डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे
आधुनिकीकरण( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर
कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त
कार्यालयाच्या ई हक्क आज्ञावली नावाने ( PDE – Public Datai Entry ) विकसित केली आहे . या प्रणाली द्वारे
कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या
हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते
अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता
येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील
अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे . या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका , सहकारी
सोसायट्या , पतसंस्था यांना देखील वापरता येईल .
ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-
सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .
१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे
वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
अर्ज कोण करू शकेल ?-
त्यासाठी बँक प्रतिनिधी , सोसायटी चे सचिव व खातेदार यांना https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व र्त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी , PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल . तयार केलेला युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल . कोणत्याही व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह ( Aplicatiopn ID) मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेत स्थावर आपल्या लॉगीनने DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल. अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून ही कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक राहील .

कामराज चौधरी
तलाठी-पुसद खंड १
www.talathiinmaharashtra.in
खूप चांगली माहिती आहे सर
उत्तर द्याहटवा