- महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिताआणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणा-या शासकीय विभागामध्ये व अधिकरणामध्ये आणिइतरसार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी आणितत्संबंधित व तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करण्यासाठी एक सर्वसमावेशक कायदामहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 दि. २८ अप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याचे ठळक उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश्ा, 2015. शासन निर्णय (राजपत्र)
- सार्वजनिक प्राधिकरणाने अधिसुचित केलेल्या कालमर्यादेच्या आत लोक्सेवा प्राप्त करण्यासाठी पात्र व्यक्तींना हक्क् प्रदान करणे.
- पदनिर्देशित अधिक-यांनी पात्र व्यक्तींला नियत कालमर्यादेच्या आत लोक्सेवा देण्यासाठी तरतूद करणे;
- सार्वजनिक प्राधिकरणांना, लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा या कायद्यान्वये अधिसुचित करणे अनिवार्य आहे.
- पात्र व्यक्तीने केलेल्या अर्जास विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यासाठी तरतुद करणे जेणेकरुन तो त्याच्या अर्जाच्या स्थितीची आनलाईन पाहाणी करु शकेल.
- प्रथम अपील प्राधिकारी, द्वितीय अपील प्राधिकारी आणि आयोगाकडे अपील करण्यासाठी तरतूद करणे;
- या कायद्याच्या प्रभावी अंमलब्जावणीसाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित करणे;
- नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देण्यात कसूर करणा-या अधिका-यांच्या बाबतीत शास्ती व शिस्तभंगाची कारवाई करण्याकरीता तरतूद करणे;
- नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देणा-या अधिका-यांना रोख रकमेच्या स्वरुपात प्रोत्साहने देणे आणि या कायद्याची प्रयोजने साध्य करताना जी प्राधिकरणे उत्कृष्ट कामगिरी पार पाडतील अशा प्राधिकरणांना गोरव करण्यासाठी योग्य पारितोषिके देणे याची तरतूद करणे; आणि
- जाणूनबुजूनखोटी किंवा चुकीची माहिती किंवा खोटे दस्तेवज देऊन लोक्सेवा मिळविणा-या पात्र व्यक्तीविरुध्दकारवाई करण्याची तरतूद करणे.
- 1. Maharashtra Prevention of Delay in Discharge of Official Duties Act 2005
- 2. Right of Citizens for Time Bound Delivery of Goods and Services and Redressal of their Grievances Bil, 2011
- 3. Model Public Service Act
- लेखक व संकल्पना
- shri Pralhad KachareDeputy Commissioner (Entertainment Duty)
Divisional Commissioner's Office,Vidhan Bhavan, Pune-411001
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.