'भोगवटादार वर्ग-2' ही संकल्पना बरीच व्यापक आहे, वेगवेगळ्या कारणांनी "भोगवटादार वर्ग-2" हा शेरा दाखल केला जातो, तसेच अशा जमिनींना हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत, उदा- देवस्थान इनाम जमिनींचे अधिकार शासनास, नवीन शर्तीच्या (पूर्वाश्रमीच्या शासन जमिनी ) चे अधिकार विभागीय आयुक्तांना, "इनाम वर्ग 6 ब" चे अधिकार जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना आहेत, तर पाटील, कुलकर्णी यांसारख्या इनाम जमिनी, आहे त्याच न.अ.श.वर खरेदी द्यावयाच्या असतील तर त्यासाठी दि.9 जुलै 2002 रोजीच्या शा.नि.नुसार पूर्वपरवनगीची गरज नाही, असंच कुळकायदा, पुनर्वसन , सिलिंग इत्यादी जमीनीबाबत देखील सक्षम प्राधिकारी निश्चित करणेत आलेले आहेत, त्यामुळे अशा जमिनीच्या सर्व नोंदी, इनाम रजिस्टर, इत्यादी तपासल्याशिवाय कोणत्या टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे ते निश्चित करता येत नाही,
"भोगवटादार वर्ग-2" जमिनींचे प्रकार ? अशा जमिनीच्या हस्तांतरणास पूर्वपरवानगी देणारे सक्षम प्राधिकारी ? भरावा लागणारा नजराणा ? हे खालील तक्त्यात दिलेे आहे...
great job
उत्तर द्याहटवा