शासनाचे विविध निर्णया नुसार खालील नमुद बाबींन नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार असलेल्या भोगवटदार वर्ग २ जमीनी खालील ३ प्रकारा नुसार भोगवटदार वर्ग १ करता येईल. त्यांच्या पध्दती खालील प्रमाणे .
1.
विदर्भातील भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध
असलेल्या भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीत करणे
·
महाराष्ट्र
शासनाने सन 2018 साली विदर्भातील भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भुमीस्वामी
धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीत करणे तसेच ज्या व्यक्तींना मध्य प्रदेश भु संहिता १९५४ अर्तंगत अधिक धान्य पिकवा योजने अर्तंगत किंवा
इतर योजने अर्तंगत वाटप केलेल्या जमीनी ज्या
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ अस्तीतवात येण्या आधी वाटप केलेल्या जमीनी बाबत
दि ०७/६/२०१८ रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णय क्रमांक :-जमीन-२०१८/प्र.क्र.३५/ज-१ नुसार वर्ग १ करणे बाबत
कार्य पध्दती.
·
१ ) विदर्भातील
भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार
वर्ग २ जमीनी ज्या मध्य प्रदेश भु संहिता १९५४
अर्तंगत वाटप केल्याचा पट्टा किंवा आदेश
·
२) हक्क
नोंदणी .......
इत्याइी कागदपत्रा सह मा तहसिलदार यांचे कडे अर्ज सादर करावा
शासन निर्णय क्रमांक:-जमीन-२०१८/प्र.क्र.३५/ज-१ दिनांक ०७/०६/२०१८
भुमीस्वामी धारणधीकार
जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीतकरणे बाबत मा तहसिलदार यांचा आदेश
2.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप
केलेल्या भाडे पट्टाने वाटप केलेल्या जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे
नियम २०१९
·
महाराष्ट्र
जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप केलेल्या भाडे पट्टाने वाटप केलेल्या जमीनी ज्या
कृषक/अकृषक /वाणीज्य वापरात प्रदान केलेल्या
जमीनी हृया त्याचे अधिमुल्याचे किंमती भरुन
भोगवटदार वर्ग १ करणे बाबत तरतुद शासनाचे निणर्य क्रमांक जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१ दि ०८/०३/२०१९ नुसार नमुद केले आहे.
·
( टिप
:- यात केवळ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप केलेल्या जमीनीच अर्तंभुत
आहेत सिलींग, कुळ, भुदान वाटप जमीनी यात येणार नाही.)
वरील पदधतीने आपन
आपली भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार वर्ग १ करु शकाल
शासनाचे निणर्य क्रमांक जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१ दि ०८/०३/२०१९
3.
कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ नुसार
नियंत्रीत सत्ता प्रकार (भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार वर्ग १ करणे बाबत.)
·
मुबई कुळ
वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ मध्ये,हैद्राबाद कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम
१९५९ कलम ५०ब मध्ये व मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग )अधिनियम १९५८ कलम
५७ मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र दि ०७/०२/२०१४ नुसार विक्री साठी पुर्व परवानगी घेण्याची
तरतुद मध्ये सुधारणा करण्यात आले आहे.
·
उक्त सुधारणेच्या
अनुषंगाने संबंधित कुळ कायद्यानुसार प्राप्त जमीनीस, कुळहक्क मान्य होवुन कुळांची खरेदी
केलेल्या आहेत अशा जमीनीच्या दिनांकापासुन १० वर्ष पुर्ण झालेल्या जमीनींची खरेदी,विक्री,अदलाबदल,गहाण
ठेवणे,पट्टयाने देणे,७/१२ उताऱ्यावरील नियंत्रीत सत्ता प्रकार आसलेल्या नोंदी सुधारीत
करणे हया या सुधारीत तरतुदी नुसार करणे आवश्यक आहे.
·
त्या नुसार
मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ मध्ये,हैद्राबाद कुळ वहीवाट व शेतजमीन
अधिनियम १९५९ कलम ५०ब मध्ये व मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग )अधिनियम १९५८
कलम ५७ मध्ये शासन निर्णय क्रमांक:-टिएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४
नुसार कुळ कायद्यानुसार प्राप्त जमीनीस १० वर्ष पुर्ण झालेल्या जमीनी विक्री न करता
विक्रीपुर्वीच एक कायम स्वरुपी सोय म्हणुन जमीन महसुलाच्या आकारणीच्या ४० पट इतकी रक्कम
शासन जमा करुन मा तहसिलदार यांचे कडुन /१२
उताऱ्यावरील नियंत्रीत सत्ता प्रकार आसलेल्या नोंदी सुधारीत करता येतील ((कुळाने प्राप्त भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार
वर्ग १ करता येईल).
कुळ वहीवाट व शेतजमीन
अधिनियम १९४८ कलम ४३ सुधारणे बाबत मा.डॉ संजय कुंडेटकर सर यांचा विस्तुत लेख.
लेखन ,निर्मीती
व प्रसिध्दी
कामराज ब चौधरी
तलाठी पुसद खंड
१
ckamraj@outlook.com/ www.talathinmaharashtra.in/https://www.facebook.com/talathiinmaharashtra
Great efforts and dedication
उत्तर द्याहटवाखुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवाइनाम प्रकारे मूळ आकाराचे किती पट नजराणा रक्कम वसूल करण्यात यावी याची माहिती पाठवा
उत्तर द्याहटवा