• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १६ फेब्रुवारी, २०१६

    महत्वाचे फेरफारांचे प्रकार व त्यावरील कार्यवाही. (हक्क नोंदणी)

         महसुल विभागात कार्यरत तलाठी / कर्मचारी यांना योग्य व सविस्तर मार्गदर्शनासाठी मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ' महसुली कामकाज पुस्तीका " हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्या मार्गदर्शिके नुसार तलाठी यांचे दैनिक कामकाजातील भाग "हक्क नोंदणी" फेरफाराचे एकुण ३३ प्रकार दिले आहे ते सर्व प्रकार "महाराष्ट्रातील तलाठी " ह्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. खालिल लिंक (दुव्याचा) वापर करुन ते मिळवता येईल.  
    संदर्भ 'महसुली कामकाज पुस्तीका" लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा dcsanjayk@gmail.com

    ११ फेब्रुवारी, २०१६

    DCPSकपातीचे वार्षिक विवरण (R3-Report)शोधण्याची पध्दती.

                                              १ नोंव्हे २००५ नंतर शासकिय सेवेत रुजु झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांना अंशदायी निवृत्ती योजना DCPS लागु केली आहे त्या नुसार आपले मासीक पगारातुन दरमाह १०% रक्कम कपात करण्यात येते व तेवढीच रक्कम शासन जमा करत असते. त्या कपाती नुसार सन २००७-२००८ पासुन ते सन २०१४-२०१५ पर्यंतचे वार्षिक विवरण ( Form R3-Report)आपले सेवार्थ खातेवर देण्यात आले आहे. ते सर्व विवरण पाहुन missing amount बद्यल प्रस्ताव सादर करुन हि रक्कम आपले खात्यात जमा करुन घ्यावी लागेल.खालिल दोन्ही लिंक चा वापर करुन आपन आपले R3report पाहु शकता व missing amount शोधुन
    ते आपले DCPS खात्यात जमा करु शकाल.



    ८ फेब्रुवारी, २०१६

    अाॅनलाइन ७/१२ च्या PDF merge करण्याची पध्दती

                                                  मा. जमाबंदी आयुक्त पुणे यांचे दि ०३/१२/२०१५ चे परिपत्रकानुसार ७/१२ तंतोतंत जुळविण्यासाठी ऑनलाईन ७/१२ चे pdf तयार करणेकरिता आपनास
    https://10.187.203.108/OPG ही URL देण्यात आली आहे त्या नुसार pdf तयार झाल्यावर त्या एकुण ७/१२ च्या संखेनुसार DOWNLOAD होतात.त्या सर्व स्वतंत्र ७/१२ च्या PDF एकाच PDF फाईल मध्ये तयार करणे साठी खालील लिंक चा वापर करून PDFMERGETOOLहे सॉफ्टवेअर मिळवा.


    २१ जानेवारी, २०१६

    इन्कम Tax फाईल. (Software)

    •  आपले इन्कम TAX आपणच भरा..
    👉🏻खालील लिंकवर  क्लिक करुन फाईल डाउनलोड करा. संगणकावर ती फाईल Excel मध्ये ओपन होईल. Payment Sheet वर आपले मार्च व जुलैचे बेसिक, ग्रेडपे सह ॲड करा तसेच आपले  deduction त्यामध्ये टाका.

    👉🏻D.A diff. यामध्ये जुन 2015 च्या पगारात व आता जाने  2016 ला मिळेल  ते  DA arress. मिळाले आहे ती रक्कम तेथे टाका.

    👉🏻तुमचा income tax फॉर्म Tax Sheet वर तयार होईल. आता त्याची प्रिंट काढून फॉर्म सबमिट करा.
    👉🏻खालील लिंकवर क्लिक करुन इन्कम Tax फाईल डाउनलोड करा.

         (संकलन :- श्री सुधाकर गिेरे  तलाठी  ता.खामगांव  ) 


    १३ जानेवारी, २०१६

    बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation)

         ई- फेरफार प्रकल्पा अंतर्गत संगणकीय  ७/१२ मध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने  मा.जमाबंदी आयुक्त पुणे यांनी मा. उच्च न्यायालयाचे आदेशाने दि. ०३/१२/२०१५ रोजी परीपत्रक काठुन ७/१२ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार आता ऑनलाईन ७/१२ pdf स्वरुपात  बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे  (online PDF generation) https://10.187.203.108/OPG हया लिंक वर उपलब्ध आहे.सदर बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation) usermanual डाऊनलोड करण्यासाठी खालिल लिंक वर जावुन मिळवा.




    ४ जानेवारी, २०१६

    ऊपयुक्त फार्म.

    शासकिय सेवेत असतांना ज्या प्रमाणे आपनास आपले पदास असलेले संपुर्ण कर्तव्य पार पाडावे लागते त्यानुसार खाली नमुद केल्या प्रमाणे  आपनास काही सोई सुविधा सुध्दा आहेत त्यातील काही निवडक सुविधा आवश्यक  नमुन्यासह दिल्या आहे.
     
    -: ऊपयुक्त फॉर्म :-
    ➡१. शासकिय गृह कर्ज घेण्‍याकरिता करावयाच्‍याअर्जाचा नमुना
    ➡२. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्‍या अर्जाचा नमुना (इंग्रजी)
    ➡३. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्‍या अर्जाचा नमुना (मराठी)
    ➡४. मोटार कार/ मोटार सायकल/ स्‍कुटर/मोपेड /वैयक्‍तीक संगणक खरेदी करण्‍यासाठी करावयाच्‍या अग्रीम अर्जाचा नमुना
    ➡५. राज्‍य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ खालील लाभांसाठी नामनिर्देशन (प्रपत्र ७ )
    ➡६. कुटूंब निव्रत्‍ती वेतना साठी नामनिर्देशन (नमुना ई )
    ➡७. निव़त्‍ती वेतनासाठी लागणारे फॉर्म नमुना-१,२, ३, ४, ५, हयात प्रमाणपत्र ,
    विभागाने भरावयाचे विवरणपत्र. वरिल सर्व अर्ज व विवरण पत्र मिळविण्यासाठी
    http://goo.gl/XVcLNX ह्या लिंक चा वापर करा.

    २२ डिसेंबर, २०१५

    अनधिकृत बिनशेती वापरा बाबत करावयाच्या कार्यवाहीचा नमुना.

                                          आपले साज्या अंतर्गत अनेक वेळा शेतजमिनी वर अनधिकृत, विना परवाना  वाणिज्य किवां औद्योगीक वापर केला जातो. अशा प्रकारचे अनधिकृत , विनापरवाना बिनशेती वापरात बदलाची प्रकरणे आढळुन आल्यावर त्यावर तलाठी या नात्याने कशा प्रकारे अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा या बाबतचा नमुना श्री. शशिकांत सानप तलाठी .पनवेल जि.रायगड यांनी उदाहरणा दाखल तय्यार केला आहे. तो मिळविण्या साठी खालिल लिंक चा वापर करा.

       

    १८ डिसेंबर, २०१५

    तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका.

                            तलाठी हा महसुल प्रशासनाचा कणा मानला जातो. शासनाच्या स्टील फ्रेम प्रशासनाचा  तो गतिमान घटक आहे . नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी  मा. श्रीकर परदेशी सर यांनी या घटकाचे महत्व ध्यानात घेवुन तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांना प्रशिक्षण देवुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले. व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली.                                                                                                    हे पुस्तक सोप्या सहज भाषेत असल्याने ती सर्व तलाठी याना उपलब्ध व्हावी म्हणुन त्या संकलित पुस्तकाची soft copy नांदेड जिल्हातील तलाठी श्री दुगमवार तलाठी देगलुर यांनी उपलब्ध करुन दिली आहे. सदर पुस्तक pdf डाउनलोड करण्याची लिंक  खाली आहे. तरी सर्वांनी याचा फायदा करुन घ्यावा.या पुस्तकाचे सर्व श्रेय तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर व त्यांचे तत्कालीन अधिकारी यांना जाते.

                                 




    १३ डिसेंबर, २०१५

    ७/१२ सदरी बिनशेती नोंद व ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती.

    • मा.जिल्हाधीकारी , मा.अप्पर जिल्हाधीकारी, मा, उपविभागीय अधिकारी  ई  वरिष्ठ कार्यालयातुन आपनास बिन शेती (N.A) आदेश प्राप्त होत असतात .त्याची नोंद आपले ७/१२ सदरी कशी करावी सर्वप्रथम काय कार्यवाही करावी याची माहीती साठी  व  
    • अनेक वेळा तलाठी यांना म.ज.म.अधि.१९६६ चे कलम ८५ अन्वये आदेशची अंमलबजावणी करतांना , न्यायालयीन आदेशा नुसार शेत जमिनीच्या सहधारकां मध्ये वाटणीची नोंद घेतांना संबंधीत व्यक्तीचे क्षेत्रा नुसार  आकार वेगळा दर्शविने व गा.नं. ८अ सदरी नोंद करावी लागते. त्यानुसार  ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती साठी खाली दर्शविलेल्या दुव्यावर जावुन मिळवा 
    लेखक - मा .श्री. डॉ. संजय कुंडेटकर सर.            उपजिल्हाधिकारी सातारा.


    १ डिसेंबर, २०१५

    उत्तराधिकार अधिनियम १९५६ - महत्वाच्या तरतुदी.

    वारसा बाबत फेरफार घेतांना आपनास बऱ्याच अडचणी येते असतात  त्या अडचणी सोडवण्यासाठी मा. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तयार केलेल्या माहीतीचा आपनास फायदा होईल.
    • वारसदार म्हणजे काय व कोण ?
    • उत्तराधिकारी हेाण्यास पात्र व्यक्ती कोण ?
    • वारसाचे वर्ग किती व त्यात समाविष्ठ व्यक्ती कोणत्या ?
    • वर्ग १,२,३,४ चे वारस कोण ?
    • वारसा हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोणत्या ?
    • महत्वाये न्याय निर्णय.
    • भारतीय वारसा अधिनियम १९२५ मधिल महत्वाच्या तरतुदी.
    • एकत्र कुटूंबातील मिळकतीचे वाटप. ईत्यादी संपुर्ण माहीती साठी खालील लिंक चा वापर करा.