या व्हिडिओमध्ये माननीय उच्च न्यायालयाने नोंदणी कायद्याबद्दल नेमका काय निर्णय दिला आहे याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक नागरिकाने जमीन खरेदी करताना, अंमलात असलेल्या कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. एखाद्या खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त जर कायदेशीर तरतुदी विरुद्ध असेल तर कदाचित त्याची नोंदणी होईल परंतु सातबारा सदरी नाव दाखल होणार नाही याची नोंद घ्यावी.
त्यामुळे कोणताही खरेदी-विक्री व्यवहार करताना तो व्यवहार प्रचलित कायद्याविरुद्ध नाही याची प्रत्येकाने खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.