• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २५ डिसेंबर, २०१९

    कृषी विभागातील योजनांची माहिती.

    महाराष्ट्रातील सर्व शेतकरी यांचे साठी माननीय नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी अथक परिश्रमाने 53 योजनांची माहिती सर्वाना उपलब्ध करून दिली आहे खाली या योजना कश्या मिळवायच्या या बाबत सविस्तर माहिती दिली आहे या माहितीचा लाभ सर्वानी घ्यावा व इतरांना ही या योजनेची माहिती द्यावी.

    योजनांच्या महितीसाठी संबधित योजनेसमोरील शब्द टाइप करुन 9404396119 या नंबर वर WhatsApp  करा.
    *या योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहेत.*

    1. सूक्ष्म सिंचन योजना - *pmksy*  किंवा *ठिबक* असे टाइप करा.

    2. यांत्रिकीकरण  योजनेसाठी- *smam* किंवा *यांत्रिकीकरण*  टाइप करा.

    3. फळबागेच्या योजनांसाठी - *Horti* किवा *फळबाग* टाइप करा.

    4. पिक विमासाठी-  *पिक विमा* किवा *pmfby*  टाइप करा.

    5. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी- *mts* किवा *शेततळे* टाइप करा.

    6. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- *gmsavy* किंवा *अपघात विमा* असे टाइप करा.

    7. गट शेती योजनेच्या माहिती साठी - *गटशेती* किंवा  *gatsheti* टाइप करा.

    8. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी - *puraskar*  किंवा *पुरस्कार* टाइप करा.

    9. फवारणी सुरक्षा किट साठी- *किट* किंवा *kit* टाइप करा.

    10. फेरोमेन ट्रॅप साठी - *ट्रॅप* किंवा *Trap* टाइप करा.

    11. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी - *राफअ* किंवा *nhm*  टाइप करा.

    12. माती नमुने बाबत माहिती साठी - *soil* किंवा *माती नमुने* असे टाइप करा.

    13. रोप वाटिका परवाना साठी- *परवाना* किंवा *nursery licence* असे टाइप करा.

    14. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी - *sf* किंवा  *कृषी केंद्र* असे टाइप करा.

    15. जैविक उत्पादन माहिती साठी - *bio* किंवा *जैविक*  टाइप करा.

    16. पाईप,पंपसंच साठी - *पंप* किंवा *pump* टाइप करा.

    17. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- *शेतकरी* किंवा  *shetkari* टाइप करा.

    18-प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी- *pmkmy*  किंवा *पेन्शन* टाइप करा.

    19. शेततळे अस्तरिकरण साठी - *अस्तरिकरण*  किंवा  *lining* टाइप करा.

    20. वन शेती योजनेसाठी- *वनशेती* किंवा  *af* टाइप करा.                                           

    21. रोप वाटिका च्या माहितीसाठी- *रोपवाटिका* किंवा *nursery*  टाइप करा.                                 

    22. नविन विहिरिसाठी- *विहिर* किंवा *well* टाइप करा.

    23. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी - *pmkisan* टाइप करा. 

    24. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माहितीसाठी- *pocra* किंवा  *पोकरा*  टाइप करा. 

    25. कांदा चाळ बाबत माहिती साठी- *onion* किंवा *कांदा चाळ* असे  टाइप करा.

    26. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- *mulching*  टाइप करा.

    27. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- *rej* टाइप करा.

    28. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहितीसाठी- *abnet*   टाइप करा.

    29. हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- *turmeric* टाइप करा.

    30. हरीत गृहा बाबत माहिती साठी- *ngh* आणि *pgh* असे टाइप करा.

    31. शेड नेट हाऊस बाबत माहिती साठी- *nsh*  आणि *psh*   असे टाइप करा.

    32. अळिंबी बाबत माहितीसाठी- *mushroom* टाइप करा.

    33. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी- *pseri*  तसेच रेशीम  संचालनालय  यांचे कडील योजने साठी *seri* किंवा *रेशीम* असे टाइप करा.

    34. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी- *godown* किंवा  *गोदाम* असे टाइप करा.

    35. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी - *spp*  असे टाइप करा.

    36. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी-  *bmkky* असे टाइप करा.

    37. मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- *मिनी राइस मिल*  किंवा  *ricemill* असे टाइप करा.

    38. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहितीसाठी- *inm* असे टाइप करा.

    39. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- *midr* टाइप करा.

    40. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी-  *mdm* असे टाइप करा.

    41. मधूमक्षिका पालन बाबत माहिती साठी- *nbee* किंवा *मध* असे टाइप करा.

    42. कीटक नाशके/ तणनाशके याबाबत माहिती साठी-  *ipm* असे टाइप करा.

    43. आत्मा बाबत माहिती साठी- *आत्मा* किंवा  *atma* असे टाइप करा.

    44. सेंद्रीय शेती बाबत माहिती साठी- *सेंद्रीय शेती* किंवा  *organic farming* असे टाइप करा. तसेच परंपरागत कृषी विकास योजनेच्या माहिती साठी- *pkvy* असे टाइप करा.

    45. रबी हंगाम 2019-20 साठी हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध आहे. याबाबत माहितीसाठी - *हरभरा अनुदान* किंवा  *gram subsidy* असे टाइप करा.

    46. शेतकरी बंधूंनो फवारणी करताना काळजी घ्या-

    https://drive.google.com/file/d/156amI-hhLa23GHy3aAIr6N4WLvD1BD2w/view?usp=drivesdk

    47. कोरडवाहू क्षेत्र विकास योजने बाबत माहिती साठी -  *rad*  टाइप करा.

    48. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी-  * nfsm pulses* असे टाईप करा.

    49. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- गळीतधान्य व तेलताड च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी-  * nfsm osop* असे टाईप करा.

    50. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य (ज्वारी बाजरी रागी) बाबत माहिती साठी- *nfsm nutri cereals* असे टाइप करा.

    51. पिकांवरिल किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प बाबतच्या मार्गदर्शक सूचनांसाठी - *cropsap* असे टाइप करा.

    52. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माहिती साठी- *baksy* असे टाइप करा.

    53. जमीन आरोग्य पत्रिका योजने बाबत माहिती साठी- *shc*  किंवा *जआप * असे टाइप करा.

    या शिवाय मा नवनाथ कोपरकर यांचे ब्लॉग वर सुद्धा सर्व माहिती उपलब्ध आहे.

    https://navnathkolapkar.blogspot.com/2019/11/blog-post_75.html?m=1



    २६ ऑगस्ट, २०१९

    प्रधानमंत्री किसान मान-धन योजना (PM-KMYE)

    18 ते 40 वर्ष वयाेेेेगटातील शेतकरी यांना त्‍यांचे वयाचे 60 वर्षा नंतर दरमाह 3000रु पेन्‍शन मिळेल.

    प्रधानमंत्री किसान मान-धन योजना (PM-KMYE) माहीती पत्रक 

    २३ जुलै, २०१९

    ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ” प्रणाली चा वापर


    डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई हक्क  आज्ञावली नावाने ( PDE – Public Datai Entry ) विकसित केली आहे .  या प्रणाली द्वारे कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे . या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका , सहकारी सोसायट्या , पतसंस्था यांना देखील वापरता येईल .

    ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-   
                      सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .
    १. वारस नोंद
    २. बोजा / गहाणखत  दाखल करणे
    ३. बोजा कमी करणे
    ४. ई करार नोंदी
    ५. मयताचे नाव कमी करणे
    ६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
    ७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
    ८. विश्वास्थांचे नाव बदलणे   

                    वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. 

    अर्ज कोण करू शकेल ?-
     
     त्यासाठी बँक प्रतिनिधी , सोसायटी चे सचिव व खातेदार यांना  https://pdeigr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व र्त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी , PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल . तयार केलेला युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल . कोणत्याही व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह ( Aplicatiopn ID)  मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेत स्थावर आपल्या लॉगीनने DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल.   अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून ही  कागदपत्रे  स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक राहील  . 
      कामराज चौधरी 
     तलाठी-पुसद खंड १
                                                                                             www.talathiinmaharashtra.in         

    २४ एप्रिल, २०१९

    GCC-ESDS-CLOUD वर DILRMP data स्थानांतरित जिल्ह्यांना लॉगिन पद्धती

    ज्या जिल्ह्यांचा ई फेरफार चा Data NDC/SDC/BSNL Cloud वरून GCC-ESDS-CLOUD सर्व्हर वर मायग्रेट करणेत आला असून त्यामुळे आपल्याला आता ई फेरफार मध्ये लोगिन करण्यासाठी cisco VPN/Forticlint ची गरज भासणार नाही, मात्र आपले लॉगीन प्रक्रिया बदलली आहे, त्यामध्ये प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये https://mahaferfar.enlightcloud.com या वेबसाईट ला सर्च करावयाचे आहे त्यानंतर आपणास *user ID* म्हणजे आपला मेल आय डी म्हणजे EX. ckamraj@gmail.com टाकायचा आहे व *पासवर्ड* (तालुक्यातील DBA यांचे कडे पाठविले असेल)म्हणजे wSyMhpMAAYaTr9xZ हा टाकून sign in या  button वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर आपल्या *रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एक OTP येणार* आहे तो OTP टाका.त्यानंतर त्यानंतर आपण आपला *पासवर्ड बदलायचा* आहे , पासवर्ड हा *16 अंकी* असावा त्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे व एक लोअर केस एक नुमरिक असे एकूण कमीकमी 16 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. उदा. Kamrajcccc_00000. पासवर्ड बदल्लेनंतर password change successfully असा मेसेज येईल.त्याच मेसेज च्या खाली go back असा option असेल त्यावर क्लिक करा.
    https://mahaferfar.enlightcloud.com/eferfarmenu/ या बटन वर क्लिक केले नंतर आपल्याला आपले पूर्वीचे DILRMP चे first  पेज (dash board )दिसत होते तसे दिसेल त्यामध्ये ई फेरफार वर क्लिक करून पूर्वीप्रमाणे आपल्या सेवार्थ ने व dsc ने लॉगीन करायचे आहे.
      वरील नवीन तयार केलेला पासवर्ड ने आपला मेल आय डी म्हणजे आपला user आय डी  व पासवर्ड हा आपण नवीन तयार केलेला नि  sign in वर क्लिक करायचे असून त्यानंतर आपल्या मोबाईल वर येणाऱ्या OTP टाकून sign in वर क्लिक करायचे आहे.
    *हा प्रातिनिधिक आय डी पासवर्ड असून वरील  प्रमाणे आपले मेल आय डी वर येईल त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करावी*
    धन्यवाद !

    कामराज ब चौधरी
    तलाठी पुसद जी यवतमाळ
     

    क्लाऊड वर स्थलांतरित झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याची URL खालील प्रमाणे वापरावी .


    1)Washim               https://mahaferfar.enlightcloud.com/

    2)Ahmadnagar         https://mahaferfar.enlightcloud.com/


    4)Aurangabad          https://mahaferfar.enlightcloud.com/

    5)Gondia                  https://mahaferfar.enlightcloud.com/

    6)Latur                       https://mahaferfar.enlightcloud.com/

    7)Parbhani              https://mahaferfar.enlightcloud.com/

    8)Yawatmal              https://mahaferfar.enlightcloud.com/

    9)Osmanabad           https://mahaferfar.enlightcloud.com/

    10)Beed                      https://mahaferfar.enlightcloud.com/

    11)Nandurbar            https://mahaferfar.enlightcloud.com/

    12)Nanded                https://mahaferfar.enlightcloud.com/

    13)Kolhapur         https://mahaferfarkol.enlightcloud.com/

    14)Satara            https://mahaferfarkol.enlightcloud.com/


    16)Thane              https://mahaferfarjal.enlightcloud.com/

    17)Solapur            https://mahaferfarsol.enlightcloud.com/

    18)Sangli              https://mahaferfarsol.enlightcloud.com/



    21)Hingoli            https://mahaferfarhin.enlightcloud.com/


    23)Palghar          https://mahaferfar1.enlightcloud.com/

    24)Nagpur           https://mahaferfar1.enlightcloud.com/

    25)Gadchiroli         https://mahaferfar1.enlightcloud.com/



    26) Wardha             https://mahaferfar1.enlightcloud.com/

    27) AMRAVATI        https://mahaferfar1.enlightcloud.com/

    २१ फेब्रुवारी, २०१९

    Income Tax Software 2018-2019


    • प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 


    आयकर कपात माहिती-आर्थिक वर्ष-२०१८-१९

                            आर्थिक वर्ष-२०१८-१९ या वर्षा करिता करपात्र उत्त्पन्न २.५० लाखाचे पुढे आहे. बजेट -२०१८ नुसार सर्व कर्मचारी आणि करदात्यांना स्टडर्ड डिडक्शन रु.४०.००० /- देण्यात आले आहे. कपात मध्ये ८० सी सी ची मर्यादा १.५० लाख रु मागील वर्षा प्रमाणेच ठेवण्यात आले आहे. नवीन कर्मचारीवर्गा करिता Nps मध्ये हेणारी कपात ८० सी सी डी (२) Nps-I संपूर्ण सूट आणि Nps मध्ये हेणारी कपात ८० सी सी डी (२) Nps-II होणारी गुंतवणूक रु.५००००/- पर्यंत माफ करण्यात आले आहे. कलम ८७ ए- नुसार करपात्र उत्पन्न 3,50,000 /- चे आत आहे.त्यांना त्याचे देय करा एवढी मात्र कमाल २५०० /- इतकी सूट देण्यात आले.

    आयकर कलाम १० नुसार वजावटीस पात्र असलेले वाहतूक भत्ता व ओषधोपचाराच्या खर्चाची  (गंभीर आजार सोडून) सूट  या वर्षी रद्द करण्यात आले आहे. वरील प्रमाणे येणाऱ्या आयकरावर 3 % सेस चा  4 % करण्यात आले आहे.

      1. Standard Deduction (Rs 40,000) Budget 2018
      2.Additional Deduction u/c 80CCD (1b) NPS-II (Max Rs 50,000/-)
      3. 80 CCD (2)Nps -I Govt. Employees Pension Plan (u/s 80CCD)
      4. 80DDB Expenditure on Selected Medical Treatment for self/       
         dependent(Max Rs 1,00,000/-) only Medical Reimbuesment bill 
                       
    आयकर 2018-19 चे आयकर विवरण कसे भरावे या याबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
    सर्व प्रथम Microsoft Excel फाईल चे कर्मचारी प्रमाणे निवड करा सोबत दोन प्रकारच्या फाईल दिल्या आहे.
    1.Income Tax 2018-19 Dcps
    1.Income Tax 2018-19 Gpf
    निवडकेल्या नंतर Data_Sheet मध्ये सर्व कर्मचारी यांची माहिती उद. फेब्रुवारी-१९ चे वेतन व कपात भरावी.
    टिप :- बाकीच्या Sheet मध्ये कोणताही बदल करण्याची आवशकता नाही.
             हे संकलन शासनाच्या Income Tax Department, Government of India या संकेत स्थळावरील माहितीचा अभ्यास करून केले आहे.तथापि हा विषय अत्यंत विस्तृत असल्याने आवश्यक टीपचे संकलन करून करण्यात आले आहे.
    या व्यतिरिक्त कपात किवा इन्कमटॅक्स दार अधिक संदर्भांसाठी आयकर कायदा १९६१ व नियम १९६२ व त्यात झालेल्या सुधारणा मूळ मसुदेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
                                                 





    *Softwareनिर्मिती
      श्री.सुधाकर रा.गिरे
      मो.क्रमांक 99-21-1234-21
     मेल- sudhakargire@gmail.com

    *संकलन व प्रसिध्‍दी* 
    कामराज चौधरी, तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in