• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २९ एप्रिल, २०१६

  तलाठी कामकाज मार्गदर्शिका

  हसुल विभागातील सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे "तलाठी"आज गैरमहसुली कामकाजामुळे मुळ महसुली कामा पासुन तलाठी हे दिवसेन दिवस दुर जात आहेत. त्यामुळे तलाठी दप्तराचे योग्य व कायदेशिर मार्गदर्शन मिळत नसल्याने कामकाजात अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याच चुका होवु शकतात.ह्या संभाव्य चुका टाळण्यासाठी व तलाठी कामाकाजाचे संपुर्ण माहीती साठीडॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील संपुर्ण तलाठी यांचे कार्यासाठी त्यांना असलेल्या अथांग महसुली ज्ञानातुन " तलाठी कामकाज मार्गदर्शिका " हे पुस्तक लिहीले आहे.
  ठळक वैशिष्ठे 
  १) गाव नमुने १ ते २१ नमुने व तक्ता 
  २) तलाठी कॅलेंडर ( माहेवार कामकाज माहीती) 
  ३) तलाठी नमुने अद्यावत माहीती
  ४) महत्वाचे शासन निर्णय माहीती.
  सदर पुस्तीका मिळवण्या करिता खालिल दुव्याचा उपयोग करा.

  " तलाठी कामकाज मार्गदर्शिका " PDF पुस्तीका.

  लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर,
              उपजिल्हाधिकारी सातारा.
  संग्रह :- कामराज चौधरी,
        तलाठी पुसद जि.यवतमाळ
  www.talathiinmaharashtra.in
  तलाठी व महसुल कर्मचारी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त असलेले संकेत स्थळ 

  १८ एप्रिल, २०१६

  गाव नमुना ७/१२ संबंधी सविस्तर माहीती

   तलाठी दप्तरातील सर्वात महत्वाचा नमुना व ज्या नमुन्यावर 
  संपुर्ण तलाठी रेकॉर्ड अवलंबुन आहे. तो नमुना म्हणजेच गाव नमुना ७ व १२ 
  गाव नमुना ७ वर जमिनीच्या क्षेत्राची , मालकीबाबत ई माहीती असते त्याच बरोबर 
  त्या जमिनीवरील पिकांची माहीती गाव नमुना १२ मध्ये असते हे दोन्ही नमुने 
  ऐकमेकास पुरक असल्यानी ते एकत्र केलेले आहेत. म्हणुन त्यास आपन ७/१२ म्हणतो.
  तसेच सर्व शेतकरी यांच्या संपुर्ण शेत जमिनीची माहीती गाव नमुना ७ व १२ 
  मध्ये असल्याने त्यांचा सुदधा ७/१२ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. गाव नमुना 
  ७ व १२ कायदेशिर व सविस्तर माहीती खालील लिंक वर उपल्बध करुन दिली आहे.
  जसे 
  १) गाव नमुना ७ व्याख्या.
  २) गाव नमुना ७ डावीकडील स्तंभा बाबत.
  ३) गाव नमुना ७ मध्य स्तंभा बाबत.
  ४) गाव नमुना ७ उजवीकडील स्तंभा बाबत 
  ५) भोगवटदार व त्यांचे प्रकार 
  ६) पोटखराब व त्यांचे प्रकार 
  ७) गाव नमुना १२ व त्यातील स्तंभा बाबत
  ८) वरिल सर्व बाबतीची कायदेशिर तरतुदी  
  ईत्यादी सर्व प्रकारांची माहीती. 


  लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
  संकलन :- कामराज ब चौधरी ,
  तलाठी- पुसद जि यवतमाळ  9011797779
  ckamraj@outlook.com
  www.talathiinmaharashtra.in

  १७ एप्रिल, २०१६

  तलाठी कामकाज कॅलेंडर.

  तलाठी हा महसुल विभागात कार्यरत महत्वाचा घटक आहे 
  शासनाच्या बहुतांशी योजनांची अमंलबजावणी तलाठी यांचे कडुनच 
  केली जाते त्या मुळे तलाठी यांचे वर गैरमहसुली कामांचा बोजा दिवसेन दिवस 
  वाढत आहे. या वाढत्या बोजा मुळे तलाठी त्यांचे मुळ महसुली कामापासुन दुर जात 
  आहेत. त्यानुसार वार्षीक कामे माहेवार कोणती व ती कधी पुर्ण करावी या साठी 
  खालील लिंक वर तलाठी यांना माहेवार कोणती कामे करावी या बाबत कॅलेंडर दिले आहे.  लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
  संकलन :-  कामराज ब चौधरी ,तलाठी- पुसद जि यवतमाळ 
  ई-मेल पत्ता :-ckamraj@outlook.com
  ब्लॉग पत्ता :-www.talathiinmaharashtra.in
  संपर्क :- 9011797779

  १४ एप्रिल, २०१६

  प्रधानमंत्री पिक विमा योजना

  महाराष्ट्रासह अवघ्या भारतात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथे “लोहडी” पूर्व भारतात बिहार मध्ये “संक्रांति” नावाने आणि  आसाम येथे येथे “भोगाली बिहू” व गुजरात आणि राजस्थान येथे “उत्तरायण” तर दक्षिण भारतात तामिळनाडूत “पोंगल” या नावाने हा सण साजरा केला जातोय.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना अंमलात आणून  खऱ्या अर्थाने मकरसंक्रांति दरम्यान होणारे उत्तरायण लाभदायी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” या नवीन पीक विमा योजनेला  मंजुरी देण्यात आली.
  मागील काही काळापासून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी हि एक संजीवनी देणारी योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही तृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्याला नुकसान किती प्रमाणात झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, मोबाईल मॅपिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळू शकेल.
  भारताचा विचार केल्यास उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू भारतात असतात. भौगोलिक विविधतेनुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर गारपीट किंवा एखाद्या रोगामुळे होणारे पिकाचे नुकसान या सगळ्यामुळे शेतकरी बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागते. यामुळे खचून जाणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा पीकविम्याचाच असतो.
  मात्र धोरणातल्या, सरकारी कारभारातल्या अनेक त्रुटींमुळे पीकविम्याचे पैसे अनेकदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाहीत. शेतकऱ्यांना योग्य आणि त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी या योजनेत विशेष लक्ष दिले गेले आहे. साधारणतः विम्याचा प्रिमियम १५ टक्क्यापर्यंत असतो मात्र नव्या धोरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २ ते २.५ टक्केच ठेवण्याचा विचार आहे. याबरोबरच, ड्रोन सारखा आधुनिक तंत्रज्ञानानं पंचनामे जलद, अचूक होण्यास मदत होईल.
  योजनेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे :-
  १. सर्व खरीप पिकांसाठी २ टक्के तर सर्व रब्बी पिकांसाठी १.५ टक्के इतका समान विमा हफ्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. वार्षिक व्यावसायिक  आणि फलोत्पादन पिकांसाठी शेतकऱ्यांना ५ टक्के इतका हफ्ता भरावा लागेल. शेतकऱ्यांनी  विमा हफ्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हफ्त्यांची  उर्वरित  रक्कम सरकारतर्फे जमा केली जाईल.
  २.  सरकारी अनुदानाला कोणतीही कमाल मर्यादा नाही. उर्वरित हफ्ता 90 टक्के असला तरी तो सरकारतर्फे जमा केला जाईल.
  ३.  यापूर्वी हफ्त्याच्या रकमेवर मर्यादेची तरतूद असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा दाव्यांपोटी कमी रक्कम मिळत होती. हफ्ते  अनुदानावरील सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मर्यादेची तरतूद होती. आता ही मर्यादा काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वजावटीशिवाय विमा दाव्याची संपूर्ण रक्कम  मिळू शकेल.
  ४.  तंत्रज्ञानाच्या वापराला मोठे प्रोत्साहन मिळेल. पिक कापणीसंदर्भातील माहिती स्मार्ट फोनद्वारे सादर करणे शक्य होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना दाव्यापोटी  मिळणारी रक्कम मिळवण्यात होणारी दिरंगाई टाळता येईल.
  पिक कापणी प्रयोगांची संख्या घटविण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर केला जाईल.
  “एक देश एक योजना” या संकल्पनेवर नवी पीक विमा योजना आधारीत आहे. यात यापूर्वीच्या सर्व योजनांमधील चांगल्या वैशिष्टयांचा समावेश आहे. तसेच यापूर्वीच्या सर्व योजनांमधील  त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
  पीक विमा योजना-तुलना
  क्रं.वैशिष्टयेराष्ट्रीय पीक विमा योजना

  [1999]
  सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजना

  [2010]
  पंतप्रधान पीक विमा योजना
  1हफ्त्याची रक्कमकमीजास्तराष्ट्रीय पीक विमा योजनेपेक्षा कमी
  (शेतकरी हिश्श्याच्या पाचपट रक्कम सरकारद्वारे प्रदान)
  2एक हंगाम एक हफ्ताहोयनाहीहोय
  3सुरक्षित विमा रक्कमसंपूर्णमर्यादितसंपूर्ण
  4खात्यात भरणानाहीहोयहोय
  5स्थानिकृत जोखीम  संरक्षणनाहीगारपीट
  दरड कोसळणे
  गारपीट दरड कोसळणे

  पूर
  6सुगीपश्चात नुकसान संरक्षणनाहीकिनारी भाग चक्रीवादळ पाऊसवादळ +अवकाळी पाऊस
  7प्रतिबंधात्मक लागवड संरक्षणनाहीहोयहोय
  8तंत्रज्ञानाचा वापर
  (दावे जलद निकाली काढण्यासाठी)
  नाहीसंकल्पितबंधनकारक
  9जागृतीनाहीनाहीहोय(संरक्षण 50 टक्के इतके दुप्पट करण्याचे लक्ष्य)


  संदर्भ/ सौजन्य:- दैनिक लोकमत  नागपुर आवृत्ती.   ५ एप्रिल, २०१६

  महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार वाटणी ची कार्यवाही.

                              आपले वडीलोपार्जित जमिनीचे वाटप करणे करिता आपनास काय करावे लागेल याची फारसी कायदेशिर माहीती मिळत नाही. त्यामुळे वाटणी करणे राहुन जाते किंवा लांबणीवर पडते. त्यानुसार वडीलोपार्जित जमिनीचे वाटप/ विभाजन/वाटणी करणे साठी काय करावे व त्‍या वर कार्यालयाने महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार विभाजन / वाटणी करणे करीता कोणती पध्दती अवलंबवावी व कार्यवाही करावी या बाबत माहीती दिली आहे. ती खालील लिंक वरुन मिळविता येईल

  १) खातेदारानी वाटणी अर्ज कसा करावा या बाबतचा नमुना
  २) अर्जदारास मार्गदर्शक सुचना 
  ३) प्रकरणाची तपासणी सूची (Checklist)
  ४) स्व-कष्टार्ज‍ित अर्जीत मालमत्तेला सयुंक्त कुटूंब मालमत्ता म्हणून घोषीत करण्याकरीता शपथेवर दिलेल्या साक्षीचा नमूना.
  ५) सह हिस्सेदार व हितसबंधतांना द्यावयाची नोटीस नमुना 
  ६) उद्घोषणा
  ७) महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचेविभाजन) नियम 1967  संकलन:-  कामराज ब चौधरी 
  तलाठी - पुसद जि.यवतमाळ ९०११७९७७७९
  ckamraj@outlook.com
  www.talathiinmaharashtra.in