• *मुख्यपृष्ठ*
 • *ई-फेरफार*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  १ ऑगस्ट, २०२०

  गाव नमुने 1 ते 21

  आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड  करावे.  संकलन
  कामराज चौधरी
  तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

  १९ जुलै, २०२०

  Computer Tricks संगणकावरील क्लुप्त्या

   सर्वच कर्मचारी /अधिकारी व सर्वच शासकीय / खाजगी विभागात संगणका वापर सर्रास होतो. परंतु आपल्याला काही अश्या क्लुप्त्या असतात की ज्याचा वापर आपण केल्यास आपले काम अधिक सोपे व वेळेत होते.अश्याच संगणक क्लुप्त्या Computer Tricks बाबत माहिती इकबाल मुलांनी यांनी त्यांचे youtube चॅनेल च्या माध्यमातून हाती घेतले आहे .खालील लिंक वरून आपण त्यांचे चॅनल ला भेट द्या व विविध संगणक क्लुप्त्या ची माहिती मिळवा  १ जुलै, २०२०

  प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-2021

  संपूर्ण देशात एकाच प्रकारचा पीक विमा असावा या साठी सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे . त्यानुसार पिकाच्या एकूण जोखिम स्तराच्या 2% प्रीमियम भरावे लागेल उदा.सोयाबीन पिकास जोखीम स्तर 40000 रु आहे त्याचा प्रीमियम 800 रु आहे . सदर पीक विमा या वर्षी महा ई सेवा केंद्रात सुद्धा भरता येईल अधिक माहिती साठी खालील माहीती पत्रक पहा.

  कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ


  २४ मार्च, २०२०

  Digital 7/12 काढण्याची पध्दत.

  मित्रानों कोरानो विषाणु थैमान घातले आहेत, तरी देखील शासकीय कार्यालयात कामानिमित्त् येणाऱ्या संख्या दिसुन येते ,तलाठी कार्यालयात सुध्दा विविध भागातुन नागरिक/खातेदार सात बारा घेण्यासाठी येत असतात सध्याची परिस्थिती पहाता नागरिकांनी ऑनलाईन सात बारा काढावीत असे आमचा मानस आहे तरी डिजिटल 7/12 कश्या प्रकारे काढावीत यांची एक पीडीएफ फाईल *शशिकांत सानप तलाठी पनवेल* यांनी तयार केली आहे. तरी नागरिकांनी घरात बसुन रहावे,महसुल विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
       
         Digital 7/12 काढण्याची पध्दत PDF      

       Digital 7/12 काढण्याचे संकेत स्थळ (web side)

     संकलन
  कामराज चौधरी तलाठी
  पुसद जी यवतमाळ
  www.talathiinmaharashtra.in  

  २८ फेब्रुवारी, २०२०

  Income tax software 2019-2020

  प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 

  Income tax software NPS

  Income tax software GPF

  संकलन
  कामराज चौधरी
  तलाठी पुसद जि यवतमाळ
  www.talathiinmaharashtra.in

  २५ डिसेंबर, २०१९

  कृषी विभागातील योजनांची माहिती.

  महाराष्ट्रातील सर्व शेतकरी यांचे साठी माननीय नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी अथक परिश्रमाने 53 योजनांची माहिती सर्वाना उपलब्ध करून दिली आहे खाली या योजना कश्या मिळवायच्या या बाबत सविस्तर माहिती दिली आहे या माहितीचा लाभ सर्वानी घ्यावा व इतरांना ही या योजनेची माहिती द्यावी.

  योजनांच्या महितीसाठी संबधित योजनेसमोरील शब्द टाइप करुन 9404396119 या नंबर वर WhatsApp  करा.
  *या योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहेत.*

  1. सूक्ष्म सिंचन योजना - *pmksy*  किंवा *ठिबक* असे टाइप करा.

  2. यांत्रिकीकरण  योजनेसाठी- *smam* किंवा *यांत्रिकीकरण*  टाइप करा.

  3. फळबागेच्या योजनांसाठी - *Horti* किवा *फळबाग* टाइप करा.

  4. पिक विमासाठी-  *पिक विमा* किवा *pmfby*  टाइप करा.

  5. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी- *mts* किवा *शेततळे* टाइप करा.

  6. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- *gmsavy* किंवा *अपघात विमा* असे टाइप करा.

  7. गट शेती योजनेच्या माहिती साठी - *गटशेती* किंवा  *gatsheti* टाइप करा.

  8. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी - *puraskar*  किंवा *पुरस्कार* टाइप करा.

  9. फवारणी सुरक्षा किट साठी- *किट* किंवा *kit* टाइप करा.

  10. फेरोमेन ट्रॅप साठी - *ट्रॅप* किंवा *Trap* टाइप करा.

  11. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी - *राफअ* किंवा *nhm*  टाइप करा.

  12. माती नमुने बाबत माहिती साठी - *soil* किंवा *माती नमुने* असे टाइप करा.

  13. रोप वाटिका परवाना साठी- *परवाना* किंवा *nursery licence* असे टाइप करा.

  14. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी - *sf* किंवा  *कृषी केंद्र* असे टाइप करा.

  15. जैविक उत्पादन माहिती साठी - *bio* किंवा *जैविक*  टाइप करा.

  16. पाईप,पंपसंच साठी - *पंप* किंवा *pump* टाइप करा.

  17. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- *शेतकरी* किंवा  *shetkari* टाइप करा.

  18-प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी- *pmkmy*  किंवा *पेन्शन* टाइप करा.

  19. शेततळे अस्तरिकरण साठी - *अस्तरिकरण*  किंवा  *lining* टाइप करा.

  20. वन शेती योजनेसाठी- *वनशेती* किंवा  *af* टाइप करा.                                           

  21. रोप वाटिका च्या माहितीसाठी- *रोपवाटिका* किंवा *nursery*  टाइप करा.                                 

  22. नविन विहिरिसाठी- *विहिर* किंवा *well* टाइप करा.

  23. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी - *pmkisan* टाइप करा. 

  24. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माहितीसाठी- *pocra* किंवा  *पोकरा*  टाइप करा. 

  25. कांदा चाळ बाबत माहिती साठी- *onion* किंवा *कांदा चाळ* असे  टाइप करा.

  26. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- *mulching*  टाइप करा.

  27. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- *rej* टाइप करा.

  28. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहितीसाठी- *abnet*   टाइप करा.

  29. हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- *turmeric* टाइप करा.

  30. हरीत गृहा बाबत माहिती साठी- *ngh* आणि *pgh* असे टाइप करा.

  31. शेड नेट हाऊस बाबत माहिती साठी- *nsh*  आणि *psh*   असे टाइप करा.

  32. अळिंबी बाबत माहितीसाठी- *mushroom* टाइप करा.

  33. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी- *pseri*  तसेच रेशीम  संचालनालय  यांचे कडील योजने साठी *seri* किंवा *रेशीम* असे टाइप करा.

  34. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी- *godown* किंवा  *गोदाम* असे टाइप करा.

  35. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी - *spp*  असे टाइप करा.

  36. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी-  *bmkky* असे टाइप करा.

  37. मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- *मिनी राइस मिल*  किंवा  *ricemill* असे टाइप करा.

  38. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहितीसाठी- *inm* असे टाइप करा.

  39. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- *midr* टाइप करा.

  40. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी-  *mdm* असे टाइप करा.

  41. मधूमक्षिका पालन बाबत माहिती साठी- *nbee* किंवा *मध* असे टाइप करा.

  42. कीटक नाशके/ तणनाशके याबाबत माहिती साठी-  *ipm* असे टाइप करा.

  43. आत्मा बाबत माहिती साठी- *आत्मा* किंवा  *atma* असे टाइप करा.

  44. सेंद्रीय शेती बाबत माहिती साठी- *सेंद्रीय शेती* किंवा  *organic farming* असे टाइप करा. तसेच परंपरागत कृषी विकास योजनेच्या माहिती साठी- *pkvy* असे टाइप करा.

  45. रबी हंगाम 2019-20 साठी हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध आहे. याबाबत माहितीसाठी - *हरभरा अनुदान* किंवा  *gram subsidy* असे टाइप करा.

  46. शेतकरी बंधूंनो फवारणी करताना काळजी घ्या-

  https://drive.google.com/file/d/156amI-hhLa23GHy3aAIr6N4WLvD1BD2w/view?usp=drivesdk

  47. कोरडवाहू क्षेत्र विकास योजने बाबत माहिती साठी -  *rad*  टाइप करा.

  48. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी-  * nfsm pulses* असे टाईप करा.

  49. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- गळीतधान्य व तेलताड च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी-  * nfsm osop* असे टाईप करा.

  50. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य (ज्वारी बाजरी रागी) बाबत माहिती साठी- *nfsm nutri cereals* असे टाइप करा.

  51. पिकांवरिल किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प बाबतच्या मार्गदर्शक सूचनांसाठी - *cropsap* असे टाइप करा.

  52. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माहिती साठी- *baksy* असे टाइप करा.

  53. जमीन आरोग्य पत्रिका योजने बाबत माहिती साठी- *shc*  किंवा *जआप * असे टाइप करा.

  या शिवाय मा नवनाथ कोपरकर यांचे ब्लॉग वर सुद्धा सर्व माहिती उपलब्ध आहे.

  https://navnathkolapkar.blogspot.com/2019/11/blog-post_75.html?m=1  २६ ऑगस्ट, २०१९

  प्रधानमंत्री किसान मान-धन योजना (PM-KMYE)

  18 ते 40 वर्ष वयाेेेेगटातील शेतकरी यांना त्‍यांचे वयाचे 60 वर्षा नंतर दरमाह 3000रु पेन्‍शन मिळेल.

  प्रधानमंत्री किसान मान-धन योजना (PM-KMYE) माहीती पत्रक 

  २३ जुलै, २०१९

  ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ” प्रणाली चा वापर


  डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई हक्क  आज्ञावली नावाने ( PDE – Public Datai Entry ) विकसित केली आहे .  या प्रणाली द्वारे कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे . या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका , सहकारी सोसायट्या , पतसंस्था यांना देखील वापरता येईल .

  ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-   
                    सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .
  १. वारस नोंद
  २. बोजा / गहाणखत  दाखल करणे
  ३. बोजा कमी करणे
  ४. ई करार नोंदी
  ५. मयताचे नाव कमी करणे
  ६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
  ७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
  ८. विश्वास्थांचे नाव बदलणे   

                  वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. 

  अर्ज कोण करू शकेल ?-
   
   त्यासाठी बँक प्रतिनिधी , सोसायटी चे सचिव व खातेदार यांना  https://pdeigr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व र्त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी , PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल . तयार केलेला युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल . कोणत्याही व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह ( Aplicatiopn ID)  मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेत स्थावर आपल्या लॉगीनने DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल.   अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून ही  कागदपत्रे  स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक राहील  . 
    कामराज चौधरी 
   तलाठी-पुसद खंड १
                                                                                           www.talathiinmaharashtra.in