• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २३ मे, २०१६

  महत्वाचे शासन निर्णय (भाग १)

  📄महत्वाचे शासन निर्णय (भाग १)✍🏻
  ☄महसुल विभागातील  सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे “तलाठी”. गाव पातळीवर काम करत असतांना अनेक वेळा वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त निर्देशा नुसार.विवीध प्रकारचे पंचनामे व स्थनिक चौकशी करावी लागते.बरेच वेळी सदर चौकशी ,पंचनामे करतांना संदर्भा करीता शासन निर्णयाची आवश्यकता भासते...त्याच करीता  श्री.शशिकांत सानप. तलाठी. ता. पनवेल यांनी संकलीत केलेल्या महत्वाच्या शासन निर्णयाचा भाग १
  “महाराष्ट्रातील तलाठी”  ह्या संकेत स्थळावर प्रकाशित होत आहे.
  धन्यवाद.....!


  🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
  संकलन- शशिकांत सानप.तलाठी पळस्पे ता. पनवेल.जि.रायगड
  Created By.
  Kamraj Chaudhari Talathi Pusad.dist yavatmal 9011797779
  www.talathiinmaharashtra.in


  १८ मे, २०१६

  विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम व नमुना प्रश्न पत्रीका.

                                                         हाराष्ट्रातील सर्व तलाठी यांचे साठी अत्यंत महत्वाची सेवांतर्गत परिक्षा म्हणजे " विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)"या परिक्षेसंदर्भातील सर्व अटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे.तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्नपत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व तलाठी मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ४ देण्यात येत आहे. विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित. 


  ८ मे, २०१६

  ई-फेरफार Edit Module Usermannaul

                ई-फेरफार प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी साठी शासनाने ई-फार प्रकल्पांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख ( गा.न.७/१२) तंतोतंत जुळविणे बाबत दि नांक ०७/०५/२०१६ रोजी परि पत्रक काठुन त्यानुसार कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे ह्या Edit Module चा उपयोग कसा कराव या बाबत user mannual दिले आहे ते Manual व मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचे ई-चावडी व ई-फेरफार संबंधी सर्व परिपत्रक प्राप्त करुन घेणे साठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  ७ मे, २०१६

  वारसा कायदे व मृत्युपत्र नियम मार्गदर्शिका

  हसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्‍हणजे वारस विषयक तरतुदी. हा विषय अत्‍यंत किचकट असून हिंदू, मुस्‍लिम आणि पारसी धर्मियांसाठी यात भिन्‍न तरतुदी समाविष्‍ट आहेत. महसूल खात्‍यात अनेक वेळा सर्व धर्मिय वारसांच्‍या नोंदी हिंदू धर्मिय लोकांना लागू असलेल्‍या कायद्‍यानुसार नोंदविल्‍या जातात. यामुळे भविष्‍यात अनेक कायदेशीर गुंतागुत निर्माण होण्‍याची शक्‍यता असते. वारस नोंद हा विषय तलाठी स्‍तरापासून ते अधिकारी स्‍तरापर्यंत अनेक वेळा हाताळला जातो. हा विषय किचकट असल्‍याने याबाबतीतला प्रकरणे काहीशी उपेक्षीत असतात. 
  महसूल खात्‍यातील दुसरा किचकट व संभ्रमात पाडणारा विषय म्‍हणजे मृत्‍यूपत्राची नोंद. अनेक वेळा तलाठी स्‍तरावर मृत्‍यूपत्राच्‍या नोंदी चुकीच्‍या घेतल्‍या जातात किंवा संबंधीताला न्‍यायालयाचा रस्‍ता दाखविण्‍यात येतो. अधिकारी स्‍तरावरही याबाबत बराच संभ्रम आहे.
   खरेतर वारस नोंद किंवा मृत्‍यूपत्राची नोंद हा खुप काळजीपूर्वक व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करुन हाताळण्‍याचा विषय आहे. यात वारसा हक्‍क समाविष्‍ट असल्‍याने तो सामान्‍य जनतेसाठीही जिव्‍हाळ्‍याचा विषय आहे.

  वारस विषयक तरतुदी आणि मृत्‍यूपत्राची नोंद याबाबत महसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा संभ्रम दुर व्‍हावा या दृष्‍टीकोनातून "हिंदू, मुस्‍लिम, पारसी वारसा कायदे आणि मृत्‍यूपत्राबाबत महत्‍वाच्‍या तरतुदी" हा लेख  जमेल तितक्‍या सोप्‍या भाषेत डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार करुन सादर केला आहे. सदर लेख पुस्तक (PDF) स्वरुपात मिळविण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.


  लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर ,बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,एम.डी., पीएच.डी.               उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग) मो. ९९२२९६८०५५                 e-mail-dcsanjayk@gmail.com