• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    ३० ऑगस्ट, २०१५

    महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015

                                       महाराष्‍ट्र राज्‍यात पात्र व्‍यक्‍तींना पारर्दशक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा  देण्‍या-या शासकीय विभागामध्‍ये  व  अधिकरणामध्‍ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्‍ये पारदर्शकता व उत्‍तरदायीत्‍व आणण्‍यासाठी आणि तत्‍संबंधीत व तदानुषंगिक बाबींकरिता तरतुद करण्‍यासाठी   एक सर्व समावेशक कायदा महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015 दि.28एप्रिल 2015 पासुन राज्‍यात लागु करण्‍यात आला आहे. या कायदयाची माहीती  खाली दर्शविलेल्‍या चित्र फितीचे लिंक वर क्‍लीक करून मिळवा .                      
    या शिवाय कायद्याचे ठळक मुद्ये पाहण्‍यासाठी महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अध्‍यादेश 2015 व www.revenueofficers.blogspot.com  हया ब्‍लॉग पेज वर जा.  

                                               
                          

    २४ ऑगस्ट, २०१५

    DCPS खात्‍यात जमा न झाालेली वेतन कपात रक्‍कम शोधुन DCPS खात्‍यात जमा करणे बाबतची पध्‍दती.

                                      सन नोव्‍हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत नियुक्‍त केलेल्‍या  सर्व अधिकारी / कर्मचा-यास अंशदान निवृत्‍ती वेतन योजना DCPS (Defined Contribution Pension System) लागु केलेली आहे. त्‍यानुसार आपले पगारातुन मुळवेतन + महागाई भत्‍ता मिळुन 10% रक्‍कम कपात केली जाते व तेवढीच रक्‍कम शासनातर्फे आपले DCPS  खात्‍यात जमा केली जाते.
                                परंतु  सन 2005 ते सन 2014 पर्यंतची कर्मच्‍या-यांचे पगार पत्रक पाहीले असता असे आढळुन येते कि , सदर कर्मच्‍या-यांचे वेतनातुन दरमाह DCPS रक्‍कम कपात झाली आहे पण त्‍या कपातीच्‍या काही रक्‍कम त्‍यांचे DCPS  खात्‍यात जमा झालेली नाही. त्‍यामुळे  तेवढी रक्‍कम शासनातर्फे सुध्‍दा जमा झालेली नाही.त्‍यानुसार सदर सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दुहेरी आर्थीक फटका बसलेला आहे. 
                                   या पुढे घाबरुन न जाता आपण खाली दर्शविलेल्‍या पध्‍दतीने कार्यवाही केल्‍यास या आर्थीक अडचणी वर मात करता येईल.
                             ह‍ि संपुर्ण कार्यवाही केल्‍या‍शिवाय आपले पगारातुन कपात झालेली व DCPS खात्‍यात जमा न झालेली रक्‍कम खात्‍यात जमा करता येणार नाही. त्‍यानुसारच आपले NPS  राष्‍ट्रीय निवृत्‍ती योजनेचे खात्‍यात रक्‍कम जमा होणार नाही.

                                 


    २० ऑगस्ट, २०१५

    GRAS प्रणाली वर ऑनलाईन कार्यपध्‍दती बाबत.

                                           महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्‍दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात आली आहे. त्‍यानुसार मा. विभागीय अायुक्‍त अमरावती यांचे कार्यालयाने GRAS  प्रणाली बाबत करावयाची संपुर्ण कार्यवाही बाबतची चित्र फित (power point presentation ) PPT तयार केली आहे. त्‍यानुसार आपणास  GRAS प्रणाली वर काय कार्यवाही करावी याचे मार्गदर्शन मिळेल. करिता खालील लिंक वर क्‍लीक करा.


    ३ ऑगस्ट, २०१५

    ई-फेरफार प्रकल्‍प कार्यंवित झाल्‍यावर सर्वप्रथम करावयाची कार्यवाही.

                                आपले तालुक्‍याचा NLRMP डाटा सब डाटा सेंटर वर अपलोड व आपले तालुक्‍यात ई- फेरफार प्रकल्‍प कार्यंवित झाल्‍यावर प्रथम काय कार्यवाही करावी या बाबत अनेक संभ्रम किंवा अडचणी निर्माण होतात. त्‍या अडचणी बाबत मार्गदर्शन आपनास योग्‍य त्‍या वेळी मिळत नाही. त्‍यामुळे आपले तालुक्‍यात ई-फेरफार प्रकल्‍प चालु झाल्‍यावर प्रथम काय कार्यवाही करावी ह्या बाबत ख्‍ााली दिलेल्‍या लिंक  वर सविस्‍तर मार्गदर्शन मिळेल. करिता आपण  सदर लिंकवर क्‍लीक केल्‍या नंतर आपल्‍या अडचणी सोडवण्‍यास मदत होईल.      
    •  Startup Steps User Manual – for Online eFerfar 
    •  User Manual for Creating Mutation Cell. Mutation Cell Role Creation Guide  
    •  डिजीटल सिग्‍नेचर बाबत येणा-या अडचणी बाबत digital singture gide हया लिंक वर क्‍लीक करा.  
    •                               अधिक माहीती व मार्गदर्शनासाठी आमचे मार्गदर्शक श्री. प्रकाश झाडोकर तलाठी तेल्‍हारा तहसिल जि.अकोला यांचेशी prak306@gmail.com  ह्या मेल आडी वर संपर्क साधा.