सेंद्रिय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. सिक्कीम सरकारने २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे ध्येय ठरविले आहे.[१]
सेंद्रीय शेतीची तत्त्वे
आरोग्याचे तत्त्व
हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे.
पर्यावरणीय तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. त्यातील जीवसृष्टीला धरून चालणारी हवी.
निष्पक्षतेचे तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी. निष्पक्षतेची खात्री देणारी असावी.
संगोपनाचे तत्त्व
यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या व्हावयास हवे. परिणामी, या व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्य रितीने राखले जाईल.[२]
वैशिष्ट्ये
- स्थानिक गोष्टींचा व पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंचा वापर
- मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
- पिके व आजुबाजूस असणार्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
- निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे
- उत्पादनात वैविध्य
- शेतीवर अवलंबून असणार्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
- अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
- आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
- एकमेकाशी निगडित पद्धती
विविध टप्पे
- शेतातील मातीचे संवर्धन व पोषण:रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
- "'तापमान अनुकूलन'":शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.
- पावसाच्या पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग: पाझर तलाव,शेत तळे तयार करणे, उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे. सौर ऊर्जेचा वापर. जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
- नैसर्गिक साखळी, निसर्गचक्राचे पालन: जैववैविध्याची निर्मिती. कीटकनाशके न वापरणे.शेतीचे क्षेत्र, माती, हवामान यास अनुकूल असे पीक घेणे. जैविक नत्राचे स्थिरीकरण (ग्लिरिसिडिया वृक्षांची लागवड).
- प्राण्यांचे एकीकरण: पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर, पशु-उत्पादन. सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे.
- स्वावलंबन:स्वतःस लागणार्या बियाण्यांचे उत्पादन. शेणखत, गांडूळखत, द्रव खते, वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
ग्य्यु वू उकेब् ओइह्द् ओझ्म् इओर् बु्िहर तदा गाैौ दलवदत ?????????
कीटकांचा प्रतिबंध
योग्य निवड
- रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे. प्रतिरोधी बियाण्यांचा वापर, जैव विविधतेचे पालन.
- आलटून पालटून वेगवेगळी पिके घेणे.
- सापळा पिकांचा वापर करणे
शेतकी उपाय
- पक्ष्यांच्या घरट्यांची स्थापना (पक्षी खीड खाऊन टाकतात))
- दिव्याचा सापळा,चिकट बश्यांचा वापर, कामगंध सापळे यांचा वापर.
जैविक उपाय
- कीटकभक्षक (परजीवी) जैविकांचा वापर, यजमान कीटकांचा वापर
वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर
अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात. यातीलकडुनिंब सर्वात प्रभावी असते. कडिनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटनियंत्रणात एक महत्वाचा घटक आहे. या अर्काने सुमारे २०० कीटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
गोमूत्र
१:२० प्रमाणात वापर केल्याने कीट नियंत्रण होते व पिकांची वाढपण नीट होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.