• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  ३० सप्टेंबर, २०१५

  ई-फेरफार साठी आपले Laptop वर करावयाच्‍या आवश्‍यक बदला बाबत.

                                                          आपले तालुक्‍यात ई-फेरफार प्रकल्‍प सुरु झाल्‍यावर काय कार्यवाही करावी या बाबत मागील महीण्‍यातील 03/08/2015 तारखेचे लेखात त्‍यावर सविस्‍तर मार्गदर्शन आवश्‍यक लींक व्‍दारे आपनघेतले आहे. पण्‍ा आपनास आपले laptop वरती कोणती व कशी सेटींग्‍स करावी याबाबत फारसी माहीती मिळत नाही. त्‍यानुसार आपन सर्व प्रथम्‍ा आवश्‍यक असणारे सर्व  software download करावे उदा. active X control , DSC drivers , Forticlintsslvpn, Ism V6, or marathi Indic, pdf cute writer  , java ,Adob Redder  ईत्‍यादी. त्‍यानंतर आपले laptop वर कशी settings करावयाची याची माहीती खालील दुव्‍यावर ( लिंक) वर जावुन पहा.


  २२ सप्टेंबर, २०१५

  पिक पैसेवारी

                            ग्राम पातळीवर पिकपैसेवारी नुसार गावांना वि‍वीध सोयी ,सवलती देण्‍यात येतात. त्‍यानुसार ग्राम पैसेवारी समीती स्‍थापन करुन पिककापणी प्रयोगाव्‍दारे पिक पैसेवारी काठली जाते  त्‍यानुसार 
  • त्‍या स‍मितीत कोण्‍ा कोण्‍ाते व किती सदस्‍य असतात. 
  • पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती काय 
  • पिक पैसेवारी काढण्‍याची नविन पध्‍दती काेणती ? ई बाबत माहीती  व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्‍त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना खालील PDF  लिंक चा वापर  करुन मिळवा 

  1. गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती 
  2. सर्व सभांचे ईतिवृत्‍तासह  पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना 
  3. शासन निर्देशानुसार नविन पध्‍दतिने प्रमानभुत उत्‍पन्‍न ठरवुन पैसेवारी काढण्‍याची पध्‍दती

  १५ सप्टेंबर, २०१५

  बळीराजा चेतना अभियान.

             
   आपले राज्‍यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्‍तीने फार खचुन गेला आहे. त्‍यातुनचएकुन राज्‍यातील शेत‍क-यांचे आत्‍महत्‍या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे शेतक-यांच्‍या मनामध्‍ये जगण्‍याची जिद्य निर्माण व्‍हावी. त्‍यांना सक्षम करणेच्‍या दु्ष्‍टीने शासनाने विविध योजनेसह ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे. हया अभियाना दरम्‍यान आपन काय करावे ? आपली एक सुजान नागरीक, शिक्षक, व्‍यापारी, नोकरदारवर्ग, आदी म्‍हणुन काय जबाबदारी आहे?. या विषयी व काय ? आहे हे 'बळीराजा चेतना अभियान' म्‍हणजे काय ? सा संदर्भात  मा. राजेश खवले सर.निवासी उपजिल्‍हाधिकारी, यवतमाळ. यांनी   मार्गदर्शक पत्राकाद्वारे माहीती दिली आहे.
                                      बळीराजा चेतना अभियान म्‍हणजे काय ?  हृया बाबतचे मा. खवले सरांचे आव्‍हानात्‍मक मार्गदर्शक पत्रक येथे पहा.     
  • बळीराजा चेतना अभियान.  
   समितीची रचना  ,  बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्‍ती व संस्‍था ,  बळीराजा चेतना  
  अभियानाची उद्दिष्‍टे , ई बाबतचे माहीतीचे शासन निणर्य येथे पहा.

  ७ सप्टेंबर, २०१५

  ईनाम आणी वतनी जमिनी बाबत.

                            महसुल विभागात काम करत असतांना आपनास अनेक विषय हाताळावे लागतात व त्‍या विषयी आपले मनात अनेक संभ्रम असतात. असाच एक विषय म्‍हणजे ईनाम आणी वतन जमिनी  हया बाबत खालिल दर्शविलेली माहीती आपनास दिलेल्‍या लिंक वर जावुन मिळेल जसे.
  • 1) ब्रिटीश कालीन वतनाचे तिन वर्ग कोणते.?     
  • 2) इनाम जमिन म्‍हणजे काय ?   
  • 3) इनामाचे प्रकार किती ?  व कोणते. ?  
  • 4) वतन जमिन म्‍हणजे काय ?  
  • 5)  वतन जमिन कायदे कोणते?  
               वरिल दोन्‍ही जमिनी विक्री बाबत नविन धाेरण  व सुधारणा या बाबतचे संपुर्ण मार्गदर्शनासाठी व माहीती साठी . 'महसुल कामकाज पुस्‍तिका ' इनाम आणी वतन जमिनी PDF येथे पहा.

  संदर्भ-  'महसुल कामकाज पुस्‍तिका '
   लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर, 
  उपजिल्‍हाधिकारी ,महाराष्‍ट्र शासन 
  dcsanjayk@gmail.com

  ५ सप्टेंबर, २०१५

  ऑनलाईन ई-फेरफार आझावलीमध्‍ये भरलेल्‍या चुकीच्‍या क्रमांकामध्‍ये दुरुस्‍ती बाबत.

                             आपले तालुक्‍या ऑनलाईन ई-फेरफार प्रकल्‍पाची अंमलबजावणी करित असतांना तलाठी यांचे कडुन आपले साजातील गावनिहाय शेवटचा फेरफार क्रमांक नोंदविल्‍या जाते . त्‍यानंतरच प्रत्‍यक्ष ऑनलाईन फेरफार ची अंमलबजावणी होते. परंतु अनेक तलाठी यांचे कडुन शेवटचा फेरफार नोंदवितांना चुका होतात व ती चुक दुरुस्‍ती साठी NIC  कडे मागणी करावी लागते. आता या पुढे अशी फेरफार नोंदवितांना होणारी चुक जिल्‍हा स्‍तरावर दुरुस्‍ती करता येणार आहे. त्‍यानुसार जिल्‍हयाचे डिस्‍ट्रीक डोमेन एक्‍स्‍पर्ट (डी.डी.ई ) यांना तालुक्‍यातील ज्‍या गावात ऑनलाईन फेरफार अद्याप घेतलेले नाही त्‍या साठी ही सुविधा वापरता येईल.
                          url- https://10.187.203.132/usercreation  येथे ( डी.डी.ई ) यांनी  लॉग ईन होवुन 'फेरफार क्रमांकाची दुरुस्‍ती करणे ' हा पर्याय वापरुन जिल्‍हा स्‍तरावर फेरफार क्रमांक दुरुस्‍ती  करतांना खाली दर्शविलेल्‍या मा.जमाबंदी आयुक्‍त, पुणे यांचे  पत्रान्‍वये कार्यवाही अवलंविण्‍यात यावी.