• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २३ मे, २०१५

    केंद्रशासनाची नवीन पेन्शन योजना सुरु.

    केंद्रशासनाची नवीन योजना अटल पेन्शन योजना.
    उतार वयात किमान गुंतवणुक,जास्तीत जास्त फायदा.
    हप्‍ता-  मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबुन आहे म्हणजे दरमाह रू ४२ ते रू २१० . लाभार्थी - वयोगट ज्यांचेवय  १८ ते ४०वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी.
    लाभ- ६० वर्ष वयापासुन रू १,००० पासून ते रू ५,००० पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ.
    अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    २२ मे, २०१५

    संगणीकृत 7/12 चा डेटा तपासणी व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन

                 महाराष्‍ट्र राज्‍य  तलाठी मंडळ अधिकारी समन्‍वय महासंघाच्‍या निवेदनाच्‍या अनुषंगाने दि.17/3/2015 रोजी मा. महसुलमंत्री महोदय यांचेशी झालेल्‍या बैठकीतील मुद्या क्र 5 नुसार NLRMP  कार्यक्रमांगर्त संगणीकरण 7/12 चा डेटा ची तपासणी  व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन बाबत कार्यवाही  करणे बाबतचे मा.जमाबंदी आयुक्‍त आणी संचालक भुमी अभिलेख ( महाराष्‍ट्र राज्‍य ),पुणे यांचे दिनांक 07/05/2015 चे परिपत्रक पहावयास मिळेल.

    ४ मे, २०१५

    केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

      केंद्र शासनाने दोन नविन योजना सुरु केल्‍या आहेत.

    • ) प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना.  हप्‍ता-  रुपये 330 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 50 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
    • )  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हप्‍ता-  रुपये 12 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 70 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु. जखमी झाल्‍यास 1 लाख रु.  अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    • दोन्‍ही योजनेचा लाभ तुम्‍ही एकत्रीत रित्‍या घेवुन रु.342 च्‍या वार्षिक हप्‍त्‍यामध्‍ये 4 लाख रु.संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्‍या बॅंकेशी संपर्क साधा.