• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १८ नोव्हेंबर, २०२६

    इ फेरफार मध्ये नवीन बदलानुसार DSC सेटींग्स्

     📢 महत्त्वाची सूचना – अद्ययावत DSC प्रणालीबाबत

    अद्ययावत DSC व्हर्जननुसार ब्राउझर-इंडिपेंडंट लॉगिन सुविधा वापरण्यासाठी आपल्या लॅपटॉपवर खालील सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

    १. आवश्यक सॉफ्टवेअर डाउनलोड व इन्स्टॉलेशन

    - Java: (https://www.java.com/en/download/manual.jsp)  

     → Windows Online पर्याय निवडावा.

    - DSC Driver: आपल्या DSC टोकनमध्ये उपलब्ध असलेला संबंधित ड्रायव्हर इन्स्टॉल करावा.

    - NDSign Setup:(https://rr.kerala.gov.in/signer_integration_help.php)  

      → Windows पर्याय निवडून सेटअप डाउनलोड व इन्स्टॉल करावा.

    २. DSC नोंदणी प्रक्रिया

    - आवश्यक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून DSC नुसार आवश्यक पाथ सेट करावा.

    - त्यानंतर कोणत्याही ब्राउझरमध्ये (Google Chrome / Mozilla Firefox / Microsoft Edge) खालील लिंकद्वारे DSC नोंदणी करावी.

    🔗 DSC नोंदणी लिंक: 

    https://mahaferfarnas.enlightcloud.com/Usercration_test/

    🔗 e-Ferfar लॉगिन लिंक:  आपल्या जिल्हयाची URL  

    DSD करीता Google Chrome हे ब्राऊजर वापरा

    ⚠️ विशेष सूचना: DSC नोंदणी व लॉगिन करण्यापूर्वी वरील सर्व सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व आवश्यक सेटिंग्ज पूर्ण कराव्यात


    Demo Folder Download

    DSC setting Flow PDF

    NICD sign Download

    Settings Video 1

    Settings Video 2

    Enable Add on Software

    Flow प्रमाणे योग्य ती प्रोसेस पुर्ण करा लॉग ईन सहज होईल

    संकलन व प्रसिध्दी 

    कामराज चौधरी

     ग्राम महसुल‍ अधीकारी पुसद ता पुसद जि यवतमाळ

    १८ फेब्रुवारी, २०२६

    नवीन नियमा नुसार एकवेळेचे अकृषक प्रीमियम काढणे बाबत सॉफ्टवेअर N.A tax premium calculator

     शासनाने दिनांक 10.०२.२०२६ च्या शासन निर्णया नुसार या पुढे राज्य सरकारने अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या पुढे आता दरवर्षी अकृषक कराचा भरणा करण्याची गरज नसेल त्या ऐवजी एक वेळ अधिमुल्य भरावे लागेल हे अधिमुल्य रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे १००० चौ मी पर्यंत दाराच्या 0.10% , १००० ते ४००० चौ मी पर्यंत 0.२५% आणि ४००० चौ मी चे वर 0.५०% एवढा असेल.. हे दर ०१.०१.२०२६ पासून अकृषक वापराबाबत असेल 

    या आधी २००१ पूर्वी झालेले अकृषक भूखंडा साठी २००१ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील व २००१ नंतर  झालेले अकृषक भूखंडा साठी २००२ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील. यात शासन निर्णय दिनांकापासून मागील थकीत अकृषक करास सूट दिली आहे. परंतु शासन निर्णय दिनांकापासून एक वर्षात वरील नमूद दराने एक वेळ अधिमुल्य भरणे आवश्यक आहे एक वर्ष झाल्यावर त्या अधिमुल्यावर व्याज व दंड आकारला जाणार आहे. त्या नुसार आपल्याकडे असलेले खातेदार यांना किती प्रीमियम भरावा लागेल या बाबत आपल्याला महिती व्हावी या साठी श्री.विष्णू पाटील, मंडळ अधिकारी जळगाव जिल्ह्या यांनी AI च्या मदतीने N.A TAX ONE TIME PREMIUM SOFTWARE तयार केले आहे. या सॉफ्टवेअर चा वापर करून किती प्रीमियम लागणार याचा अंदाज येणार आहे...

    (सदर प्रिमियम कोणी भरून घ्यावे या बाबत अद्याप sop आलेली नाही वरील माहिती ही फक्त आपल्या माहिती साठी आहे..)

     1) N.A TAX ONE TIME PREMIUM SOFTWAR 

    2) अकृषक कर  प्रीमियम आकारणी (सॉफ्टवेअर क्रमांक 2)

    (सूचना:- वरील सॉफ्टवेअर नवीन page वर उघडल्यावर open ऑप्शन मध्ये जाऊन open with crome करावे त्या नंतर संपूर्ण calculation येईल)

    निर्मिती 

    1)श्री विष्णू पाटील मंडळ अधिकारी जळगांव

    2) कामराज ब चौधरी ग्राम महसूल अधिकारी पुसद

    ११ फेब्रुवारी, २०२६

    अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत.

      

     
     शासनाने दिनांक 10.०२.२०२६ च्या शासन निर्णया नुसार या पुढे राज्य सरकारने अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे शासन निर्णया नुसार आता अकृषक वापरा साठी सनद ,अकृषक परवानगीची आवश्यकता नसेल. सरळ online प्रणाली द्वात्रे नियोजन प्राधिकरण यांचे कडे अर्ज करून थेट अकृषक व बांधकाम परवानगी नियमा नुसार मिळेल .
          तसेच या पुढे आता दरवर्षी अकृषक कराचा भरणा करण्याची गरज नसेल त्या ऐवजी एक वेळ अधिमुल्य भरावे लागेल हे अधिमुल्य रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे १००० चौ मी पर्यंत दाराच्या 0.10% , १००० ते ४००० चौ मी पर्यंत 0.२५% आणि ४००० चौ मी चे वर 0.५०% एवढा असेल.. हे दर ०१.०१.२०२६ पासून अकृषक वापराबाबत असेल 
        या आधी २००१ पूर्वी झालेले अकृषक भूखंडा साठी २००१ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील व २००१ नंतर  झालेले अकृषक भूखंडा साठी २००२ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील. यात शासन निर्णय दिनांकापासून मागील थकीत अकृषक करास सूट दिली आहे. परंतु शासन निर्णय दिनांकापासून एक वर्षात वरील नमूद दराने एक वेळ अधिमुल्य भरणे आवश्यक आहे एक वर्ष झाल्यावर त्या अधिमुल्यावर व्याज व दंड आकारला जाणार आहे.


    लेख व प्रकाशन 

    कामराज ब चौधरी   
    ग्राम महसूल अधिकारी पुसद 
    ता पुसद जिल्हा यवतमाळ