• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २५ जुलै, २०१५

    शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणे बाबत.

                           शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्‍यासाठी पथदशी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत खालीलप्रमाणेशासनाने निर्णय घेतला आहे.  पथदशी प्रकल्पांतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या होणाऱ्या जिल्याकरीता विविध उपायोजना करण्‍याच्‍या अनुषंगाने यवतमाळ व उस्‍मानाबाद जिल्‍हयाची निवड के लेली असून त्‍याअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजना करण्‍यात  येत आहेत. त्यानु सार आत्महत्याग्रस्त क्षेत्रासाठी जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या, बळीराजा चेतना अभियान राबविणे, पथदशी पथदशी प्रकल्पांतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्यातील उप विभागासाठी नेमलेल्या सचिव दर्जाच्‍या  अधिकाऱ्यांच्ये प्रस्‍तावास कार्यत्‍तोर मांजूरी देणे वरील दोन जि‍ल्यांसाठी शेतकरी आत्महत्याबाबतचे कामकाज करण्यकरीता विशेष कक्ष स्थापन करणे इत्यादी बाबी व जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या यांची रचना आणि कार्यक्षमता बाबत च्‍या संपुर्ण माहीती साठी व शासन निर्णय पाहण्‍यासाठी  येथे क्‍लीक करा.
                             
                                     आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ' कृ षि‍ समृद्धी ' योजनेच्या अनुषंगाने विविध विभागयांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता करावयाच्‍या उपयोजनाबाबत.
                                           शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

    २ जुलै, २०१५

    निवृत्‍तीवेतन प्रकरण एक नमुन्‍यात आॅनलाईन तयार करणे व इतर बदला बाबत.

                                  निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विवीध प्रपत्रांमध्‍ये  सुधारणा करुन एक नमुना  तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्‍दतीने  तयार करणे आण्‍ाी इतर बदलाांबाबत. निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीवर निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दिनांक 01 सप्टेंबर, 2015 पासून सदर प्रणालीव्दारे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास व ते नमुना-1 या परिशिष्‍ट-अ मध्ये दर्शविलेल्‍या नमुन्‍यात तयार करुन सदर प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनाची मान्‍यता देण्यात येत आहे. दिनांक 01 सप्टेंबर, 2015 नंतर प्रत्येक निवृत्तीवेतन प्रकरण नविन नमुन्‍यात तयार करुन सादर करणे बंधनकारक राहि‍ल.
                                   नमुना-1 व परिशिष्‍ट-अ आणि सदर शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथे पहा.



    २६ जून, २०१५

    “0029-जमीन महसूल,करमणूक शुल्क व गौण खनि‍जे उत्खनन लेखाशिर्षखाली वसूल करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS) या प्रणालीद्वारे जमा करण्याबाबत .

                              महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्‍दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात येत आहे. राज्यातील सहा महसूली विभागांतर्गत सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व त्‍या अतर्गत येणा-या   उपविभागीय आणी तहसिल कार्यालया मध्‍ये सदर प्रणाली दि.1.8.2015 पासून न चुकता लागू होईल हे सुनिच्‍छीत  करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधीकारी यांची असुन त्‍या बाबतचे प्रशिक्षणची जबाबदारी हि वित्त विभागाच्या व्हच्‍र्युअल ट्रेझरी  कार्यालयामार्फत देण्यात येऊन ते दि.31.7.2015 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
                              या बाबत दि.26/06/2015 चा शासन निर्णय येथे पहा.

    GRAS side 

    २० जून, २०१५

    ई-फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचणी.

                                              ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर. ई- फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचण्‍ाी करणे  करिता eMutation.capabillity.Test(ECT) हया लींक चा वापर करुन ई- फेरफार ७/१२ पुर्व ऑनलाईन चाचणी घेता  येईल  येईल.७/१२ मध्ये फेरफार घेण्यापुर्वी त्या गटात काही त्रृटी आहेत काय ? हे फेरफार घेण्यापुर्वीच तपासता येइल . गटामध्ये त्रृटी  असल्यास कोणत्या प्रकारात काय त्रृटी आहे. उदा. अहवाल क्रमांक १ते१४,DBATool ईत्यादी मधील त्रृटी समजेल त्यामुळे फेरफार नोंदविण्यापुर्वी त्रृटी  दुरुस्तकेल्यास प्रलंबित फेरफारची संख्या   कमी होइल.

    ११ जून, २०१५

    रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्‍ये सुधारणा करणेबाबत.( L.T.C )

                    राज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-याांना मुख्‍यालयापासुन त्यांच्या स्वग्रामी जाण्यासाठी चार वर्षाच्‍या एका गटवर्षात दोन स्वग्राम किंवा एक महाराष्‍ट्र दशर्न व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सदर सवलतीच्या अनुषांगाने दि.10/06/2015च्‍या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार अटी व शर्ती एकत्रितपणे  विहीत करण्यात येत आहेत. सदर सुधारीत निर्णयात अविवाहीत कर्मचारी यांची कुटुंब व्‍याख्‍या दिली आहे.
                      सदर शासन निर्णय येथे पहा.

    ४ जून, २०१५

    संगणीकृत 7/12 डेटा ऑनलाईन दुरस्‍ती बाबत.(NLRMP)

                    ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर  संगणीकृत 7/12 डेटामध्‍ये जर काही दुरुस्‍ती करावयाची तर  online data correction  हया लींक चा वापर करुन संगणीकृत डेटा मध्‍ये ऑनलाईन दुरुस्‍ती करता येईल. 

    २३ मे, २०१५

    केंद्रशासनाची नवीन पेन्शन योजना सुरु.

    केंद्रशासनाची नवीन योजना अटल पेन्शन योजना.
    उतार वयात किमान गुंतवणुक,जास्तीत जास्त फायदा.
    हप्‍ता-  मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबुन आहे म्हणजे दरमाह रू ४२ ते रू २१० . लाभार्थी - वयोगट ज्यांचेवय  १८ ते ४०वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी.
    लाभ- ६० वर्ष वयापासुन रू १,००० पासून ते रू ५,००० पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ.
    अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    २२ मे, २०१५

    संगणीकृत 7/12 चा डेटा तपासणी व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन

                 महाराष्‍ट्र राज्‍य  तलाठी मंडळ अधिकारी समन्‍वय महासंघाच्‍या निवेदनाच्‍या अनुषंगाने दि.17/3/2015 रोजी मा. महसुलमंत्री महोदय यांचेशी झालेल्‍या बैठकीतील मुद्या क्र 5 नुसार NLRMP  कार्यक्रमांगर्त संगणीकरण 7/12 चा डेटा ची तपासणी  व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन बाबत कार्यवाही  करणे बाबतचे मा.जमाबंदी आयुक्‍त आणी संचालक भुमी अभिलेख ( महाराष्‍ट्र राज्‍य ),पुणे यांचे दिनांक 07/05/2015 चे परिपत्रक पहावयास मिळेल.

    ४ मे, २०१५

    केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

      केंद्र शासनाने दोन नविन योजना सुरु केल्‍या आहेत.

    • ) प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना.  हप्‍ता-  रुपये 330 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 50 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
    • )  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हप्‍ता-  रुपये 12 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 70 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु. जखमी झाल्‍यास 1 लाख रु.  अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    • दोन्‍ही योजनेचा लाभ तुम्‍ही एकत्रीत रित्‍या घेवुन रु.342 च्‍या वार्षिक हप्‍त्‍यामध्‍ये 4 लाख रु.संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्‍या बॅंकेशी संपर्क साधा.

    २८ एप्रिल, २०१५

    हस्‍तलिखीत फेरफार संगणकावर घेणेबाबत.

     आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP data CD  सब डाटा सेंटरवर ऑनलाईन (ई-फेरफार) साठी अपलोड झाल्‍यावर जर हस्‍तलीखीत फेरफार संगणकात घेण्‍याचे राहुन गेले असतील तर हया (online data updation) लिंक चा वापर करुन सदर राहीलेले फेरफार संगणकात ऑनलाईन टाकु शकता.  या शिवाय आणखी महत्‍वाच्‍या लिंक साठी येथे( NLRMP Project Important URLs/Links ) पाहा.