• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २२ डिसेंबर, २०१५

    अनधिकृत बिनशेती वापरा बाबत करावयाच्या कार्यवाहीचा नमुना.

                                          आपले साज्या अंतर्गत अनेक वेळा शेतजमिनी वर अनधिकृत, विना परवाना  वाणिज्य किवां औद्योगीक वापर केला जातो. अशा प्रकारचे अनधिकृत , विनापरवाना बिनशेती वापरात बदलाची प्रकरणे आढळुन आल्यावर त्यावर तलाठी या नात्याने कशा प्रकारे अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा या बाबतचा नमुना श्री. शशिकांत सानप तलाठी .पनवेल जि.रायगड यांनी उदाहरणा दाखल तय्यार केला आहे. तो मिळविण्या साठी खालिल लिंक चा वापर करा.

       

    १८ डिसेंबर, २०१५

    तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका.

                            तलाठी हा महसुल प्रशासनाचा कणा मानला जातो. शासनाच्या स्टील फ्रेम प्रशासनाचा  तो गतिमान घटक आहे . नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी  मा. श्रीकर परदेशी सर यांनी या घटकाचे महत्व ध्यानात घेवुन तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांना प्रशिक्षण देवुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले. व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली.                                                                                                    हे पुस्तक सोप्या सहज भाषेत असल्याने ती सर्व तलाठी याना उपलब्ध व्हावी म्हणुन त्या संकलित पुस्तकाची soft copy नांदेड जिल्हातील तलाठी श्री दुगमवार तलाठी देगलुर यांनी उपलब्ध करुन दिली आहे. सदर पुस्तक pdf डाउनलोड करण्याची लिंक  खाली आहे. तरी सर्वांनी याचा फायदा करुन घ्यावा.या पुस्तकाचे सर्व श्रेय तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर व त्यांचे तत्कालीन अधिकारी यांना जाते.

                                 




    १३ डिसेंबर, २०१५

    ७/१२ सदरी बिनशेती नोंद व ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती.

    • मा.जिल्हाधीकारी , मा.अप्पर जिल्हाधीकारी, मा, उपविभागीय अधिकारी  ई  वरिष्ठ कार्यालयातुन आपनास बिन शेती (N.A) आदेश प्राप्त होत असतात .त्याची नोंद आपले ७/१२ सदरी कशी करावी सर्वप्रथम काय कार्यवाही करावी याची माहीती साठी  व  
    • अनेक वेळा तलाठी यांना म.ज.म.अधि.१९६६ चे कलम ८५ अन्वये आदेशची अंमलबजावणी करतांना , न्यायालयीन आदेशा नुसार शेत जमिनीच्या सहधारकां मध्ये वाटणीची नोंद घेतांना संबंधीत व्यक्तीचे क्षेत्रा नुसार  आकार वेगळा दर्शविने व गा.नं. ८अ सदरी नोंद करावी लागते. त्यानुसार  ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती साठी खाली दर्शविलेल्या दुव्यावर जावुन मिळवा 
    लेखक - मा .श्री. डॉ. संजय कुंडेटकर सर.            उपजिल्हाधिकारी सातारा.


    १ डिसेंबर, २०१५

    उत्तराधिकार अधिनियम १९५६ - महत्वाच्या तरतुदी.

    वारसा बाबत फेरफार घेतांना आपनास बऱ्याच अडचणी येते असतात  त्या अडचणी सोडवण्यासाठी मा. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तयार केलेल्या माहीतीचा आपनास फायदा होईल.
    • वारसदार म्हणजे काय व कोण ?
    • उत्तराधिकारी हेाण्यास पात्र व्यक्ती कोण ?
    • वारसाचे वर्ग किती व त्यात समाविष्ठ व्यक्ती कोणत्या ?
    • वर्ग १,२,३,४ चे वारस कोण ?
    • वारसा हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोणत्या ?
    • महत्वाये न्याय निर्णय.
    • भारतीय वारसा अधिनियम १९२५ मधिल महत्वाच्या तरतुदी.
    • एकत्र कुटूंबातील मिळकतीचे वाटप. ईत्यादी संपुर्ण माहीती साठी खालील लिंक चा वापर करा.



    २५ नोव्हेंबर, २०१५

    हिंदु वारसा कायदा १९२५ खालील मृत्यूपत्राच्या तरतुदी.

    लाठी यांचे दैन‍िक कामकाजात अनेक प्रकारचे कागद पत्रे आपले कडे येत असतात त्या आधारावर आपनास बरेच वेळा काही फेरफार घ्यावे लागतात त्या कागदपत्रांन पैकी एक म्हणजे वारस मृत्यूपत्र ह्या पत्रा बाबत सविस्तर माहीती हिंदु वारस कायदा १९२५ नुसार मा.श्री संजय कुंडेटकर सर , उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तय्यार केलेली आहे.
    •   मृत्यू पत्राचे महत्वाचे निकष 
    •   मृत्यू पत्राचे परिणाम
    •  सैनिकाचे मृत्यू पत्र
    •  मृत्यू पत्राबाबत महत्वाचे न्याय निवाडे.  
    •  ईत्यादी माहीती  पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

    १३ नोव्हेंबर, २०१५

    महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी / मंडळ अधिकारी यांची माहीती.

    हाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा.  धन्यवाद.....!



    ७ नोव्हेंबर, २०१५

    पिक पैसेवारी नविन पद्धतीबाबत सुचना.

                                                                              पिक पैसेवारी बाबत विभागीय आयुक्त ,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समीतीने केलेल्या शिफारशी या बाबत मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय या सर्व बाबी विचारात घेवुन पिक पैसेवारी पद्धती बाबत खरीप हंगाम २०१५ पासुन "पिक पैसेवारी नविन पद्धती बाबत दि.०३/११/२०१५ च्या सर्वसमावेशक शासन निर्णय " घेण्यात आला आहे. तो येथे पहावा.

    ५ नोव्हेंबर, २०१५

    ई-फेरफार आज्ञावलीमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन

    ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्याकरिता विविध आज्ञावलींचा वापर करावा लागतो. ई-फेरफार घेत असताना त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नेमकी कोणती आज्ञावली वापरावी याविषयी संपूर्ण माहिती मिळत नाही. आता ही संपूर्ण माहिती ई-फेरफार हेल्प डेस्क मेंबर यांनी तयार केली आहे. सदर माहिती पाहण्यासाठी " ई-फेरफार आज्ञावधीलमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन" या लिंक चा वापर करावा.

    १४ ऑक्टोबर, २०१५

    ISM 3.0 मधिल Monoligual(DV-TT),Bilingual(DVB-TT) font UNICODE मध्ये रुपांतरीत करण्याची सोपी पध्दती.

                                                   महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आता संपुर्ण राज्यातील कार्यालयीन
     कामकाज हे UNICODE भाषेत करावयाचे आहे. परंतु आपन या पुर्वी ism3.0 मधिल Monoligual(DV-TT),
     Bilingual(DVB-TT) font वापरुन MS-EXCEL किंवा MS-WORD मध्ये अनेक फाईल, खातेदार यादी 
    ईत्यादी बनविलेल्या आहेत. त्या आता आपनास पुढील कार्यासाठी जशास तशा UNICODE मध्ये रुपांतरीत 
    करुन वापरता येईल. त्या साठी आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉप वर ISMv6.1 or ISMv6.3 हे सॉफ्टवेअर install असणे गरजेचे आहे. त्याकरीता व आपल्या ism3.0 मधील फाईल UNICODE मध्ये रुपांतरीत 
    करणेसाठीच्या संपुर्ण माहीती करीता खालील लिंक (दुव्यावर जा.)

    ३० सप्टेंबर, २०१५

    ई-फेरफार साठी आपले Laptop वर करावयाच्‍या आवश्‍यक बदला बाबत.

                                                            आपले तालुक्‍यात ई-फेरफार प्रकल्‍प सुरु झाल्‍यावर काय कार्यवाही करावी या बाबत मागील महीण्‍यातील 03/08/2015 तारखेचे लेखात त्‍यावर सविस्‍तर मार्गदर्शन आवश्‍यक लींक व्‍दारे आपनघेतले आहे. पण्‍ा आपनास आपले laptop वरती कोणती व कशी सेटींग्‍स करावी याबाबत फारसी माहीती मिळत नाही. त्‍यानुसार आपन सर्व प्रथम्‍ा आवश्‍यक असणारे सर्व  software download करावे उदा. active X control , DSC drivers , Forticlintsslvpn, Ism V6, or marathi Indic, pdf cute writer  , java ,Adob Redder  ईत्‍यादी. त्‍यानंतर आपले laptop वर कशी settings करावयाची याची माहीती खालील दुव्‍यावर ( लिंक) वर जावुन पहा.






    २२ सप्टेंबर, २०१५

    पिक पैसेवारी

                              ग्राम पातळीवर पिकपैसेवारी नुसार गावांना वि‍वीध सोयी ,सवलती देण्‍यात येतात. त्‍यानुसार ग्राम पैसेवारी समीती स्‍थापन करुन पिककापणी प्रयोगाव्‍दारे पिक पैसेवारी काठली जाते  त्‍यानुसार 
    • त्‍या स‍मितीत कोण्‍ा कोण्‍ाते व किती सदस्‍य असतात. 
    • पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती काय 
    • पिक पैसेवारी काढण्‍याची नविन पध्‍दती काेणती ? ई बाबत माहीती  व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्‍त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना खालील PDF  लिंक चा वापर  करुन मिळवा 

    1. गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती 
    2. सर्व सभांचे ईतिवृत्‍तासह  पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना 
    3. शासन निर्देशानुसार नविन पध्‍दतिने प्रमानभुत उत्‍पन्‍न ठरवुन पैसेवारी काढण्‍याची पध्‍दती

    १५ सप्टेंबर, २०१५

    बळीराजा चेतना अभियान.

               
     आपले राज्‍यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्‍तीने फार खचुन गेला आहे. त्‍यातुनचएकुन राज्‍यातील शेत‍क-यांचे आत्‍महत्‍या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे शेतक-यांच्‍या मनामध्‍ये जगण्‍याची जिद्य निर्माण व्‍हावी. त्‍यांना सक्षम करणेच्‍या दु्ष्‍टीने शासनाने विविध योजनेसह ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे. हया अभियाना दरम्‍यान आपन काय करावे ? आपली एक सुजान नागरीक, शिक्षक, व्‍यापारी, नोकरदारवर्ग, आदी म्‍हणुन काय जबाबदारी आहे?. या विषयी व काय ? आहे हे 'बळीराजा चेतना अभियान' म्‍हणजे काय ? सा संदर्भात  मा. राजेश खवले सर.निवासी उपजिल्‍हाधिकारी, यवतमाळ. यांनी   मार्गदर्शक पत्राकाद्वारे माहीती दिली आहे.
                                        बळीराजा चेतना अभियान म्‍हणजे काय ?  हृया बाबतचे मा. खवले सरांचे आव्‍हानात्‍मक मार्गदर्शक पत्रक येथे पहा.     
    • बळीराजा चेतना अभियान.  
     समितीची रचना  ,  बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्‍ती व संस्‍था ,  बळीराजा चेतना  
    अभियानाची उद्दिष्‍टे , ई बाबतचे माहीतीचे शासन निणर्य येथे पहा.

    ७ सप्टेंबर, २०१५

    ईनाम आणी वतनी जमिनी बाबत.

                              महसुल विभागात काम करत असतांना आपनास अनेक विषय हाताळावे लागतात व त्‍या विषयी आपले मनात अनेक संभ्रम असतात. असाच एक विषय म्‍हणजे ईनाम आणी वतन जमिनी  हया बाबत खालिल दर्शविलेली माहीती आपनास दिलेल्‍या लिंक वर जावुन मिळेल जसे.
    • 1) ब्रिटीश कालीन वतनाचे तिन वर्ग कोणते.?     
    • 2) इनाम जमिन म्‍हणजे काय ?   
    • 3) इनामाचे प्रकार किती ?  व कोणते. ?  
    • 4) वतन जमिन म्‍हणजे काय ?  
    • 5)  वतन जमिन कायदे कोणते?  
                 वरिल दोन्‍ही जमिनी विक्री बाबत नविन धाेरण  व सुधारणा या बाबतचे संपुर्ण मार्गदर्शनासाठी व माहीती साठी . 'महसुल कामकाज पुस्‍तिका ' इनाम आणी वतन जमिनी PDF येथे पहा.

    संदर्भ-  'महसुल कामकाज पुस्‍तिका '
     लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर, 
    उपजिल्‍हाधिकारी ,महाराष्‍ट्र शासन 
    dcsanjayk@gmail.com

    ५ सप्टेंबर, २०१५

    ऑनलाईन ई-फेरफार आझावलीमध्‍ये भरलेल्‍या चुकीच्‍या क्रमांकामध्‍ये दुरुस्‍ती बाबत.

                               आपले तालुक्‍या ऑनलाईन ई-फेरफार प्रकल्‍पाची अंमलबजावणी करित असतांना तलाठी यांचे कडुन आपले साजातील गावनिहाय शेवटचा फेरफार क्रमांक नोंदविल्‍या जाते . त्‍यानंतरच प्रत्‍यक्ष ऑनलाईन फेरफार ची अंमलबजावणी होते. परंतु अनेक तलाठी यांचे कडुन शेवटचा फेरफार नोंदवितांना चुका होतात व ती चुक दुरुस्‍ती साठी NIC  कडे मागणी करावी लागते. आता या पुढे अशी फेरफार नोंदवितांना होणारी चुक जिल्‍हा स्‍तरावर दुरुस्‍ती करता येणार आहे. त्‍यानुसार जिल्‍हयाचे डिस्‍ट्रीक डोमेन एक्‍स्‍पर्ट (डी.डी.ई ) यांना तालुक्‍यातील ज्‍या गावात ऑनलाईन फेरफार अद्याप घेतलेले नाही त्‍या साठी ही सुविधा वापरता येईल.
                            url- https://10.187.203.132/usercreation  येथे ( डी.डी.ई ) यांनी  लॉग ईन होवुन 'फेरफार क्रमांकाची दुरुस्‍ती करणे ' हा पर्याय वापरुन जिल्‍हा स्‍तरावर फेरफार क्रमांक दुरुस्‍ती  करतांना खाली दर्शविलेल्‍या मा.जमाबंदी आयुक्‍त, पुणे यांचे  पत्रान्‍वये कार्यवाही अवलंविण्‍यात यावी.
                                


    ३० ऑगस्ट, २०१५

    महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015

                                       महाराष्‍ट्र राज्‍यात पात्र व्‍यक्‍तींना पारर्दशक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा  देण्‍या-या शासकीय विभागामध्‍ये  व  अधिकरणामध्‍ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्‍ये पारदर्शकता व उत्‍तरदायीत्‍व आणण्‍यासाठी आणि तत्‍संबंधीत व तदानुषंगिक बाबींकरिता तरतुद करण्‍यासाठी   एक सर्व समावेशक कायदा महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015 दि.28एप्रिल 2015 पासुन राज्‍यात लागु करण्‍यात आला आहे. या कायदयाची माहीती  खाली दर्शविलेल्‍या चित्र फितीचे लिंक वर क्‍लीक करून मिळवा .                      
    या शिवाय कायद्याचे ठळक मुद्ये पाहण्‍यासाठी महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015 व www.revenueofficers.blogspot.com  हया ब्‍लॉग पेज वर जा.  

                                               
                          

    २४ ऑगस्ट, २०१५

    DCPS खात्‍यात जमा न झाालेली वेतन कपात रक्‍कम शोधुन DCPS खात्‍यात जमा करणे बाबतची पध्‍दती.

                                      सन नोव्‍हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत नियुक्‍त केलेल्‍या  सर्व अधिकारी / कर्मचा-यास अंशदान निवृत्‍ती वेतन योजना DCPS (Defined Contribution Pension System) लागु केलेली आहे. त्‍यानुसार आपले पगारातुन मुळवेतन + महागाई भत्‍ता मिळुन 10% रक्‍कम कपात केली जाते व तेवढीच रक्‍कम शासनातर्फे आपले DCPS  खात्‍यात जमा केली जाते.
                                परंतु  सन 2005 ते सन 2014 पर्यंतची कर्मच्‍या-यांचे पगार पत्रक पाहीले असता असे आढळुन येते कि , सदर कर्मच्‍या-यांचे वेतनातुन दरमाह DCPS रक्‍कम कपात झाली आहे पण त्‍या कपातीच्‍या काही रक्‍कम त्‍यांचे DCPS  खात्‍यात जमा झालेली नाही. त्‍यामुळे  तेवढी रक्‍कम शासनातर्फे सुध्‍दा जमा झालेली नाही.त्‍यानुसार सदर सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दुहेरी आर्थीक फटका बसलेला आहे. 
                                   या पुढे घाबरुन न जाता आपण खाली दर्शविलेल्‍या पध्‍दतीने कार्यवाही केल्‍यास या आर्थीक अडचणी वर मात करता येईल.
                             ह‍ि संपुर्ण कार्यवाही केल्‍या‍शिवाय आपले पगारातुन कपात झालेली व DCPS खात्‍यात जमा न झालेली रक्‍कम खात्‍यात जमा करता येणार नाही. त्‍यानुसारच आपले NPS  राष्‍ट्रीय निवृत्‍ती योजनेचे खात्‍यात रक्‍कम जमा होणार नाही.

                                 


    २० ऑगस्ट, २०१५

    GRAS प्रणाली वर ऑनलाईन कार्यपध्‍दती बाबत.

                                           महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्‍दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात आली आहे. त्‍यानुसार मा. विभागीय अायुक्‍त अमरावती यांचे कार्यालयाने GRAS  प्रणाली बाबत करावयाची संपुर्ण कार्यवाही बाबतची चित्र फित (power point presentation ) PPT तयार केली आहे. त्‍यानुसार आपणास  GRAS प्रणाली वर काय कार्यवाही करावी याचे मार्गदर्शन मिळेल. करिता खालील लिंक वर क्‍लीक करा.


    ३ ऑगस्ट, २०१५

    ई-फेरफार प्रकल्‍प कार्यंवित झाल्‍यावर सर्वप्रथम करावयाची कार्यवाही.

                                आपले तालुक्‍याचा NLRMP डाटा सब डाटा सेंटर वर अपलोड व आपले तालुक्‍यात ई- फेरफार प्रकल्‍प कार्यंवित झाल्‍यावर प्रथम काय कार्यवाही करावी या बाबत अनेक संभ्रम किंवा अडचणी निर्माण होतात. त्‍या अडचणी बाबत मार्गदर्शन आपनास योग्‍य त्‍या वेळी मिळत नाही. त्‍यामुळे आपले तालुक्‍यात ई-फेरफार प्रकल्‍प चालु झाल्‍यावर प्रथम काय कार्यवाही करावी ह्या बाबत ख्‍ााली दिलेल्‍या लिंक  वर सविस्‍तर मार्गदर्शन मिळेल. करिता आपण  सदर लिंकवर क्‍लीक केल्‍या नंतर आपल्‍या अडचणी सोडवण्‍यास मदत होईल.      
    •  Startup Steps User Manual – for Online eFerfar 
    •  User Manual for Creating Mutation Cell. Mutation Cell Role Creation Guide  
    •  डिजीटल सिग्‍नेचर बाबत येणा-या अडचणी बाबत digital singture gide हया लिंक वर क्‍लीक करा.  
    •                               अधिक माहीती व मार्गदर्शनासाठी आमचे मार्गदर्शक श्री. प्रकाश झाडोकर तलाठी तेल्‍हारा तहसिल जि.अकोला यांचेशी prak306@gmail.com  ह्या मेल आडी वर संपर्क साधा.
                                                                               
                                                                                        

    २५ जुलै, २०१५

    शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणे बाबत.

                           शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्‍यासाठी पथदशी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत खालीलप्रमाणेशासनाने निर्णय घेतला आहे.  पथदशी प्रकल्पांतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या होणाऱ्या जिल्याकरीता विविध उपायोजना करण्‍याच्‍या अनुषंगाने यवतमाळ व उस्‍मानाबाद जिल्‍हयाची निवड के लेली असून त्‍याअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजना करण्‍यात  येत आहेत. त्यानु सार आत्महत्याग्रस्त क्षेत्रासाठी जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या, बळीराजा चेतना अभियान राबविणे, पथदशी पथदशी प्रकल्पांतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्यातील उप विभागासाठी नेमलेल्या सचिव दर्जाच्‍या  अधिकाऱ्यांच्ये प्रस्‍तावास कार्यत्‍तोर मांजूरी देणे वरील दोन जि‍ल्यांसाठी शेतकरी आत्महत्याबाबतचे कामकाज करण्यकरीता विशेष कक्ष स्थापन करणे इत्यादी बाबी व जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या यांची रचना आणि कार्यक्षमता बाबत च्‍या संपुर्ण माहीती साठी व शासन निर्णय पाहण्‍यासाठी  येथे क्‍लीक करा.
                             
                                     आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ' कृ षि‍ समृद्धी ' योजनेच्या अनुषंगाने विविध विभागयांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता करावयाच्‍या उपयोजनाबाबत.
                                           शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

    २ जुलै, २०१५

    निवृत्‍तीवेतन प्रकरण एक नमुन्‍यात आॅनलाईन तयार करणे व इतर बदला बाबत.

                                  निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विवीध प्रपत्रांमध्‍ये  सुधारणा करुन एक नमुना  तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्‍दतीने  तयार करणे आण्‍ाी इतर बदलाांबाबत. निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीवर निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दिनांक 01 सप्टेंबर, 2015 पासून सदर प्रणालीव्दारे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास व ते नमुना-1 या परिशिष्‍ट-अ मध्ये दर्शविलेल्‍या नमुन्‍यात तयार करुन सदर प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनाची मान्‍यता देण्यात येत आहे. दिनांक 01 सप्टेंबर, 2015 नंतर प्रत्येक निवृत्तीवेतन प्रकरण नविन नमुन्‍यात तयार करुन सादर करणे बंधनकारक राहि‍ल.
                                   नमुना-1 व परिशिष्‍ट-अ आणि सदर शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथे पहा.



    २६ जून, २०१५

    “0029-जमीन महसूल,करमणूक शुल्क व गौण खनि‍जे उत्खनन लेखाशिर्षखाली वसूल करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS) या प्रणालीद्वारे जमा करण्याबाबत .

                              महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्‍दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात येत आहे. राज्यातील सहा महसूली विभागांतर्गत सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व त्‍या अतर्गत येणा-या   उपविभागीय आणी तहसिल कार्यालया मध्‍ये सदर प्रणाली दि.1.8.2015 पासून न चुकता लागू होईल हे सुनिच्‍छीत  करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधीकारी यांची असुन त्‍या बाबतचे प्रशिक्षणची जबाबदारी हि वित्त विभागाच्या व्हच्‍र्युअल ट्रेझरी  कार्यालयामार्फत देण्यात येऊन ते दि.31.7.2015 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
                              या बाबत दि.26/06/2015 चा शासन निर्णय येथे पहा.

    GRAS side 

    २० जून, २०१५

    ई-फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचणी.

                                              ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर. ई- फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचण्‍ाी करणे  करिता eMutation.capabillity.Test(ECT) हया लींक चा वापर करुन ई- फेरफार ७/१२ पुर्व ऑनलाईन चाचणी घेता  येईल  येईल.७/१२ मध्ये फेरफार घेण्यापुर्वी त्या गटात काही त्रृटी आहेत काय ? हे फेरफार घेण्यापुर्वीच तपासता येइल . गटामध्ये त्रृटी  असल्यास कोणत्या प्रकारात काय त्रृटी आहे. उदा. अहवाल क्रमांक १ते१४,DBATool ईत्यादी मधील त्रृटी समजेल त्यामुळे फेरफार नोंदविण्यापुर्वी त्रृटी  दुरुस्तकेल्यास प्रलंबित फेरफारची संख्या   कमी होइल.

    ११ जून, २०१५

    रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्‍ये सुधारणा करणेबाबत.( L.T.C )

                    राज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-याांना मुख्‍यालयापासुन त्यांच्या स्वग्रामी जाण्यासाठी चार वर्षाच्‍या एका गटवर्षात दोन स्वग्राम किंवा एक महाराष्‍ट्र दशर्न व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सदर सवलतीच्या अनुषांगाने दि.10/06/2015च्‍या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार अटी व शर्ती एकत्रितपणे  विहीत करण्यात येत आहेत. सदर सुधारीत निर्णयात अविवाहीत कर्मचारी यांची कुटुंब व्‍याख्‍या दिली आहे.
                      सदर शासन निर्णय येथे पहा.

    ४ जून, २०१५

    संगणीकृत 7/12 डेटा ऑनलाईन दुरस्‍ती बाबत.(NLRMP)

                    ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर  संगणीकृत 7/12 डेटामध्‍ये जर काही दुरुस्‍ती करावयाची तर  online data correction  हया लींक चा वापर करुन संगणीकृत डेटा मध्‍ये ऑनलाईन दुरुस्‍ती करता येईल. 

    २३ मे, २०१५

    केंद्रशासनाची नवीन पेन्शन योजना सुरु.

    केंद्रशासनाची नवीन योजना अटल पेन्शन योजना.
    उतार वयात किमान गुंतवणुक,जास्तीत जास्त फायदा.
    हप्‍ता-  मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबुन आहे म्हणजे दरमाह रू ४२ ते रू २१० . लाभार्थी - वयोगट ज्यांचेवय  १८ ते ४०वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी.
    लाभ- ६० वर्ष वयापासुन रू १,००० पासून ते रू ५,००० पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ.
    अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    २२ मे, २०१५

    संगणीकृत 7/12 चा डेटा तपासणी व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन

                 महाराष्‍ट्र राज्‍य  तलाठी मंडळ अधिकारी समन्‍वय महासंघाच्‍या निवेदनाच्‍या अनुषंगाने दि.17/3/2015 रोजी मा. महसुलमंत्री महोदय यांचेशी झालेल्‍या बैठकीतील मुद्या क्र 5 नुसार NLRMP  कार्यक्रमांगर्त संगणीकरण 7/12 चा डेटा ची तपासणी  व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन बाबत कार्यवाही  करणे बाबतचे मा.जमाबंदी आयुक्‍त आणी संचालक भुमी अभिलेख ( महाराष्‍ट्र राज्‍य ),पुणे यांचे दिनांक 07/05/2015 चे परिपत्रक पहावयास मिळेल.

    ४ मे, २०१५

    केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

      केंद्र शासनाने दोन नविन योजना सुरु केल्‍या आहेत.

    • ) प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना.  हप्‍ता-  रुपये 330 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 50 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
    • )  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हप्‍ता-  रुपये 12 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 70 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु. जखमी झाल्‍यास 1 लाख रु.  अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    • दोन्‍ही योजनेचा लाभ तुम्‍ही एकत्रीत रित्‍या घेवुन रु.342 च्‍या वार्षिक हप्‍त्‍यामध्‍ये 4 लाख रु.संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्‍या बॅंकेशी संपर्क साधा.

    २८ एप्रिल, २०१५

    हस्‍तलिखीत फेरफार संगणकावर घेणेबाबत.

     आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP data CD  सब डाटा सेंटरवर ऑनलाईन (ई-फेरफार) साठी अपलोड झाल्‍यावर जर हस्‍तलीखीत फेरफार संगणकात घेण्‍याचे राहुन गेले असतील तर हया (online data updation) लिंक चा वापर करुन सदर राहीलेले फेरफार संगणकात ऑनलाईन टाकु शकता.  या शिवाय आणखी महत्‍वाच्‍या लिंक साठी येथे( NLRMP Project Important URLs/Links ) पाहा.

    ४ एप्रिल, २०१५

    ई-फेरफार ट्रायल रन साठी डाटाकार्ड वापर 750/- रु .

     “ई-फे रफार“व “ई-चावडी“ प्रकल्प संपुर्ण राज्यात राबवि‍णे कामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटाकार्ड वापरासाठी दरमहा रक्कम रूपये 750/- प्रमाणे ऑगस्ट 2014 ते मार्च 2015 अखेर शुल्क अदा करण्याकामी प्रतीपूती रक्कम देणेबाबत चा शासन निर्णय येथे पाहा.“ई-फे रफार” व “ई-चावडी” हा प्रकल्प 1 एप्रिल 2015 पासून संपुर्ण राज्यात सुरु होणे अपेक्षित असल्यानेज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी डेटा काडर् खरेदी के लेले  आहेत व ज्या तालुक्यात ई फे रफार आज्ञावलीचे किमान ट्रायलरन सुरु झाला आहे अशा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी डेटाकार्ड वापराबाबतचेशुल्क ट्रायलरन सुरु झाल्याचे महिन्यापासून रक्कम रूपये(प्रती कर्मचारी रू.750/-) अदा करणे आवश्यक आहे. 

    २९ मार्च, २०१५

    अंशदान निवृत्तीवेतन योजना

    1) नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2014-15  करिता व्याज दर   8.7 %  ठरविण्‍यात आले आहे.सदर व्‍याज दर हा दि.01/04/2014 पासुन लागु करण्‍यात आले आहे करिता शासन निर्णय येथे पाहावयास मिळेल

    ९ मार्च, २०१५

    अधिकार अभिलेख व गाव नमुने

    अधिकार अभिलेख विषयक विविध गाव नमुन्यातील नोंदवहया अद्यावत ठेवणे बाबत चा नविन शासन निर्णय येथे पाहता येईल. तहस‍िलदार, मंडळ अधिकारी, तलाठी अन्य क्षेत्रीय महसूल अधिकारी यांना उक्त न‍ियमांची पूतर्ता करुन अधिकार अधिलेख विषयक गाव  नमुने अद्यावत  ठेवण्यासंदर्भात  कार्यवाही करण्याबाबत सुचीत केले आहे. 

    स्वघोषणापत्र व स्वयंसाक्षांकना बाबत.

    सर्व शासकीय कायालये, स्थानिक स्वराज्यसंस्था   इत्यादी शासकीय संस्थामध्ये शपथपत्र (Affidavit), ऐवजी स्वयं घोषणापत्र (Self Declaration) व प्रमाणपत्रे / कागदपत्राांच्या साक्षांकित प्रती (Attested copies) ऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती ( Self Attested Copies) स्वीकृत करण्यासंदर्भात( शासकीय सोयी / सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे बाबतचा ) शासन निर्णय येथे पाहा.

    २७ फेब्रुवारी, २०१५

    घरबांधणी अग्रिम

    शासकीय कर्मचारी व अधिकारी घरबांधणी अग्रिम - अग्रिमाच्या रकक्‍मेत तसेच घराच्या  किंमत मर्यादेत सुधारणा करण्या बाबत .शासन निर्णय येथे पहावयास मिळेल.

    विभागीय चौकशी.

    सेवानिवृत्‍त झालेल्‍या / निधन पावलेल्‍या कर्मच्‍या-यांच्‍या विभागीय चौकशीचे प्रकरणे तातडीने कार्यवाही करणे बाबत चा शासन निर्णय येथे पहावयास मिळेल.

    १७ फेब्रुवारी, २०१५

    ई- फेरफार (NLRMP)

    Online mutation  ई- फेरफार (trial Run) साठी आवश्यक माहीती तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या Laptop वर VPN कनेक्टीव्हीटी करीता आवश्यक असणारे Forticlient SSLVPN Software या लींक ला भेट देवुन मिळवा