• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २४ जुलै, २०१६

    गौण खनिज विषयक तरतुदी

       
    महसुल विभागात कार्य करतांना अधिकारी व कर्मचारी वर्गांना विवीध प्रकारची कामे करावी लागतात. त्‍यातील ब-याच कामांबद्दल पुरेशी कायद्यासह माहीती वेळेवर उपलब्ध होत नाही.म्‍हणुन आपले हातुन केवळ माहीती अभावी काही किरकोळ चुका होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.अश्‍याच महत्‍वाच्‍या कामांपैकी  एक म्‍हणजे 'गौण खनिज' .गौण खनिज यातुन आपल्‍या महसुल विभागास बराच महसुल गोळा करता येतो.म्‍हणुनच 'गौण खनिज' विषयक महत्‍वाच्‍या तरतुदी,नियम,अधिनियम व वेळोवेळी  झालेलेे नविन बदल या विषयी संपुर्ण माहीती डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी यांनी त्‍यांंचे गौण खनिज या लेखात दिली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय लातुर,येथे गौण खनिज विभागातील प्रधीर्ग काळाच्‍या अनुभवातुन श्री.पी.डी.पेंडकर,अव्‍वल कारकुन उपविभागीय कार्यालय,लातुर यांनी संंकलीत केलेली  गौण खनिज विषयक माहीती PPT स्‍वरुपात तयार केली आहे.
             वरिल 'गौण खनिज' विषयक दोन्‍ही लेख PDF  स्‍वरुपात मिळविण्‍यासाठी खालील लिंक वर click करा.



    १८ जुलै, २०१६

    पिक पाहणी व वहिवाट प्रकरणे

                                              1 ऑगष्‍ट पासुन महसुली वर्ष सुरु झाल्‍यावर तलाठी यांना म.ज.म.अधि 1966 खंड 4 प्रमाणे नेमुन दिलेेल्‍या वेेळापत्रका प्रमाणे कामे करणे अपेक्षीत आहे. परंतु आज तलाठी संवर्गाला याआपल्‍या मुळ कामांसाठी त्‍यांचेवर असलेल्‍या अनेक गैरमहसुली कामांच्‍या अवाजवी जबाबदारी मुळे मुळ तलाठी महसुली कामे वेळेवर करणे शक्‍य नाही.व त्‍या गैरमहसुली कामांच्‍या व्‍यापामुळे मुळ महसुली माहेवारी कामांबद्दल जाणुन घेणे किंवा त्‍याची माहीती घेणे शक्‍य होत नाही.त्‍यामुळेच डॉ.संजय कुंडेटकर ,सर उपजिल्‍हाधिकारी,यांनी तलाठी यांना त्‍यांचे कामामध्‍ये मदती सााठी अनेकलेख लिहीले आहे. त्‍यापैकीच एक लेख  आज प्रकाशित करीत आहो. 'पिक पाहणी व वहीवाट प्रकरणे ' सदर लेखातील ठळक बाबी.
    1. जमिन कसणे म्‍हणजे काय ?
    2. वहीवाट रित.
    3. पिकपाहणी कायदेशिर तरतुद.
    4. कार्यवाही.
    5. पिक पााहणीतील संभाव्‍य चुका
    6. वहीवाट प्रकरणे.     वरिल सर्व माहीती साठी खालील दुव्‍यावर जा.

    १ जुलै, २०१६

    *गोष्टीरुपी एकशेएक फेरफार फ्लिप बुक*

                                                   
                      डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "महाराष्ट्रातीलतलाठी"www.talathiinmaharashtra.in)या संकेत स्थळा साठी सर्व प्रथम "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे.महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवणे साठी सदर पुस्तकाची फ्लीप बुक स्वरुपातील प्रत प्रकाशित करीत आहो. खाली दिलेल्या लिंक वरुन पुस्तक संगणकावर डाऊनलोड करुन त्यास पासवर्ड १२३४५ देवुन साध्या पुस्तकाप्रमाणे संगणकावर वाचता येईल.