• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    DCPs रक्‍कम खात्‍यात जमाकरणे बाबत. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    DCPs रक्‍कम खात्‍यात जमाकरणे बाबत. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    ३ फेब्रुवारी, २०१७

    NPS (National pension system) मध्‍ये जमा रक्‍कमेचा व DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमेचा तपशिल शोधणे.

    महाराष्‍ट्र शासनाने ऑक्‍टोंबर 2005 नंतर सेवेत रुजु होणा-या कर्मचारी/ अधिकारी यांना अंशदायी निवृृत्‍ती योजना लागु केली आहे.त्‍या नुसार पगारातील 10% रक्‍कम कपात करुन DCPS खात्‍यात जमा करणे व तेवढीच रक्‍कम शासनाने जमा करणे अशा स्‍वरुपाची ती योजना आहे. आता महाराष्‍ट्र शासनाने सदर योजना  दि 01/04/2015 पासुन केंद्राच्‍या  NPS ( National pension system) या योजनेत रुपांतर केली आहे.त्‍या नुसार आपले  पगारातील 10% रक्‍कम कपात करुन NPS खात्‍यात जमा  केली आहे. त्‍या योजनेतील  जमा रक्‍कमेचा तपशिल कसा शोधावा व  DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमे सोबत त्‍याचा कसा ताळमेळ बसवावा या साठी PDF फाईल तयार केली आहे . ती PDF फाईल खालील लिंक वरुन download करुन जमा रक्‍कमेचा ताळमेळ बसवु शकाल.


    -: लेख :- 
    कामराज बसवन्‍ना चौधरी
    तलाठी पुसद जि यवतमाळ 



    ११ फेब्रुवारी, २०१६

    DCPSकपातीचे वार्षिक विवरण (R3-Report)शोधण्याची पध्दती.

                                              १ नोंव्हे २००५ नंतर शासकिय सेवेत रुजु झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांना अंशदायी निवृत्ती योजना DCPS लागु केली आहे त्या नुसार आपले मासीक पगारातुन दरमाह १०% रक्कम कपात करण्यात येते व तेवढीच रक्कम शासन जमा करत असते. त्या कपाती नुसार सन २००७-२००८ पासुन ते सन २०१४-२०१५ पर्यंतचे वार्षिक विवरण ( Form R3-Report)आपले सेवार्थ खातेवर देण्यात आले आहे. ते सर्व विवरण पाहुन missing amount बद्यल प्रस्ताव सादर करुन हि रक्कम आपले खात्यात जमा करुन घ्यावी लागेल.खालिल दोन्ही लिंक चा वापर करुन आपन आपले R3report पाहु शकता व missing amount शोधुन
    ते आपले DCPS खात्यात जमा करु शकाल.



    २४ ऑगस्ट, २०१५

    DCPS खात्‍यात जमा न झाालेली वेतन कपात रक्‍कम शोधुन DCPS खात्‍यात जमा करणे बाबतची पध्‍दती.

                                      सन नोव्‍हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत नियुक्‍त केलेल्‍या  सर्व अधिकारी / कर्मचा-यास अंशदान निवृत्‍ती वेतन योजना DCPS (Defined Contribution Pension System) लागु केलेली आहे. त्‍यानुसार आपले पगारातुन मुळवेतन + महागाई भत्‍ता मिळुन 10% रक्‍कम कपात केली जाते व तेवढीच रक्‍कम शासनातर्फे आपले DCPS  खात्‍यात जमा केली जाते.
                                परंतु  सन 2005 ते सन 2014 पर्यंतची कर्मच्‍या-यांचे पगार पत्रक पाहीले असता असे आढळुन येते कि , सदर कर्मच्‍या-यांचे वेतनातुन दरमाह DCPS रक्‍कम कपात झाली आहे पण त्‍या कपातीच्‍या काही रक्‍कम त्‍यांचे DCPS  खात्‍यात जमा झालेली नाही. त्‍यामुळे  तेवढी रक्‍कम शासनातर्फे सुध्‍दा जमा झालेली नाही.त्‍यानुसार सदर सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दुहेरी आर्थीक फटका बसलेला आहे. 
                                   या पुढे घाबरुन न जाता आपण खाली दर्शविलेल्‍या पध्‍दतीने कार्यवाही केल्‍यास या आर्थीक अडचणी वर मात करता येईल.
                             ह‍ि संपुर्ण कार्यवाही केल्‍या‍शिवाय आपले पगारातुन कपात झालेली व DCPS खात्‍यात जमा न झालेली रक्‍कम खात्‍यात जमा करता येणार नाही. त्‍यानुसारच आपले NPS  राष्‍ट्रीय निवृत्‍ती योजनेचे खात्‍यात रक्‍कम जमा होणार नाही.