• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  ३० नोव्हेंबर, २०१६

  ACTIV X CONTROLL(INTERNET EXPLORER) SETTING SOFTWEAR

                     राष्‍ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात ई- फेरफार प्रकल्‍प सर्व तालुक्‍यात कार्यंवित झाला आहे. त्‍यात मागील काही दिवसान पासुन बदल करण्‍याचे कार्य चालु आहे.त्‍या नुसार प्रत्‍येक विभागास नविन सर्वर देण्‍याची कार्यवाही सुरु आहे.व काही जिल्‍हयांचा 7/12 चा डेटा नविन सर्वर वर हस्‍तांतरीत झाला आहे. त्‍यामुळे सदर सर्वर वर login होणे करिता आवश्‍यक INTERNET EXPLORER वरील security settingenable कराव्‍या लागतात त्‍यास आपला बराच वेळ जातो व काही setting करावयाच्‍या राहील्‍यास login होत नाही व परत वारंवार settingsकराव्‍या लागतात. हासर्वांना होणारा त्रास वाचवण्‍यासाठी ACTIV X CONTROLL(INTERNET EXPLORER)  SETIING SOFTWEAR मा श्री ईकबाल मुलानी यांनी तयार केले असुन डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी सर्वान करिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदर SETIING SOFTWEAR खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्‍या व laptopवर run करा. active x controll (internet explorer)च्‍या सर्व settings सेकंदात reset करा
  ११ नोव्हेंबर, २०१६

  शेतातील रस्‍ते व नकाशे

                           कोणत्‍याही गावाचा नकाशा पाहीला की, त्‍यात प्रदेश वर्णनात्‍मक  तपशिल जसे नदी ,नाला,तलाव ,विहीर,झााडे, पर्वत,टेकडी,झुडपी,जंगल इत्‍यादी तसेच तसेच रस्‍ते ,लोहमार्ग हे सुद्धा आढळतात . रस्‍त्‍याविना गाव नकाशा असणे अशक्‍य प्राय आहे. शेतातील रस्‍ते हे सन 1928चे वेळी जमाबंदी झाल्‍यापासुन आजतगायत काही गावात त्‍यात बदल झाला आहे. शेतामधिल रस्‍तांचा उद्देश हा की,शेतमालकास त्‍यांचे शेतातील होणारे  उत्‍पन्‍न हे बैलगाडीने /डोक्‍यावरुन वाहुन किंवा अन्‍य वाहनाने वाहुन नेता आले  पाहीजे प्रत्‍येक स.नं. चे धारकास एकमेकाचे धु-यावरुन जाणे येण्‍याचा हक्‍क आहे.                      महसुल विभागातील दैनिक कामकाजातील एक विषय म्‍हणजे शेतातील रस्‍ते या वर ब-याच प्रमाणात वाद व समस्‍या निर्माण होतात त्‍या वेळेस आपनास त्‍या गावातील नकाशा पहावा लागतो व त्‍या नकाश्‍या वरिल खुणां नुसार रस्‍त्‍याची लांबी रुंदी ठरवावी लागते. परंतु हृया खुणांची व त्‍यांच्‍या लांबी व रुंदी ची माहीती वेळेवर  उपलब्‍ध होत नाही. त्‍या करिता नकाशातील रस्‍त्‍यांचे प्रकार,त्‍यांची रुदी व रस्‍ते दर्शविण्‍या करिता वापरावयाची चिन्‍हे  इत्‍यादी बाबींचा तपशिलाची माहीती लेख महसुल कर्मचारी / अधिकारी व शेतकरी वर्ग यांचे साठी तयार केला आहे. खालील लिंक वर जावुन सदर लेख मिळवीता येईल.  ----------------------
  👉लेख👈
  कामराज ब चौधरी 
  तलाठी-पुसद जि.यवतमाळ 
  ckamraj@outlook.com 
  ---------------------

  २० ऑक्टोबर, २०१६

  महसुल संबंधित व्‍याख्‍या.

  महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकदा टिपणी, अहवाल, निकाल किंवा पत्राला उत्तर लिहीतांना एखादया शब्‍दाची कायदेशीर व्‍याख्‍या नमुद करावी लागते. महसूल खात्‍यात दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षा देतांना व्‍याख्‍यांचे महत्‍व लक्षात येते आपन अनेक कायदे राबवीत असतो त्‍यामुळे प्रत्‍येक व्‍याख्‍या लक्षात राहीलच असे नाही.कधीकधी एक व्‍याख्‍येचा कायदेशीर अर्थ जाणुन घेण्‍यासाठीकायद्याची अनेक पुस्‍तके चाळावी लागतात. कधी कधी व्‍याख्‍या लक्षात असते परंतु नेमक्‍या कोणत्‍या कायद्याखाली, कोणत्‍या कलमान्‍वये ती व्‍याख्‍या दिलेलीआहे. हे आठवत नाही. या सर्व गोष्‍टींचा विचार करुन , तातडीच्‍या वेळेला किंवा  दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षाचा अभ्‍यास करतांना ,कोणती व्‍याख्‍या कोणत्‍याकायद्याखाली आणि कोणत्‍या कलमान्‍वये दिलेली आहे हे नेमके कळावे या दुष्‍टीकोणातुन 'महसुल संबंधीत व्‍याख्‍या ' ची रचना डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा. यांनी केली आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्‍याख्‍या , कायदा व कलमांचा उल्‍लेख करुन आपले 'महाराष्‍ट्रातील तलाठी' संकेत स्‍थळावर www.talathiinmaharashtra.in वर उपलब्‍ध करुन दिले आहे. तेव्‍हा सदर महसुली व्‍याख्‍या मिळविण्‍यासाठी खालिल लिंक ला क्‍लिक करा. 

  *लेखक*                                                * संकलन *            
  डॉ.संजयकुंडेटकर,सर                          कामराज चौधरी
  उपजिल्‍हाधिकारी,सातारा.               तलाठी-पुसद जि.यवतमाळ 
                                                             ckamraj@outlook.com 
                         www.talathiinmaharashtra.in  १७ ऑक्टोबर, २०१६

  पैसेवारी रजिस्टर नमुना pdf

  पिक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच गंभीरही. पिक पैसेवारीच्या बाबतीत शेतकरी आणि प्रशासन या दोघांच्या मध्ये असतो तो तलाठी. प्रशासन आणि शेतकरी या दोघांनाही उत्तर देण्याची जबाबदारी तलाठी म्हणून आपली असते. आणि आपण प्रत्यक्ष फिल्ड वर काम भरपूर करतो . परंतु केलेल्या कामाची नोंद ठेवणेही त्याहून अधिक महत्वाचे. त्यासाठी पिक पैसेवारीचे क्रमवार टप्पे ,बैठका इतिवृत्त , सूचना,  प्लॉट टाकणे , पिक कापणी तक्ता या सर्वांचे लिखित रेकोर्ड आपले कडे असणे अत्यंत महत्वाचे त्यासाठी शासनाचे नवीन निर्देशानुसार आपल्या सर्वाना च माहिती साठी रेकॉर्ड साठी उपयोगी पडेल असा  पैसेवारी रजिस्टर नमुना pdf स्वरुपात  शिवानंद वाकदकर तलाठी सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांनी तयार करून आपले सेवेत सादर करणे करिता दिला आहे. याचा आपल्याला नक्की उपयोग होईल .
  • त्‍या स‍मितीत शासनाचे नवीन निर्देशानुसार कोण्‍ा कोण्‍ाते व किती सदस्‍य असतात. 
  • पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती काय ?
  • पिक पैसेवारी काढण्‍याची नविन पध्‍दती काेणती ? ई बाबत माहीती  व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्‍त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना खालील PDF  लिंक चा वापर  करुन मिळवा 


    

        -*लेख*-                                                        -*सौजन्‍य*-
  शिवानंद वाकदकर                                             कामराज चौधरी 
  तलाठी सिंदखेडराजा                                           तलाठी पुसद 
  जिल्हा बुलडाणा                                                  जिल्हा यवतमाळ 
  ९८२२६०१०७०                                                    

  १५ ऑक्टोबर, २०१६

  भोगवटदार वर्ग 2 जमिनी हस्तांतरणा संदर्भातील तरतुदी.

  'भोगवटादार वर्ग-2' ही संकल्पना बरीच व्यापक आहे, वेगवेगळ्या कारणांनी "भोगवटादार वर्ग-2" हा शेरा दाखल केला जातो, तसेच अशा जमिनींना हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत, उदा- देवस्थान इनाम जमिनींचे अधिकार शासनास, नवीन शर्तीच्या (पूर्वाश्रमीच्या शासन जमिनी ) चे अधिकार विभागीय आयुक्तांना, "इनाम वर्ग 6 ब" चे अधिकार जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना आहेत, तर पाटील, कुलकर्णी यांसारख्या इनाम जमिनी, आहे त्याच न.अ.श.वर खरेदी द्यावयाच्या असतील तर त्यासाठी दि.9 जुलै 2002 रोजीच्या शा.नि.नुसार पूर्वपरवनगीची गरज नाही, असंच कुळकायदा, पुनर्वसन , सिलिंग इत्यादी जमीनीबाबत देखील सक्षम प्राधिकारी निश्चित करणेत आलेले आहेत, त्यामुळे अशा जमिनीच्या सर्व नोंदी, इनाम रजिस्टर, इत्यादी तपासल्याशिवाय कोणत्या टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे ते निश्चित करता येत नाही, 

  "भोगवटादार वर्ग-2" जमिनींचे प्रकार ? अशा जमिनीच्या हस्तांतरणास पूर्वपरवानगी देणारे सक्षम प्राधिकारी ? भरावा लागणारा  नजराणा ? हे खालील तक्त्यात दिलेे आहे...

  लेखः- मा.बबनराव काकडे,सर तहसिलदार नाशिक  ९ ऑक्टोबर, २०१६

  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 करिता नुकसान पंचनामा कार्यपध्‍दती.

                                           सन 2016-2017 या वर्षापासुन संपुर्ण भारतात एकच पिक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना लागु करण्‍यात आली आहे.त्‍यानुसार अधिसुचीत पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना या योजनेअंंतर्गत येणा-या विमा संरक्षणाच्‍या बाबी जसे स्‍थानिक नैसर्गीक आपत्‍ती (पुराचे पाणी शेतात शिरुन पिकांचे नुकसान,गारपीट,भुस्‍खलन व पिक काढणी पश्‍चात नुकसान ( चक्रीवादळ , अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान  झाल्‍यास होणारी नुकसान निश्चिती करणे करिता पंचनामा कार्यपध्‍दती व पीक नुकसान सूचना फॉर्म व झालेल्‍या नुकसानीचा पंचनामा नमुना फॉर्म आण्‍ाी महाराष्‍ट्रातील जिल्‍हानिहाय विमा कंपनी यांचे नाव , पत्‍ता व संपर्क क्रमांक ईत्‍यादी सर्व प्रकारची माहीती मिळविणे करिता खाली दिलेल्‍या लिंक चा उपयोग करावा.  २७ सप्टेंबर, २०१६

  आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्‍याचे सॉफ्टवेअर

                           गाव नमुना 7/12 वरिल खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढणे  आपनास सुत्र माहीत नसेेल तर कठीण व्‍ा अवघड जाते  त्‍या साठीच कोणतेही सुत्र न वापरता खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र  काढण्‍यासाठी मा श्री ईकबाल मुलानी कोरेगांव जि.सातारा यांनी अत्‍यंत सोप्‍या पध्‍दतीचे आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्‍याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे.  या सॉफ्टवेअर चा उपयोग सर्वांना व्‍हावा या साठी डॉ.संजय कुंडेटकर,उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी ते उपलब्‍ध करुन दिले आहे. खाली दिलेल्‍या लिंक वरुन सदर सॉफ्टवेअर मिळवीता येईल. महसुल मधिल सर्व कर्मचारी /अधिकारी यांना अत्‍यंत उपयुक्‍त सॉफ्टवेअर (नविन बदलासह तयार केले आहेत. NLRMP  साठी आवश्‍यक बदल करण्‍यात आले अााहे.)


  ५ सप्टेंबर, २०१६

  मृत्‍यपुर्व जबाब व मृत्‍युच्‍या कारणांचा पंचनामा.

             मृत्‍यपुर्व  जबाबाची तरतदू भारतीय पुरावा कायदा, कलम ३२ (१) अन्ववये आहे. महसलू खात्यामध्ये काहीवेळा  दंडाधिकारी या नात्यााने मृत्‍यपुर्व जबाब नोंदवावा लागतो. परंतू या बाबत पुरेसे ज्ञान नसल्याने न्यायालयात साक्ष देतांना गोंधळ उडतो, न्यायालयीन निकालपत्रात, अशा मृत्‍यपुर्वव जबाबावर ताशेरे ओढले जातात व आरोपीचे बाजूने निकाल दिला जातो. मृत्‍यपुर्व जबाबाबाबत काही माहीती खालील प्रमाणे:

  मृत्‍युच्‍या कारणाांचा पांचनाम्या बाबत (Inquest Panchanama)
   सांशयास्पद मृत्यु, बेवारस प्रेत, हुंडाबळी, पोलीस कोठडीतील मृत्‍यु अशा अनेक बाबतीत कार्यकारी दंंडाधिकारी या नात्याने मृत्‍युच्‍या कारणाांचा पंंचनामा करावा लागतो. मृत्‍युच्‍या कारणाांच्या पंंचनाम्याची (Inquest Panchanama) तरतुद फौजदारी प्रक्रिया सं‍हिता, कलम १७६ अन्वये आहे.परंंतू या बाबत पुरेसे ज्ञान नसल्याने कधी कधी गाेंधळ  उडतो. ज्या वेळेस प्रेत शवविच्छेदनाला (post-mortem) पाठवले जाते त्यावेळेस  मृत्‍युच्‍या कारणाांचा पंंचनाम्याची प्रत सुध्दा सोबत पाठवली जाते. शवविच्छेदन करणारे डॉक्टर या पंचनाम्‍या नुसार प्रेताची पडताळणी करतात. या पांचनाम्यातील दोष/उणिवा आपल्या खात्याचा मान कमी करण्यास कारणीभतू ठरू शकतात. मृत्‍युच्‍या कारणाांचा पंंचनामा बाबत काही माहिती खालील प्रमाणे:    • लेखःः- डॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्‍हाधिकारी सातारा .  ४ ऑगस्ट, २०१६

  मोजणी अभिलेख

                        महसुल विभागातील जमिनी संदर्भातील महत्‍वाचे अभिलेख तयार करणे,जमिनीची मोजनी करणे ई.अनेक प्रकारचे कामे भुमीअभिलेख विभाग करित असतो , तलाठी यांचा वारंवार संबंध भुमीअभिलेखाशी येत असतो.त्‍यामुळेच जमीनीच या मोजणीशी संबंधित  कोणते अभिलेख उपलब्ध असतात याची माहिती तलाठी संंवर्गाला व्‍हावी या दुष्‍टीकोणतुन डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी  ' मोजणी अभिलेख' हा लेख लिहीला  आहे.
  ठळक बाबी.

  1. टिपण बुकः कच्‍चे टिपण / पक्‍के टिपण 
  2. शेतवार पत्रक
  3. कच्‍चा सुड 
  4. प्रतिबुक 
  5. वसलेवार बुक
  6. वाजिब उल अर्ज 
  7. निस्‍तार पत्रक 
  8. आकारबंंद 
  ईत्‍यादी सर्व बाबींची माहीती लेख PDF स्‍वरुपात प्राप्‍त करण्‍यासाठी खालि‍ल लिंक चा उपयोग करा.

  लेखः- डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा
  संकलनः- कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ   २ ऑगस्ट, २०१६

  बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार जमिनीची वर्गवारी

  महसुल विभागात काम करत असतांना मुख्‍यताः आपला संबंध हा जमिनी किंवा शेतजमिनींशी येत असतो.त्‍याामुळे महसुल व वन जमिनीची वर्गवारी आपनास माहीती असणे गरजेचेे ठरते म्‍हणुनच त्‍या बाबत सर्व महसुल मधिल कार्य कारणा-या सर्वांंना याची माहीती व्‍हावी या करिता बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार जमिनीची वर्गवारी यावर छोटासा लेख सादर करित आहो.

  1) सेंट्रल प्रोव्‍हीनसेस अॅंड बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल भाग-1  
  नुसार वन जमिनीची वर्गवारी.
  ( भाग 3, प्रकरण -9 )

  2) बेरार जमिन महसुल संहिता भाग-1  प्रकरण 5 
  नुसार महसुल खात्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनात असलेल्‍या जमिनीची वर्गवारी

  या माहीती चा  फायदा नक्‍कीच  सर्व  महसुल 
  मध्‍ये  काम करणा-या बंधु भगीनींना होईल. वरिल फाईल PDF स्‍वरुपात मिळवीण्‍यासाठी.


  लेखः- कामराज बसवन्‍ना चौधरी
  तलाठी-पुसद जि.यवतमाळ
  9011797779 ckamraj@outlook.com
  www.talathiinmaharashtra.in


  २४ जुलै, २०१६

  गौण खनिज विषयक तरतुदी

     
  महसुल विभागात कार्य करतांना अधिकारी व कर्मचारी वर्गांना विवीध प्रकारची कामे करावी लागतात. त्‍यातील ब-याच कामांबद्दल पुरेशी कायद्यासह माहीती वेळेवर उपलब्ध होत नाही.म्‍हणुन आपले हातुन केवळ माहीती अभावी काही किरकोळ चुका होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.अश्‍याच महत्‍वाच्‍या कामांपैकी  एक म्‍हणजे 'गौण खनिज' .गौण खनिज यातुन आपल्‍या महसुल विभागास बराच महसुल गोळा करता येतो.म्‍हणुनच 'गौण खनिज' विषयक महत्‍वाच्‍या तरतुदी,नियम,अधिनियम व वेळोवेळी  झालेलेे नविन बदल या विषयी संपुर्ण माहीती डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी यांनी त्‍यांंचे गौण खनिज या लेखात दिली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय लातुर,येथे गौण खनिज विभागातील प्रधीर्ग काळाच्‍या अनुभवातुन श्री.पी.डी.पेंडकर,अव्‍वल कारकुन उपविभागीय कार्यालय,लातुर यांनी संंकलीत केलेली  गौण खनिज विषयक माहीती PPT स्‍वरुपात तयार केली आहे.
           वरिल 'गौण खनिज' विषयक दोन्‍ही लेख PDF  स्‍वरुपात मिळविण्‍यासाठी खालील लिंक वर click करा.  १८ जुलै, २०१६

  पिक पाहणी व वहिवाट प्रकरणे

                                            1 ऑगष्‍ट पासुन महसुली वर्ष सुरु झाल्‍यावर तलाठी यांना म.ज.म.अधि 1966 खंड 4 प्रमाणे नेमुन दिलेेल्‍या वेेळापत्रका प्रमाणे कामे करणे अपेक्षीत आहे. परंतु आज तलाठी संवर्गाला याआपल्‍या मुळ कामांसाठी त्‍यांचेवर असलेल्‍या अनेक गैरमहसुली कामांच्‍या अवाजवी जबाबदारी मुळे मुळ तलाठी महसुली कामे वेळेवर करणे शक्‍य नाही.व त्‍या गैरमहसुली कामांच्‍या व्‍यापामुळे मुळ महसुली माहेवारी कामांबद्दल जाणुन घेणे किंवा त्‍याची माहीती घेणे शक्‍य होत नाही.त्‍यामुळेच डॉ.संजय कुंडेटकर ,सर उपजिल्‍हाधिकारी,यांनी तलाठी यांना त्‍यांचे कामामध्‍ये मदती सााठी अनेकलेख लिहीले आहे. त्‍यापैकीच एक लेख  आज प्रकाशित करीत आहो. 'पिक पाहणी व वहीवाट प्रकरणे ' सदर लेखातील ठळक बाबी.
  1. जमिन कसणे म्‍हणजे काय ?
  2. वहीवाट रित.
  3. पिकपाहणी कायदेशिर तरतुद.
  4. कार्यवाही.
  5. पिक पााहणीतील संभाव्‍य चुका
  6. वहीवाट प्रकरणे.     वरिल सर्व माहीती साठी खालील दुव्‍यावर जा.

  १ जुलै, २०१६

  *गोष्टीरुपी एकशेएक फेरफार फ्लिप बुक*

                                                 
                    डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "महाराष्ट्रातीलतलाठी"www.talathiinmaharashtra.in)या संकेत स्थळा साठी सर्व प्रथम "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे.महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवणे साठी सदर पुस्तकाची फ्लीप बुक स्वरुपातील प्रत प्रकाशित करीत आहो. खाली दिलेल्या लिंक वरुन पुस्तक संगणकावर डाऊनलोड करुन त्यास पासवर्ड १२३४५ देवुन साध्या पुस्तकाप्रमाणे संगणकावर वाचता येईल.

  २७ जून, २०१६

  महसुल अहर्ता परिक्षा (RQT) नियम,अभ्यासक्रम व नमुना प्रश्न पत्रीका.

                       तलाठी संवर्गातुन मंडळअधिकारी व कनिष्ठ लिपीक संवर्गातुन अव्वल कारकुन पदोन्नती साठी आवश्यक असणारी सर्वात महत्वाची परिक्षा म्हणजे "महसुल अहर्ता परिक्षा".या परिक्षेसंदर्भातील सर्वअटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे. तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्न पत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व महसुल मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ७ देण्यात येत आहे.महसुल अहर्ता परीक्षा (RQT)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित. 

  * संकलन:-*
  १) गजानन वि.कुरणे, लिपीक भुसंपादन ११ 
  जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापुर 
  २) शशिकांत सानप, तलाठी पळस्पे
     ता.पनवेल.जि.रायगड

  संकलन 
  आशिष पैठणकर अव्वल कारकून 
  विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद 

  :-Created By.!:-
  Kamraj Chaudhari Talathi Pusad.
  dist yavatmal 9011797779
  www.talathiinmaharashtra.in

  ८ जून, २०१६

  *गोष्टीरुपी एकशेएक फेरफार *

                   
           तलाठी यांचे दैनिक कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे "फेरफार".
  महसुल खात्यामध्ये नव्याने रुजु झाल्यावर तलाठीयांना फेरफार नोंदी बाबत बराच संभ्रम असतो.नेहमीपेक्षा वेगळी फेरफार नोंद आली की काहींचा गोंधळ उडतो.कोणतीही घटना गोष्टीरुपात सांगितली तर ती बऱ्याच काळ लक्षात राहते. गोष्टीरुपी सांगितलेला फेरफार नोंदीचा ही असाच उपयोग होऊ शकतो याच कल्पनेतुन डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक  सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे..  महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवावे म्हणजे आपले दैनदिनफेरफाराचे काम अधिक सुलभ होईल.सदर पुस्तक PDFस्वरुपात मिळविण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.


  लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी 
         महाराष्ट्र शासन dcsanjayk@gmail.com

  संकलन:- कामराज ब चौधरी तलाठी-पुसद 
               ता.पुसद जि.यवतमाळ ckamraj@outlook.com
  प्रकाशक:- www.talathiinmaharashtra.in
  ( महाराष्ट्रातील तलाठी यांचे कार्यासाठी उपयुक्त असे एकमेव संकेत स्थळ. )


  २३ मे, २०१६

  महत्वाचे शासन निर्णय (भाग १)

  📄महत्वाचे शासन निर्णय (भाग १)✍🏻
  ☄महसुल विभागातील  सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे “तलाठी”. गाव पातळीवर काम करत असतांना अनेक वेळा वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त निर्देशा नुसार.विवीध प्रकारचे पंचनामे व स्थनिक चौकशी करावी लागते.बरेच वेळी सदर चौकशी ,पंचनामे करतांना संदर्भा करीता शासन निर्णयाची आवश्यकता भासते...त्याच करीता  श्री.शशिकांत सानप. तलाठी. ता. पनवेल यांनी संकलीत केलेल्या महत्वाच्या शासन निर्णयाचा भाग १
  “महाराष्ट्रातील तलाठी”  ह्या संकेत स्थळावर प्रकाशित होत आहे.
  धन्यवाद.....!


  🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
  संकलन- शशिकांत सानप.तलाठी पळस्पे ता. पनवेल.जि.रायगड
  Created By.
  Kamraj Chaudhari Talathi Pusad.dist yavatmal 9011797779
  www.talathiinmaharashtra.in


  १८ मे, २०१६

  विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम व नमुना प्रश्न पत्रीका.

                                                         हाराष्ट्रातील सर्व तलाठी यांचे साठी अत्यंत महत्वाची सेवांतर्गत परिक्षा म्हणजे " विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)"या परिक्षेसंदर्भातील सर्व अटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे.तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्नपत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व तलाठी मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ४ देण्यात येत आहे. विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित. 


  ८ मे, २०१६

  ई-फेरफार Edit Module Usermannaul

                ई-फेरफार प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी साठी शासनाने ई-फार प्रकल्पांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख ( गा.न.७/१२) तंतोतंत जुळविणे बाबत दि नांक ०७/०५/२०१६ रोजी परि पत्रक काठुन त्यानुसार कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे ह्या Edit Module चा उपयोग कसा कराव या बाबत user mannual दिले आहे ते Manual व मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचे ई-चावडी व ई-फेरफार संबंधी सर्व परिपत्रक प्राप्त करुन घेणे साठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  ७ मे, २०१६

  वारसा कायदे व मृत्युपत्र नियम मार्गदर्शिका

  हसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्‍हणजे वारस विषयक तरतुदी. हा विषय अत्‍यंत किचकट असून हिंदू, मुस्‍लिम आणि पारसी धर्मियांसाठी यात भिन्‍न तरतुदी समाविष्‍ट आहेत. महसूल खात्‍यात अनेक वेळा सर्व धर्मिय वारसांच्‍या नोंदी हिंदू धर्मिय लोकांना लागू असलेल्‍या कायद्‍यानुसार नोंदविल्‍या जातात. यामुळे भविष्‍यात अनेक कायदेशीर गुंतागुत निर्माण होण्‍याची शक्‍यता असते. वारस नोंद हा विषय तलाठी स्‍तरापासून ते अधिकारी स्‍तरापर्यंत अनेक वेळा हाताळला जातो. हा विषय किचकट असल्‍याने याबाबतीतला प्रकरणे काहीशी उपेक्षीत असतात. 
  महसूल खात्‍यातील दुसरा किचकट व संभ्रमात पाडणारा विषय म्‍हणजे मृत्‍यूपत्राची नोंद. अनेक वेळा तलाठी स्‍तरावर मृत्‍यूपत्राच्‍या नोंदी चुकीच्‍या घेतल्‍या जातात किंवा संबंधीताला न्‍यायालयाचा रस्‍ता दाखविण्‍यात येतो. अधिकारी स्‍तरावरही याबाबत बराच संभ्रम आहे.
   खरेतर वारस नोंद किंवा मृत्‍यूपत्राची नोंद हा खुप काळजीपूर्वक व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करुन हाताळण्‍याचा विषय आहे. यात वारसा हक्‍क समाविष्‍ट असल्‍याने तो सामान्‍य जनतेसाठीही जिव्‍हाळ्‍याचा विषय आहे.

  वारस विषयक तरतुदी आणि मृत्‍यूपत्राची नोंद याबाबत महसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा संभ्रम दुर व्‍हावा या दृष्‍टीकोनातून "हिंदू, मुस्‍लिम, पारसी वारसा कायदे आणि मृत्‍यूपत्राबाबत महत्‍वाच्‍या तरतुदी" हा लेख  जमेल तितक्‍या सोप्‍या भाषेत डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार करुन सादर केला आहे. सदर लेख पुस्तक (PDF) स्वरुपात मिळविण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.


  लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर ,बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,एम.डी., पीएच.डी.               उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग) मो. ९९२२९६८०५५                 e-mail-dcsanjayk@gmail.com  २९ एप्रिल, २०१६

  तलाठी कामकाज मार्गदर्शिका

  हसुल विभागातील सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे "तलाठी"आज गैरमहसुली कामकाजामुळे मुळ महसुली कामा पासुन तलाठी हे दिवसेन दिवस दुर जात आहेत. त्यामुळे तलाठी दप्तराचे योग्य व कायदेशिर मार्गदर्शन मिळत नसल्याने कामकाजात अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याच चुका होवु शकतात.ह्या संभाव्य चुका टाळण्यासाठी व तलाठी कामाकाजाचे संपुर्ण माहीती साठीडॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील संपुर्ण तलाठी यांचे कार्यासाठी त्यांना असलेल्या अथांग महसुली ज्ञानातुन " तलाठी कामकाज मार्गदर्शिका " हे पुस्तक लिहीले आहे.
  ठळक वैशिष्ठे 
  १) गाव नमुने १ ते २१ नमुने व तक्ता 
  २) तलाठी कॅलेंडर ( माहेवार कामकाज माहीती) 
  ३) तलाठी नमुने अद्यावत माहीती
  ४) महत्वाचे शासन निर्णय माहीती.
  सदर पुस्तीका मिळवण्या करिता खालिल दुव्याचा उपयोग करा.

  " तलाठी कामकाज मार्गदर्शिका " PDF पुस्तीका.

  लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर,
              उपजिल्हाधिकारी सातारा.
  संग्रह :- कामराज चौधरी,
        तलाठी पुसद जि.यवतमाळ
  www.talathiinmaharashtra.in
  तलाठी व महसुल कर्मचारी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त असलेले संकेत स्थळ 

  १८ एप्रिल, २०१६

  गाव नमुना ७/१२ संबंधी सविस्तर माहीती

   तलाठी दप्तरातील सर्वात महत्वाचा नमुना व ज्या नमुन्यावर 
  संपुर्ण तलाठी रेकॉर्ड अवलंबुन आहे. तो नमुना म्हणजेच गाव नमुना ७ व १२ 
  गाव नमुना ७ वर जमिनीच्या क्षेत्राची , मालकीबाबत ई माहीती असते त्याच बरोबर 
  त्या जमिनीवरील पिकांची माहीती गाव नमुना १२ मध्ये असते हे दोन्ही नमुने 
  ऐकमेकास पुरक असल्यानी ते एकत्र केलेले आहेत. म्हणुन त्यास आपन ७/१२ म्हणतो.
  तसेच सर्व शेतकरी यांच्या संपुर्ण शेत जमिनीची माहीती गाव नमुना ७ व १२ 
  मध्ये असल्याने त्यांचा सुदधा ७/१२ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. गाव नमुना 
  ७ व १२ कायदेशिर व सविस्तर माहीती खालील लिंक वर उपल्बध करुन दिली आहे.
  जसे 
  १) गाव नमुना ७ व्याख्या.
  २) गाव नमुना ७ डावीकडील स्तंभा बाबत.
  ३) गाव नमुना ७ मध्य स्तंभा बाबत.
  ४) गाव नमुना ७ उजवीकडील स्तंभा बाबत 
  ५) भोगवटदार व त्यांचे प्रकार 
  ६) पोटखराब व त्यांचे प्रकार 
  ७) गाव नमुना १२ व त्यातील स्तंभा बाबत
  ८) वरिल सर्व बाबतीची कायदेशिर तरतुदी  
  ईत्यादी सर्व प्रकारांची माहीती. 


  लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
  संकलन :- कामराज ब चौधरी ,
  तलाठी- पुसद जि यवतमाळ  9011797779
  ckamraj@outlook.com
  www.talathiinmaharashtra.in

  १७ एप्रिल, २०१६

  तलाठी कामकाज कॅलेंडर.

  तलाठी हा महसुल विभागात कार्यरत महत्वाचा घटक आहे 
  शासनाच्या बहुतांशी योजनांची अमंलबजावणी तलाठी यांचे कडुनच 
  केली जाते त्या मुळे तलाठी यांचे वर गैरमहसुली कामांचा बोजा दिवसेन दिवस 
  वाढत आहे. या वाढत्या बोजा मुळे तलाठी त्यांचे मुळ महसुली कामापासुन दुर जात 
  आहेत. त्यानुसार वार्षीक कामे माहेवार कोणती व ती कधी पुर्ण करावी या साठी 
  खालील लिंक वर तलाठी यांना माहेवार कोणती कामे करावी या बाबत कॅलेंडर दिले आहे.  लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
  संकलन :-  कामराज ब चौधरी ,तलाठी- पुसद जि यवतमाळ 
  ई-मेल पत्ता :-ckamraj@outlook.com
  ब्लॉग पत्ता :-www.talathiinmaharashtra.in
  संपर्क :- 9011797779

  १४ एप्रिल, २०१६

  प्रधानमंत्री पिक विमा योजना

  महाराष्ट्रासह अवघ्या भारतात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथे “लोहडी” पूर्व भारतात बिहार मध्ये “संक्रांति” नावाने आणि  आसाम येथे येथे “भोगाली बिहू” व गुजरात आणि राजस्थान येथे “उत्तरायण” तर दक्षिण भारतात तामिळनाडूत “पोंगल” या नावाने हा सण साजरा केला जातोय.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना अंमलात आणून  खऱ्या अर्थाने मकरसंक्रांति दरम्यान होणारे उत्तरायण लाभदायी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” या नवीन पीक विमा योजनेला  मंजुरी देण्यात आली.
  मागील काही काळापासून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी हि एक संजीवनी देणारी योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही तृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्याला नुकसान किती प्रमाणात झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, मोबाईल मॅपिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळू शकेल.
  भारताचा विचार केल्यास उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू भारतात असतात. भौगोलिक विविधतेनुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर गारपीट किंवा एखाद्या रोगामुळे होणारे पिकाचे नुकसान या सगळ्यामुळे शेतकरी बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागते. यामुळे खचून जाणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा पीकविम्याचाच असतो.
  मात्र धोरणातल्या, सरकारी कारभारातल्या अनेक त्रुटींमुळे पीकविम्याचे पैसे अनेकदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाहीत. शेतकऱ्यांना योग्य आणि त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी या योजनेत विशेष लक्ष दिले गेले आहे. साधारणतः विम्याचा प्रिमियम १५ टक्क्यापर्यंत असतो मात्र नव्या धोरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २ ते २.५ टक्केच ठेवण्याचा विचार आहे. याबरोबरच, ड्रोन सारखा आधुनिक तंत्रज्ञानानं पंचनामे जलद, अचूक होण्यास मदत होईल.
  योजनेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे :-
  १. सर्व खरीप पिकांसाठी २ टक्के तर सर्व रब्बी पिकांसाठी १.५ टक्के इतका समान विमा हफ्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. वार्षिक व्यावसायिक  आणि फलोत्पादन पिकांसाठी शेतकऱ्यांना ५ टक्के इतका हफ्ता भरावा लागेल. शेतकऱ्यांनी  विमा हफ्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हफ्त्यांची  उर्वरित  रक्कम सरकारतर्फे जमा केली जाईल.
  २.  सरकारी अनुदानाला कोणतीही कमाल मर्यादा नाही. उर्वरित हफ्ता 90 टक्के असला तरी तो सरकारतर्फे जमा केला जाईल.
  ३.  यापूर्वी हफ्त्याच्या रकमेवर मर्यादेची तरतूद असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा दाव्यांपोटी कमी रक्कम मिळत होती. हफ्ते  अनुदानावरील सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मर्यादेची तरतूद होती. आता ही मर्यादा काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वजावटीशिवाय विमा दाव्याची संपूर्ण रक्कम  मिळू शकेल.
  ४.  तंत्रज्ञानाच्या वापराला मोठे प्रोत्साहन मिळेल. पिक कापणीसंदर्भातील माहिती स्मार्ट फोनद्वारे सादर करणे शक्य होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना दाव्यापोटी  मिळणारी रक्कम मिळवण्यात होणारी दिरंगाई टाळता येईल.
  पिक कापणी प्रयोगांची संख्या घटविण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर केला जाईल.
  “एक देश एक योजना” या संकल्पनेवर नवी पीक विमा योजना आधारीत आहे. यात यापूर्वीच्या सर्व योजनांमधील चांगल्या वैशिष्टयांचा समावेश आहे. तसेच यापूर्वीच्या सर्व योजनांमधील  त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
  पीक विमा योजना-तुलना
  क्रं.वैशिष्टयेराष्ट्रीय पीक विमा योजना

  [1999]
  सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजना

  [2010]
  पंतप्रधान पीक विमा योजना
  1हफ्त्याची रक्कमकमीजास्तराष्ट्रीय पीक विमा योजनेपेक्षा कमी
  (शेतकरी हिश्श्याच्या पाचपट रक्कम सरकारद्वारे प्रदान)
  2एक हंगाम एक हफ्ताहोयनाहीहोय
  3सुरक्षित विमा रक्कमसंपूर्णमर्यादितसंपूर्ण
  4खात्यात भरणानाहीहोयहोय
  5स्थानिकृत जोखीम  संरक्षणनाहीगारपीट
  दरड कोसळणे
  गारपीट दरड कोसळणे

  पूर
  6सुगीपश्चात नुकसान संरक्षणनाहीकिनारी भाग चक्रीवादळ पाऊसवादळ +अवकाळी पाऊस
  7प्रतिबंधात्मक लागवड संरक्षणनाहीहोयहोय
  8तंत्रज्ञानाचा वापर
  (दावे जलद निकाली काढण्यासाठी)
  नाहीसंकल्पितबंधनकारक
  9जागृतीनाहीनाहीहोय(संरक्षण 50 टक्के इतके दुप्पट करण्याचे लक्ष्य)


  संदर्भ/ सौजन्य:- दैनिक लोकमत  नागपुर आवृत्ती.   ५ एप्रिल, २०१६

  महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार वाटणी ची कार्यवाही.

                              आपले वडीलोपार्जित जमिनीचे वाटप करणे करिता आपनास काय करावे लागेल याची फारसी कायदेशिर माहीती मिळत नाही. त्यामुळे वाटणी करणे राहुन जाते किंवा लांबणीवर पडते. त्यानुसार वडीलोपार्जित जमिनीचे वाटप/ विभाजन/वाटणी करणे साठी काय करावे व त्‍या वर कार्यालयाने महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार विभाजन / वाटणी करणे करीता कोणती पध्दती अवलंबवावी व कार्यवाही करावी या बाबत माहीती दिली आहे. ती खालील लिंक वरुन मिळविता येईल

  १) खातेदारानी वाटणी अर्ज कसा करावा या बाबतचा नमुना
  २) अर्जदारास मार्गदर्शक सुचना 
  ३) प्रकरणाची तपासणी सूची (Checklist)
  ४) स्व-कष्टार्ज‍ित अर्जीत मालमत्तेला सयुंक्त कुटूंब मालमत्ता म्हणून घोषीत करण्याकरीता शपथेवर दिलेल्या साक्षीचा नमूना.
  ५) सह हिस्सेदार व हितसबंधतांना द्यावयाची नोटीस नमुना 
  ६) उद्घोषणा
  ७) महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचेविभाजन) नियम 1967  संकलन:-  कामराज ब चौधरी 
  तलाठी - पुसद जि.यवतमाळ ९०११७९७७७९
  ckamraj@outlook.com
  www.talathiinmaharashtra.in


  २५ मार्च, २०१६

  माहीतीचा अधिकार २००५ नुसार कलम ४ अन्वये स्वंयप्रेरणेने करावयाची कार्यवाही नमुना पुस्तीका.

  माहीतीचा अधिकार २००५ नुसार कलम ४ अन्वये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने 
  # आपली रचना कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल.
  # आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये 
  # निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती 
  # जनमाहीती अधिकाऱ्यांची नावे ,पदनाम आणि इतर तपशिल.
  # प्रत्येक माहीती ,विस्तुत प्रमाणात आणि लोकांना सहजपणे 
  उपलब्ध होईल अशा स्वरुपात आणि अशा रीतीने ' प्रसारित" करणे 
  ईत्यादी सर्व स्वरुपाची माहीती माहीतीचा अधिकार २००५ नुसार कलम ४ अन्वये
  आपनहुन प्रसिध्द करणे ही यादी प्रत्येक संचालयास विभागाकडुन प्रसिध्द होणे 
  बंधनकारक आहे.
  करिता "संगणकीकरणासाठीचा कृती आराखडा " pdf स्वरुपात खलिल लिंक वरुन मिळवा.


  संदर्भ :- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,(यशदा) पुणे
               www.yashada.org 


  ३ मार्च, २०१६

  कायदा माहीतीचा अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा.


   सर्व शासकिय कर्मचारी व अधिकारी यांना त्यांचे दैनदिन कार्यात मदत होण्याचे दृष्टीणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,(यशदा) पुणे यांचे वतीने १) माहीतीचा अधिकार अधिनियम २००५ २) महाराष्ट्र शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ ३) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ या तीन कायद्यांची माहीती देणारे अधिकृत पुस्तक 'कायदा माहीतीचा अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा" हे पुस्तक (यशदा) पुणे यांनी त्यांचे संकेत स्थळावर PDF स्वरुपात उपल्बध करुन दिले आहे.खालिल लिंक चा उपयोग करुन आपन ते पुस्तक( PDF ) मिळवु शकाल.


  लेखक:- १) मा.श्री.शेखरगायकवाड सर (भाप्रसे) 
              २) मा.श्री. प्रल्हाद कचरे सर.(अप्परजिल्हाधिकारी)
  संदर्भ.:- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,(यशदा) पुणे
               www.yashada.org 


  १६ फेब्रुवारी, २०१६

  महत्वाचे फेरफारांचे प्रकार व त्यावरील कार्यवाही. (हक्क नोंदणी)

       महसुल विभागात कार्यरत तलाठी / कर्मचारी यांना योग्य व सविस्तर मार्गदर्शनासाठी मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ' महसुली कामकाज पुस्तीका " हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्या मार्गदर्शिके नुसार तलाठी यांचे दैनिक कामकाजातील भाग "हक्क नोंदणी" फेरफाराचे एकुण ३३ प्रकार दिले आहे ते सर्व प्रकार "महाराष्ट्रातील तलाठी " ह्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. खालिल लिंक (दुव्याचा) वापर करुन ते मिळवता येईल.  
  संदर्भ 'महसुली कामकाज पुस्तीका" लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा dcsanjayk@gmail.com

  ११ फेब्रुवारी, २०१६

  DCPSकपातीचे वार्षिक विवरण (R3-Report)शोधण्याची पध्दती.

                                            १ नोंव्हे २००५ नंतर शासकिय सेवेत रुजु झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांना अंशदायी निवृत्ती योजना DCPS लागु केली आहे त्या नुसार आपले मासीक पगारातुन दरमाह १०% रक्कम कपात करण्यात येते व तेवढीच रक्कम शासन जमा करत असते. त्या कपाती नुसार सन २००७-२००८ पासुन ते सन २०१४-२०१५ पर्यंतचे वार्षिक विवरण ( Form R3-Report)आपले सेवार्थ खातेवर देण्यात आले आहे. ते सर्व विवरण पाहुन missing amount बद्यल प्रस्ताव सादर करुन हि रक्कम आपले खात्यात जमा करुन घ्यावी लागेल.खालिल दोन्ही लिंक चा वापर करुन आपन आपले R3report पाहु शकता व missing amount शोधुन
  ते आपले DCPS खात्यात जमा करु शकाल.  ८ फेब्रुवारी, २०१६

  अाॅनलाइन ७/१२ च्या PDF merge करण्याची पध्दती

                                                मा. जमाबंदी आयुक्त पुणे यांचे दि ०३/१२/२०१५ चे परिपत्रकानुसार ७/१२ तंतोतंत जुळविण्यासाठी ऑनलाईन ७/१२ चे pdf तयार करणेकरिता आपनास
  https://10.187.203.108/OPG ही URL देण्यात आली आहे त्या नुसार pdf तयार झाल्यावर त्या एकुण ७/१२ च्या संखेनुसार DOWNLOAD होतात.त्या सर्व स्वतंत्र ७/१२ च्या PDF एकाच PDF फाईल मध्ये तयार करणे साठी खालील लिंक चा वापर करून PDFMERGETOOLहे सॉफ्टवेअर मिळवा.


  २१ जानेवारी, २०१६

  इन्कम Tax फाईल. (Software)

  •  आपले इन्कम TAX आपणच भरा..
  👉🏻खालील लिंकवर  क्लिक करुन फाईल डाउनलोड करा. संगणकावर ती फाईल Excel मध्ये ओपन होईल. Payment Sheet वर आपले मार्च व जुलैचे बेसिक, ग्रेडपे सह ॲड करा तसेच आपले  deduction त्यामध्ये टाका.

  👉🏻D.A diff. यामध्ये जुन 2015 च्या पगारात व आता जाने  2016 ला मिळेल  ते  DA arress. मिळाले आहे ती रक्कम तेथे टाका.

  👉🏻तुमचा income tax फॉर्म Tax Sheet वर तयार होईल. आता त्याची प्रिंट काढून फॉर्म सबमिट करा.
  👉🏻खालील लिंकवर क्लिक करुन इन्कम Tax फाईल डाउनलोड करा.

       (संकलन :- श्री सुधाकर गिेरे  तलाठी  ता.खामगांव  ) 


  १३ जानेवारी, २०१६

  बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation)

       ई- फेरफार प्रकल्पा अंतर्गत संगणकीय  ७/१२ मध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने  मा.जमाबंदी आयुक्त पुणे यांनी मा. उच्च न्यायालयाचे आदेशाने दि. ०३/१२/२०१५ रोजी परीपत्रक काठुन ७/१२ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार आता ऑनलाईन ७/१२ pdf स्वरुपात  बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे  (online PDF generation) https://10.187.203.108/OPG हया लिंक वर उपलब्ध आहे.सदर बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation) usermanual डाऊनलोड करण्यासाठी खालिल लिंक वर जावुन मिळवा.
  ४ जानेवारी, २०१६

  ऊपयुक्त फार्म.

  शासकिय सेवेत असतांना ज्या प्रमाणे आपनास आपले पदास असलेले संपुर्ण कर्तव्य पार पाडावे लागते त्यानुसार खाली नमुद केल्या प्रमाणे  आपनास काही सोई सुविधा सुध्दा आहेत त्यातील काही निवडक सुविधा आवश्यक  नमुन्यासह दिल्या आहे.
   
  -: ऊपयुक्त फॉर्म :-
  ➡१. शासकिय गृह कर्ज घेण्‍याकरिता करावयाच्‍याअर्जाचा नमुना
  ➡२. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्‍या अर्जाचा नमुना (इंग्रजी)
  ➡३. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्‍या अर्जाचा नमुना (मराठी)
  ➡४. मोटार कार/ मोटार सायकल/ स्‍कुटर/मोपेड /वैयक्‍तीक संगणक खरेदी करण्‍यासाठी करावयाच्‍या अग्रीम अर्जाचा नमुना
  ➡५. राज्‍य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ खालील लाभांसाठी नामनिर्देशन (प्रपत्र ७ )
  ➡६. कुटूंब निव्रत्‍ती वेतना साठी नामनिर्देशन (नमुना ई )
  ➡७. निव़त्‍ती वेतनासाठी लागणारे फॉर्म नमुना-१,२, ३, ४, ५, हयात प्रमाणपत्र ,
  विभागाने भरावयाचे विवरणपत्र. वरिल सर्व अर्ज व विवरण पत्र मिळविण्यासाठी
  http://goo.gl/XVcLNX ह्या लिंक चा वापर करा.