
नजरचुकीने झालेल्या संपूर्ण चुका लक्षात येतील. व खाते विभागणी व एकत्रीकारण कामात
अत्यंत सुलभता येते.
-
१) जी ८अ ची यादी सॉर्ट करून आपण खाते विभागणी व एकत्रीकारणासाठी वापरात होतो या यादीमधील १.खाते क्रमांक व २. खातेदारांच्या नावांची संपूर्ण गावाची यादी कॉपी करून Split_Final फाईल मधील Sheet1 मध्ये दिलेल्या कॉलम मध्ये नमुन्यासाठी दिलेला (फक्त खातेदारांचा डाटा सिलेक्ट करून डीलीट करून) पेस्ट करा. व (खातेदारांची यादी Split करणेसाठी येथे क्लिक करा.) या बटनवर क्लिक करा ......... आणि Sheet2 पहा.२) Sheet 2 मध्ये खाते क्रमांक A कॉलम ला पेस्ट करा.फक्त इतकंच काम करून आपणास असे लक्षात येईल कि आपल्या गावामधील सर्व डुप्लीकेट असलेली खाती Sheet2 मध्ये लाल रंगामध्ये दिसून येतील. ते पाहून पुढील कार्यवाही करावी.
Created By
श्री इकबाल मुलाणी. तांत्रीक सहाय्यक,
कोरेगांव जि.सातारा
Published By
कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ
ckamraj@outlook.com
www.talathiinmaharashtra.in
३० जुलै, २०१७
खाता मास्टर व RE-Edit मार्गदर्शक PPT
DILRMP प्रकल्पांतर्गत हस्तलिखीत 7/12 व संगणीकृत 7/12 जुळविणेचे दुष्टीने चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत 7/12 तपासणी माहीमेस प्रारंभ झाला व त्यातुन निघणा-या त्रुटीच्या दुरुस्ती साठी खाता मास्टर व रिएडीट प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. त्या प्रणालीत कशा प्रकारे काम करावे या साठी राज्य समन्वयेक ई-फेरफार प्रकल्प व महाराष्ट्रातील अनेक तलाठी यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या PPT फाईल सर्व तलाठी यांना खालील लींंक वरुन उपलब्ध करुन घेता येेेेईल.
- Re_edit_ODC_VC Training PPT 11.07.2017.pptx मा रामदास जगताप,राज्य समन्वयेक ई-फेरफार प्रकल्प
- Reedit च्या अगोदर खाता मास्टर क्लीयर करणेसाठी पुर्वतयारी. विपीन उगलमुगले तलाठी कोल्हापुर
- री एडीट मोड्युल पुर्व तयारी प्रत्यक्ष कामकाज करतांना घ्यावयाची काळजी. सचिन जगताप तलाठी जळगांंंवव
- खाता मास्टर दुरुस्ती व गा.न.8अ जुळविणे. जे.डी.बंगाळे तलाठी जळगांव
- री एडीट मोड्युल आज्ञावली मार्गदर्शक सुचना. शशिकांत सानप.तलाठी पनवेल
- खाता मास्टर दुरुस्ती. विठ्ठल बडगुजर तलाठी परभणी
- Re-Edit user manual pdf.
- संकलन
- कामराज चौधरी तलाठी पुसद जि.यवतमाळ
२४ जुलै, २०१७
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2017
संपूर्ण देशात एकाच प्रकारचा पीक विमा असावा या साठी सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे . त्यानुसार पिकाच्या एकूण जोखिम स्तराच्या 2% प्रीमियम भरावे लागेल उदा.सोयाबीन पिकास जोखीम स्तर 40000 रु आहे त्याचा प्रीमियम 800 रु आहे . सदर पीक विमा या वर्षी महा ई सेवा केंद्रात सुद्धा भरता येईल अधिक माहिती साठी खालील माहीती पत्रक पहा.
संकलन
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
१८ जुलै, २०१७
Re-edit खाता मास्टर पुर्व तयारी Data arrange software
DILRMP प्रकल्पांतर्गत हस्तलिखित 7/12 व संगणीकृत 7/12 जुळविणेचे दृष्टीने आपन Edit Module वापरुन 7/12 मधिल दुरुस्ती केल्या आहे. त्यानंतर चावडी वाचनामध्ये आढळुन आलेल्या चुका,तपासणी अधिकारी यांनी तपासणीतील चुका ई.दुरुस्ती साठी Re-edit मोडुल दिले आहे. आणी त्यातच आपनास खात्या संबंधी दुरुस्ती साठी खाता मास्टर दिले आहे. या खाता मास्टर मध्ये दुरुस्ती साठी आपनास खात्याची पुर्व तयारी करावी लागेल .त्यात समान आलेली नावे,नावातील स्पेलींगमध्ये चुका ई. शोधावे लागेल. त्यासाठी आपनास Excel sheet मध्ये सदर Data घ्यावा लागतो व वरिल कार्यवाही करावी लागते. ती पुर्वतयारी अधिक सुलभ व्हावी या करिता आपनासर्वां साठी Data arrange software श्री इकबाल मुलाणी तांत्रीक सहाय्यक यांनी तयार केले आहे.हे सॉफ्टवेअर वापरुन आपन अगदी कमी वेळात खाता मास्टर पुर्व तयारी अचुक तय्यार करु शकाल.
- सर्व प्रथम OCU मधुन खातेदार यादी कॉपी करुन घ्या.
- सदर कॉपी यादी या Excel Sheet मधील Data Sheet मध्ये पेस्ट करा
- त्यानंतर पुठील Sheet वरील गटक्रमांक, खाता क्रमांक व खातेदाराचे नाव ई कोण्ातेही ऑपश्न वापरुन आपन यादी Short करु शकतो.
सदर Excel Sheet Data arrange software डाउुनलोड करणे साठी खालील लिंक वर क्लीक करुन मिळवा
श्री इकबाल मुलाणी. तांत्रीक सहाय्यक,
कोरेगांव जि.सातारा
Published By
कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ
ckamraj@outlook.com
www.talathiinmaharashtra.in
२८ जून, २०१७
शेतजमिनीची खरेदी
सर्वसामान्य शेतकरी,व्यक्ती यांना शेतजमिनी खरेदी करताना अनेक प्रश्न निर्माण होतात उदा. जमिनीचा प्रकार ,जमिनीची मालकी ,क्षेत्र इत्यादी या सर्व प्रश्नावर सर्वात सोप्या भाषेत उत्तर डॉ संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी आपल्या ‛शेतजमिनीची खरेदी’ या अत्यंत उपयुक्त लेखात दिले आहे.
खालील लिंकवरून सदर लेख pdf स्वरूपात प्राप्त करा.
खालील लिंकवरून सदर लेख pdf स्वरूपात प्राप्त करा.
लेखातील ठळक वैशिष्टे.
- शेतजमिनीचे सर्वसामान्य प्रकार
- जमिनीचे धारणा प्रकार
- सातबारा कसा संबंधी माहिती
- शेतकरी नसलेल्या व्यक्तीने जमीन खरेदी करणे
- आदिवासी ,गैर आदिवासी जमीन खरेदी
इत्यादी सर्व बाबींची माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडण्यात आली आहे..
लेखक
डॉ संजय कुंडेटकर ,सर उपजिल्हाधिकारी
संकलन
कामराज चौधरी,तलाठी - पुसद जिल्हा यवतमाळ
२० मे, २०१७
'एकशे एक महसूली लेख'
आदरणीय डॉ. संजय कुंडेटकर सर,
उपजिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांच्या महसूल खात्यातील सेवेच्या अनुभवातुन
व त्यांना अनेक लोकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे, महसूल कायद्यातील अडचणींवर
मात करण्यासाठी आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त
लेख लिहीले आहेत. महसूल विभागामध्ये कार्यरत असणार्या सर्वच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सरांच्या
या सर्व लेखांचा दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणात उपयोग आणि मदत होत आहे. तसेच अनेक
सामान्य नागरीकांना सुद्धा कायद्याचे ज्ञान होण्यास या लेखांमुळे मोठी मदत झाली
आहे.
त्यामुळेच सरांचे सर्व लेख एकत्र एकाच पुस्तकात
राहावे अशी कल्पना उदयास आली.व आज ती 'एकशे
एक महसूली लेख' या पुस्तकाच्या माध्यमातुन आपल्या पर्यंत
पोहचवीत आहो.सरांनी आज पर्यंत लिलीलेले सर्व लेख या पुस्तकात समाविष्ठ केले
आहे.त्या सर्वांचा आपनास निष्चीतच फायदा होईल याच अपेक्षेने प्रकाशीत. आदरणीय
डॉ.संजय कुंडेटकर,सरांचे खुप खुप आभार.
- लेखक
डॉ.संजय कुंडेटकर,सर
उपजिल्हाधिकारी,सातारा
- संकलन व प्रकाशक
कामराज चौधरी.तलाठी-पुसद जि.यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
१४ एप्रिल, २०१७
डॉ.संजय कुंडेटकर सर,यांची सचित्र MLRC 1966
महसुल विभागाची सर्व कार्यपद्धती ज्या नियमावर आधारीत आहे.ज्या कायद्यानुसार संपुर्ण कामकाज चालते तो अधिनियम म्हणजे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 होय. सामान्य व्यक्तीस व कर्मचारी यांना कायदे किंवा नियमांची रचना त्यातील भाषेमुळे समजण्यास बरेच वेळेस कठीण जाते. म्हणुनच डॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी, यांनी सचित्र 1) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 2) गाव नमुना 8 व 3) कलम 150 फेरफार नोंदवही व विवादगस्त नोंद ईत्यादी बाबत सचित्र ( PPT) तयार केली आहे. त्यातील काही कलम सर्वांन साठी खालिल लिंक वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 1 ते 4
- महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 5 ते 19
- महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 20 ते 40
- गाव नमुना 8
- कलम 150 फेरफार नोंदवही व विवादगस्त नोंद
- लेखः-
डॉ.संजय कुंडेटकर सर,
उपजिल्हाधिकारी,महा.शा.
२१ फेब्रुवारी, २०१७
INCOME Tax फाईल. (Software)
आपले इन्कम TAX आपणच भरा..
प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्येक आर्थिक वर्षात आपल्या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्याचा उपयोग व्हावा या साठी ते #"महाराष्ट्रातील तलाठी" या आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले आहे.या Software मध्ये केवळ तुमचे चालु महीण्याचे Basic pay व इतर Deduction टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे.
- INCOME Tax (FORM NO 16) Software - NPS/DCPS Employees
- INCOME Tax (FORM NO 16) Software - GPF Employees
*Softwareनिर्मिती*
श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि.बुलढाणा
श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि.बुलढाणा
*संकलन व प्रसिध्दी*
कामराज चौधरी, तलाठी-पुसद जि.यवतमाळ
९ फेब्रुवारी, २०१७
ई-महाभूमी प्रकल्प अंमलबजावणी (NLRMP)
राष्ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात शेती संदर्भातील सर्व दस्तऐवज संगणीकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन .त्याच कार्यक्रमांचा महत्वाचा भाग म्हणजे ई-फेरफार हा आहे. ई-फेरफार पुर्वतयारी , Edit module मध्ये करावयाची पुर्व तयारी ई,आवश्यक असणा-या सर्व बाबींची माहीती सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी,DBAनायब तहसिलदार , DDE उपजिल्हाधिकारी यांना व्हावी या साठी मा. रामदास तगताप सर,उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी माहीतीची चित्र फित (PPT) तय्यार केली आहे. सदर चित्र फित (PPT) PDF स्वरुपात मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
-:लेख:-
मा. रामदास तगताप सर,
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
३ फेब्रुवारी, २०१७
NPS (National pension system) मध्ये जमा रक्कमेचा व DCPS मधिल कपात / जमा रक्कमेचा तपशिल शोधणे.
महाराष्ट्र शासनाने ऑक्टोंबर 2005 नंतर सेवेत रुजु होणा-या कर्मचारी/ अधिकारी यांना अंशदायी निवृृत्ती योजना लागु केली आहे.त्या नुसार पगारातील 10% रक्कम कपात करुन DCPS खात्यात जमा करणे व तेवढीच रक्कम शासनाने जमा करणे अशा स्वरुपाची ती योजना आहे. आता महाराष्ट्र शासनाने सदर योजना दि 01/04/2015 पासुन केंद्राच्या NPS ( National pension system) या योजनेत रुपांतर केली आहे.त्या नुसार आपले पगारातील 10% रक्कम कपात करुन NPS खात्यात जमा केली आहे. त्या योजनेतील जमा रक्कमेचा तपशिल कसा शोधावा व DCPS मधिल कपात / जमा रक्कमे सोबत त्याचा कसा ताळमेळ बसवावा या साठी PDF फाईल तयार केली आहे . ती PDF फाईल खालील लिंक वरुन download करुन जमा रक्कमेचा ताळमेळ बसवु शकाल.
-: लेख :-
कामराज बसवन्ना चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
३ जानेवारी, २०१७
आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्याचे सॉफ्टवेअर( new version)
गाव नमुना 7/12 वरिल खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढणे आपनास सुत्र माहीत नसेल तर कठीण व अवघड जाते त्या साठीच कोणतेही सुत्र न वापरता खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढण्यासाठी श्री ईकबाल मुलानी कोरेगांव जि.सातारा यांनी अत्यंत सोप्या पध्दतीचे आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअर चा उपयोग सर्वांना व्हावा या साठी डॉ.संजय कुंडेटकर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ते उपलब्ध करुन दिले आहे. खाली दिलेल्या लिंक वरुन सदर सॉफ्टवेअर मिळवीता येईल. महसुल मधिल सर्व कर्मचारी /अधिकारी यांना अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर
(नविन बदलासह तयार केले आहेत.NLRMPसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहे.)कामराज चौधरी
तलाठी-पुसद जि.यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
🔶🔵🔴🔶🔵🔴🔶🔵🔴🔶
२ जानेवारी, २०१७
Forticlient SSLVPN सॉफ्टवेअर online लॉग ईन करण्याची पध्दती.
NLRMP मधिल सर्व URL ला तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या Laptop लॉग ईन करण्यासाठी Laptop वर VPN कनेक्टीव्हीटी आवश्यक आहे. त्या साठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी Forticlient SSLVPN Software वापरतात परंतु ते Software वापरतांना आपनास ब-याच अडचणी येत आहे जसे की वारंवार disconnect होणे, लॉग इन न होणे किंवा लॉग इन साठी बराच वेळ लागणे. या सर्व समस्ये वर एक उपाय म्हणुन सदर Software जर आपन online वापरले तर या सर्व समस्या दुर होण्यास मदत होईल. सदर Software online वापरण्याची कार्यपध्दती खालील PDF फाईल मध्ये दिली आहे. त्या प्रमाणे कार्यवाही करता येईल.
· मुळ संकल्पना *
श्री ईकबाल मुलानी रा.कोरेगांव जि सातारा.
· Created by *
कामराज ब चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)