तलाठी यांनी सेवेत आल्यावर त्यांनी कोणते कार्य करावे कोणती नमुने दप्तरी असावे तलाठी यांचे कार्य व कर्तव्ये हे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमात दिले आहे आणी त्या नुसार तलाठी हे करतही असतात .. बदलत्या काळानुसार यात बदल होत आहेत .. तलाठी दप्तरात काही नमुने ऑनलाईन सुद्धा झालेले आहे . त्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तलाठी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील वसुली साठी आवश्यक गाव नमुना 8 ब हा सहज व सोप्या पद्धतीने एक्सल शीट कसा तयार करावा या बाबत व्हिडिओ व एक्सल file (8 ब )8 ड)10 तेरीज ( 1 ची तेरीज ) ऑटोमॅटिक तलाठी:-ज्योती इंदल गुसिंगे रा. जि.जालना ता.अंबड गांव. निहालसिंगवाडी ता. अमळनेर जि. जळगांव
यांनी सर्वांन साठी उपलब्ध करून दिले आहे.
खालील प्रमाणे त्यात बदल करून काम करू शकतो
अ.क्र. सुचना करावयाची कार्यपध्दती
१ गावाचे नाव बदलवणे गावाचे नाव शिट वर वर्ष व गावाचे नाव बदलवणे
२ तेरीज १ तेरीज १ ले पान या शिट गोषवारा वर कोणतेही काम करु नये.
३ खातेदाराचे नाव गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील नावे कॉपी करुन पेस्ट करावी
४ एकूण क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील एकुण क्षेत्र कॉपी करुन पेस्ट करावी
५ मागील थकबाकी मागील वर्षी ८ ब मधे ज्या खातेदार यांचे खात्यावर जी थकबाकी असेल ती रक्कम नमुद करावी
६ आकारणी गावाचे कृषीक (शेतीचे) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी
७ आकारणी गावाचे अकृषीक ( बिनशेती ) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी
८ पावती नं. या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावती क्रमा
९ पावती दिनांक या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीचा दिनांक टाकावा
१० एकूण वसुली या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीची एकुण रक्कम टाका
११ संपर्क याबाबत कुठलीही अडचण असल्यास खालिल मेल वर संपर्क करावा. Arjitsingal@gmail.com
8 ब प्रींट करणे बाबत
संकलन
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.