शासनाने दिनांक 10.०२.२०२६ च्या शासन निर्णया नुसार या पुढे राज्य सरकारने अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या पुढे आता दरवर्षी अकृषक कराचा भरणा करण्याची गरज नसेल त्या ऐवजी एक वेळ अधिमुल्य भरावे लागेल हे अधिमुल्य रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे १००० चौ मी पर्यंत दाराच्या 0.10% , १००० ते ४०००० चौ मी पर्यंत 0.२५% आणि ४००० चौ मी चे वर 0.५०% एवढा असेल.. हे दर ०१.०१.२०२६ पासून अकृषक वापराबाबत असेल
या आधी २००१ पूर्वी झालेले अकृषक भूखंडा साठी २००१ च्या रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील व २००१ नंतर झालेले अकृषक भूखंडा साठी २००२ च्या रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील. यात शासन निर्णय दिनांकापासून मागील थकीत अकृषक करास सूट दिली आहे. परंतु शासन निर्णय दिनांकापासून एक वर्षात वरील नमूद दराने एक वेळ अधिमुल्य भरणे आवश्यक आहे एक वर्ष झाल्यावर त्या अधिमुल्यावर व्याज व दंड आकारला जाणार आहे. त्या नुसार आपल्याकडे असलेले खातेदार यांना किती प्रीमियम भरावा लागेल या बाबत आपल्याला महिती व्हावी या साठी श्री.विष्णू पाटील, मंडळ अधिकारी जळगाव जिल्ह्या यांनी AI च्या मदतीने N.A TAX ONE TIME PREMIUM SOFTWARE तयार केले आहे. या सॉफ्टवेअर चा वापर करून किती प्रीमियम लागणार याचा अंदाज येणार आहे...
(सदर प्रिमियम कोणी भरून घ्यावे या बाबत अद्याप sop आलेली नाही वरील माहिती ही फक्त आपल्या माहिती साठी आहे..)
N.A TAX ONE TIME PREMIUM SOFTWAR
निर्मिती
श्री विष्णू पाटील मंडळ अधिकारी जळगांव
संकलन
कामराज ब चौधरी ग्राम महसूल अधिकारी पुसद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.