डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत राज्यात मागील 7 वर्षे पासून ई फेरफार प्रकल्प कार्यन्वित आहे.त्यात राज्यातील तलाठी,मंडळअधिकारी यांनी खूप मेहनतीने हा प्रकल्प यशस्वी करण्यास शासनास मदत केली आहे.आता शासनाने या पुढील पाऊल उचलत राज्यात ई-पिक पाहणी हा प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या नुसार आता स्वतः शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहितीआपल्या मोबाईल मधील पीक पाहणी ऍप द्वारे भरू शकणार आहे.ती माहिती कशी भरावी या बाबत एक व्हिडिओ तयार केला आहे .तो खालील लिंक वर जाऊन पाहू शकता व आपल्या शेतातील पिकाची माहिती अगदी सुलभ पध्दतीने भरू शकाल..
ई- पिक पाहणी व्हिडिओ 2 - शिवानंद वाकदकर तलाठी
निर्मिती
इक्बाल मुलांनी सातारा
संकलन व प्रसिद्धी
कामराज चौधरी
तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
आजोबांच्या नावावर एकूण साडेतीन एकर जमीन होती आहे परंतु आजोबा वारल्यानंतर नंतर काकाने परस्पर आत्याची नावे सातबाराच्या उताऱ्यावर नोंदवली एकूण पाच आत्या असून त्यातील दोन आत्या वारल्या आहेत तसेच खाते फोड देखील झाली नाही काकाला सर्व काही आयते मिळाले पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि आम्ही शहरी विभागात नोकरीसाठी कामानिमित्त काम करतो तर जा आत्या वारले आहेत त्यांच्या मुलांचा अधिकार हा शेतजमिनीत चालतो की नाही खातेफोड याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते याची माहिती भेटली तर बरं होईल
उत्तर द्याहटवाउर्वरित सर्व वारस दाखल करणे बाबत अर्ज करता येईल.. पण त्या आधी या पूर्वी झालेला वारस फेर हा sdo/प्रांत अधिकारी यांचे कडून रद्द करून घ्यावा लागेल..
उत्तर द्याहटवा