कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ यांचे व्दारा निर्मीत १४ नोव्हेंबर २०१३ रोजी कार्यंवित तलाठी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त माहीती असणारे संकेतस्थळ अडचणी व अधिक माहीती साठी ckamraj@outlook.com या मेल आडी वर संपर्क साधु शकता.
ई-चावडी मध्ये सर्व नमुने ऑनलाईन भरावे लागणार आहे त्या अनुषंगाने राज्यातील 365 तालुक्यातील प्रायोगिक तत्वावर 1 गावाची निवड केली आहे.. त्या गावातील ई चावडी मध्ये गाव नमुना 1 ची माहिती कश्या प्रकारे भरावी या बाबत सविस्तर माहिती या video मध्ये दिली आहे.. त्या माहितीचा उपयोग करून योग्य पद्धतीने माहिती भरण्यास मदत होईल..
सर्वांना
कळविण्यात आनंद होतो की, DILRMP प्रकल्पातंर्गत शासनाने नव्याने सुरु
केलेल्या ई-चावडी प्रकल्पा संबंधी विस्तुत माहीतीदेण्या साठीई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनलनव्याने तयार केले आहे.सदर चॅनेल
चे माध्यमातुन या पुठे ई-चावडी विषयीचे सर्वमाहीतीआणीई फेरफार बाबत ची सर्व माहीती देण्याचा प्रयत्न
करण्यात येणार आहे. तरी सर्वांना विनंती की आपन सर्वांनी सदरई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनल ला भेट द्यावी व SUBSCRIBE करावे. आजचा
पहीलाvideo
या व्हिडिओमध्ये माननीय उच्च न्यायालयाने नोंदणी कायद्याबद्दल नेमका काय निर्णय दिला आहे याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक नागरिकाने जमीन खरेदी करताना, अंमलात असलेल्या कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. एखाद्या खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त जर कायदेशीर तरतुदी विरुद्ध असेल तर कदाचित त्याची नोंदणी होईल परंतु सातबारा सदरी नाव दाखल होणार नाही याची नोंद घ्यावी.
त्यामुळे कोणताही खरेदी-विक्री व्यवहार करताना तो व्यवहार प्रचलित कायद्याविरुद्ध नाही याची प्रत्येकाने खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.
सन 2021-22 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी-२०२२ महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही आयकरकर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी-२०२२च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे .त्याकरिता आयकर चे दोन भाग करण्यात आलेले आहे.
जुन्या स्लॅप इन्कमटॅक्स आणि नवीन स्लॅप ( Inome Tax Calculation u/s 115BAC ) इन्कमटॅक्स त्यानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता एकत्रीत अशी माहिती एकाच EXL.FILE मध्ये देण्यात आले आहे.त्यामुळे कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल.
Dsc लॉगिन करिता आवश्यक Windows Update झाल्यावर होणारा प्रॉब्लेम किंवा Format केल्याच्या नंतर Explorer & Microsoft Edge
🌍 Internet Option Enable करावे लागतात वरील Security Setting Enable कराव्या लागतात त्यास आपला बराच वेळ जातो व काही Settings करावयाच्या राहील्यास Login होत नाही व परत वारंवार Settings कराव्या लागतात. हा होणारा त्रास वाचवण्यासाठी ActiveX Controls (Internet Explorer) New Updated-2022 हे सर्वांकरिता उपलब्ध करुन दिले आहे. सदर Setting Software' One Click व Raptop वर Run करा. ActiveX Controls (Internet Explorer) च्या सर्व Settings सेकंदात करा....🙏🙏
तलाठी यांनी सेवेत आल्यावर त्यांनी कोणते कार्य करावे कोणती नमुने दप्तरी असावे तलाठी यांचे कार्य व कर्तव्ये हे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमात दिले आहे आणी त्या नुसार तलाठी हे करतही असतात .. बदलत्या काळानुसार यात बदल होत आहेत .. तलाठी दप्तरात काही नमुने ऑनलाईन सुद्धा झालेले आहे . त्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तलाठी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील वसुली साठी आवश्यक गाव नमुना 8 ब हा सहज व सोप्या पद्धतीने एक्सल शीट कसा तयार करावा या बाबत व्हिडिओ व एक्सल file (8 ब )8 ड)10 तेरीज ( 1 ची तेरीज ) ऑटोमॅटिक तलाठी:-ज्योती इंदल गुसिंगे रा. जि.जालना ता.अंबड गांव. निहालसिंगवाडी ता. अमळनेर जि. जळगांव
यांनी सर्वांन साठी उपलब्ध करून दिले आहे.
खालील प्रमाणे त्यात बदल करून काम करू शकतो
अ.क्र.सुचनाकरावयाची कार्यपध्दती
१गावाचे नाव बदलवणेगावाचे नाव शिट वर वर्ष व गावाचे नाव बदलवणे
२तेरीज १तेरीज १ ले पान या शिट गोषवारा वर कोणतेही काम करु नये.
३खातेदाराचे नाव गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील नावे कॉपी करुन पेस्ट करावी
४एकूण क्षेत्र (हे.आर.चौ.मी.)गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील एकुण क्षेत्र कॉपी करुन पेस्ट करावी
५मागील थकबाकीमागील वर्षी ८ ब मधे ज्या खातेदार यांचे खात्यावर जी थकबाकी असेल ती रक्कम नमुद करावी
६आकारणीगावाचे कृषीक (शेतीचे) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी
७आकारणीगावाचे अकृषीक ( बिनशेती ) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी
८पावती नं. या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावती क्रमा
९पावती दिनांकया ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीचा दिनांक टाकावा
१०एकूण वसुली या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीची एकुण रक्कम टाका
११संपर्क याबाबत कुठलीही अडचण असल्यास खालिल मेल वर संपर्क करावा. Arjitsingal@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल 1966 कलाम 45 अंतर्गत तलाठी यांचे साज्यात असलेल्या गावांमध्ये जर कोणी जमिनीचा वापर हा अनधिकृत अकृषक, वाणिज्य किव्हा औद्योगिक कामा साठी केलेला असेल तर तलाठी यांना तसा वापरात बदल केल्या बाबत मा तहसीलदार यांना अहवाल सादर करावा लागतो.अहवाल सादर करते वेळी त्या वापरात बदला साठी आकारणी करावी लागते तसेच त्या वरील उपकर व दंडाचीही आकारणी करावी लागते ती आकारणी करून अहवाल सादर करण्यासाठी तलाठी श्री राजू मेरड जिल्हा अहमदनगर यांनी खूप सोप्या स्वरूपात एक्सल फाईल तयार केली आहे त्या फाईल मध्ये केवळ डेटा एन्ट्री त काम करावे लागेल आपला अहवाल हा तयार होईल.
महसूल विभागातील अभ्यासक मा डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारीयांचे महसूल गुरू you tube चॅनेल वरील गाव नमुना 1 विषयी सविस्तर माहिती या विडिओ ची लिंक पुढे दिली आहे त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता व आपल्या मनातील सर्व शंकांचे समाधान करू शकता