• *मुख्यपृष्ठ*
 • *ई-फेरफार*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  देशी गायपालन

  देशी गायपालन( शेतकरी अरुणराव पाटील)

  देशी गायपालन आणि शेतकरी असा विषय निघाला की पश्चिम महाराष्ट्रातील जाणकारांच्या तोंडी शेतकरी श्री.अरूणराव पाटील यांचे नाव चटकन येते.

  अरूणरावांच्या दारात जावून ग्राहक 2100 रुपये किलोने देशी तूप विकत घेतात. गायपालनातून समृध्दीचा एक नवा आदर्श अरूणरावांनी शेतक-यांसमोर ठेवला आहे.

  कोल्हापूरपासून 22 किलोमीटरवर केबवडे(ता.करवीर) येथे श्री.पाटील गायपालन करतात. बारावी शिक्षण घेतलेल्या अरूणरावांकडे सहा एकर शेती आहे. त्यांच्या गोठयात सहा देशी गीर गायी आहेत. गोवंशाचा अभ्यासक शेतकरी म्हणून त्यांनी आज नाव कमावले आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे आज राज्यातील अनेक शेतकरी गोपालनात यशस्वी झाले आहेत.

  “मी शेतात काम करीत असतांना वडिलधारी माणसं गायीला गोमाता का म्हणतात याचा विचार करीत असे. त्यातून मी देशी गायींचा अभ्यास करू लागलो. गाय ही सतत पैसा,आरोग्य,समृध्दी देणारा प्राणी असल्याचे माझ्या लक्षात आले. गोपालनातून आमच्या कुटुंबाची भरभराट झाली,’

  अरूणरावांची एक गाय रोज बारा लिटर दूध देते. ते 70 रुपये लिटरने दुधाची विक्री करतात. तुपाचा विचार केल्यास प्रतिवर्षी दोन हजार लिटर दूध एका गायीपासून मिळते. ‘मी 22 लिटर दुधापासून एक किलो तूप बनवतो आणि

  2100 रुपये किलोने विक्री करतो. मला एका गायीपासून वीस किलो तुप मिळते व त्यातून 40 हजार रुपये मिळतात,’ असे अरूणराव अभिमानाने सांगतात.

  अरूणरावांच्या गोठयात एक गायीपासून दहा किलो शेण मिळते. त्यात गुळ,डाळपिठ मिसळून ते खत तयार करतात. त्यामुळे किमान 200 रुपयांचे रोजचे खत मिळते. गोमूत्र देखील वर्षाकाठी एक हजार लिटर मिळते. गोमूत्र अर्क स्वतः ते बनवत नाहीत. मात्र, बाजारात गोमूत्र अर्क 100 रुपये लिटरने विकला जातो, असे ते सांगतात.

  “गोपालनामुळे मी ताकाची विक्रीही उत्तम करतो. कारण, तुपासाठी 22 लिटर दूध वापरल्यानंतर मला 30 लिटर ताक मिळते. 600 ताक देखील मी वर्षाकाठी विकतो. घरच्या शेतातील चारा, पशुखाद्याचा संतुलित वापर आणि आरोग्याची काळजी घेतल्यास गाय म्हणजे कामधेनू ठरते, असे अरूणराव आत्मविश्वासाने म्हणाले.

  देशी गोवंशाचे शेतीमधील महत्व याविषयावर अरूणराव पाटील राज्यभर फिरून व्याख्याने देतात. त्यांच्या माहितीमुळे अनेक शेतक-यांनी संकरित गायी सोडून देशी गायपालन व्यवस्या सुरू केला आहे. आरएमएलच्या शेतक-यांना ते 8275267935 या क्रमांकावर भेटू शकतील. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.