• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २० ऑक्टोबर, २०१६

  महसुल संबंधित व्‍याख्‍या.

  महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकदा टिपणी, अहवाल, निकाल किंवा पत्राला उत्तर लिहीतांना एखादया शब्‍दाची कायदेशीर व्‍याख्‍या नमुद करावी लागते. महसूल खात्‍यात दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षा देतांना व्‍याख्‍यांचे महत्‍व लक्षात येते आपन अनेक कायदे राबवीत असतो त्‍यामुळे प्रत्‍येक व्‍याख्‍या लक्षात राहीलच असे नाही.कधीकधी एक व्‍याख्‍येचा कायदेशीर अर्थ जाणुन घेण्‍यासाठीकायद्याची अनेक पुस्‍तके चाळावी लागतात. कधी कधी व्‍याख्‍या लक्षात असते परंतु नेमक्‍या कोणत्‍या कायद्याखाली, कोणत्‍या कलमान्‍वये ती व्‍याख्‍या दिलेलीआहे. हे आठवत नाही. या सर्व गोष्‍टींचा विचार करुन , तातडीच्‍या वेळेला किंवा  दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षाचा अभ्‍यास करतांना ,कोणती व्‍याख्‍या कोणत्‍याकायद्याखाली आणि कोणत्‍या कलमान्‍वये दिलेली आहे हे नेमके कळावे या दुष्‍टीकोणातुन 'महसुल संबंधीत व्‍याख्‍या ' ची रचना डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा. यांनी केली आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्‍याख्‍या , कायदा व कलमांचा उल्‍लेख करुन आपले 'महाराष्‍ट्रातील तलाठी' संकेत स्‍थळावर www.talathiinmaharashtra.in वर उपलब्‍ध करुन दिले आहे. तेव्‍हा सदर महसुली व्‍याख्‍या मिळविण्‍यासाठी खालिल लिंक ला क्‍लिक करा. 

  *लेखक*                                                * संकलन *            
  डॉ.संजयकुंडेटकर,सर                          कामराज चौधरी
  उपजिल्‍हाधिकारी,सातारा.               तलाठी-पुसद जि.यवतमाळ 
                                                             ckamraj@outlook.com 
                         www.talathiinmaharashtra.in  १७ ऑक्टोबर, २०१६

  पैसेवारी रजिस्टर नमुना pdf

  पिक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच गंभीरही. पिक पैसेवारीच्या बाबतीत शेतकरी आणि प्रशासन या दोघांच्या मध्ये असतो तो तलाठी. प्रशासन आणि शेतकरी या दोघांनाही उत्तर देण्याची जबाबदारी तलाठी म्हणून आपली असते. आणि आपण प्रत्यक्ष फिल्ड वर काम भरपूर करतो . परंतु केलेल्या कामाची नोंद ठेवणेही त्याहून अधिक महत्वाचे. त्यासाठी पिक पैसेवारीचे क्रमवार टप्पे ,बैठका इतिवृत्त , सूचना,  प्लॉट टाकणे , पिक कापणी तक्ता या सर्वांचे लिखित रेकोर्ड आपले कडे असणे अत्यंत महत्वाचे त्यासाठी शासनाचे नवीन निर्देशानुसार आपल्या सर्वाना च माहिती साठी रेकॉर्ड साठी उपयोगी पडेल असा  पैसेवारी रजिस्टर नमुना pdf स्वरुपात  शिवानंद वाकदकर तलाठी सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांनी तयार करून आपले सेवेत सादर करणे करिता दिला आहे. याचा आपल्याला नक्की उपयोग होईल .
  • त्‍या स‍मितीत शासनाचे नवीन निर्देशानुसार कोण्‍ा कोण्‍ाते व किती सदस्‍य असतात. 
  • पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्‍तम,मध्‍यम व कनिष्‍ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्‍याची/ निवडण्‍याची पध्‍दती काय ?
  • पिक पैसेवारी काढण्‍याची नविन पध्‍दती काेणती ? ई बाबत माहीती  व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्‍त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्‍टर नमुना खालील PDF  लिंक चा वापर  करुन मिळवा 


    

        -*लेख*-                                                        -*सौजन्‍य*-
  शिवानंद वाकदकर                                             कामराज चौधरी 
  तलाठी सिंदखेडराजा                                           तलाठी पुसद 
  जिल्हा बुलडाणा                                                  जिल्हा यवतमाळ 
  ९८२२६०१०७०                                                    

  १५ ऑक्टोबर, २०१६

  भोगवटदार वर्ग 2 जमिनी हस्तांतरणा संदर्भातील तरतुदी.

  'भोगवटादार वर्ग-2' ही संकल्पना बरीच व्यापक आहे, वेगवेगळ्या कारणांनी "भोगवटादार वर्ग-2" हा शेरा दाखल केला जातो, तसेच अशा जमिनींना हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत, उदा- देवस्थान इनाम जमिनींचे अधिकार शासनास, नवीन शर्तीच्या (पूर्वाश्रमीच्या शासन जमिनी ) चे अधिकार विभागीय आयुक्तांना, "इनाम वर्ग 6 ब" चे अधिकार जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना आहेत, तर पाटील, कुलकर्णी यांसारख्या इनाम जमिनी, आहे त्याच न.अ.श.वर खरेदी द्यावयाच्या असतील तर त्यासाठी दि.9 जुलै 2002 रोजीच्या शा.नि.नुसार पूर्वपरवनगीची गरज नाही, असंच कुळकायदा, पुनर्वसन , सिलिंग इत्यादी जमीनीबाबत देखील सक्षम प्राधिकारी निश्चित करणेत आलेले आहेत, त्यामुळे अशा जमिनीच्या सर्व नोंदी, इनाम रजिस्टर, इत्यादी तपासल्याशिवाय कोणत्या टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे ते निश्चित करता येत नाही, 

  "भोगवटादार वर्ग-2" जमिनींचे प्रकार ? अशा जमिनीच्या हस्तांतरणास पूर्वपरवानगी देणारे सक्षम प्राधिकारी ? भरावा लागणारा  नजराणा ? हे खालील तक्त्यात दिलेे आहे...

  लेखः- मा.बबनराव काकडे,सर तहसिलदार नाशिक  ९ ऑक्टोबर, २०१६

  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 करिता नुकसान पंचनामा कार्यपध्‍दती.

                                           सन 2016-2017 या वर्षापासुन संपुर्ण भारतात एकच पिक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना लागु करण्‍यात आली आहे.त्‍यानुसार अधिसुचीत पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना या योजनेअंंतर्गत येणा-या विमा संरक्षणाच्‍या बाबी जसे स्‍थानिक नैसर्गीक आपत्‍ती (पुराचे पाणी शेतात शिरुन पिकांचे नुकसान,गारपीट,भुस्‍खलन व पिक काढणी पश्‍चात नुकसान ( चक्रीवादळ , अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान  झाल्‍यास होणारी नुकसान निश्चिती करणे करिता पंचनामा कार्यपध्‍दती व पीक नुकसान सूचना फॉर्म व झालेल्‍या नुकसानीचा पंचनामा नमुना फॉर्म आण्‍ाी महाराष्‍ट्रातील जिल्‍हानिहाय विमा कंपनी यांचे नाव , पत्‍ता व संपर्क क्रमांक ईत्‍यादी सर्व प्रकारची माहीती मिळविणे करिता खाली दिलेल्‍या लिंक चा उपयोग करावा.