• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १६ जानेवारी, २०१८

    Date setting software..

    आपल्यातील बऱ्याच तलाठी बंधू/भगिनींना नमुना ९ ची नोटीस बजावल्याची तारीख भरत असताना बऱ्याच वेळा “सदर माहितीचे स्वरूप चुकीचे आहे  अशा आशयाची एरर येते.
          सदरची एरर ही आपल्या Desktop/Laptopदिनांकाची सेटिंग चुकीची असल्यामुळे येते.
    यासाठी आपण सेटिंग बदलण्याचा प्रयत्नही करतो, परंतु बऱ्याच Desktop/Laptop मध्ये सेटिंग व्यवस्तीत करूनही सदरची एरर येते.
    हा होणारा त्रास वाचवण्‍यासाठी DateSetting Software हे सर्वांकरिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदरDateSetting Software खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्‍या व Desktop/Laptop वर रन करा.

    इतके केल्यावर चुकीच्या दिनांकाबाबत च्या एरर येणार नाहीत.
                    For Windows 7 & 8 all version
      

    Windows 10 all version


    सौजन्य
    इकबाल मुलांनी कोरेगाव 



    ७ डिसेंबर, २०१७

    महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 42 ते 45 मधिल सुधारणा

                          महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966  चे कलम 42 ते 45 मध्‍ये गेल्‍या 4 वर्षात अनेक सुधारणा केल्‍या आहेत.नगर परिषद पर‍िसर येेेेथे शासनाने विकास योजने अंतर्गत क्षेत्र निश्‍चीत करुन अकृषक वापर करणे बाबत  धोरण ठरविले आहे.ज्‍या ठ‍िकाणी विकास आराखडा अंतीम र‍ित्‍या प्रस‍िध्‍द झाला नाही  त्‍या साठीचे धोरण .त्‍या सर्व सुधारणा बाबत काय कार्यवाही करावी यांची माहीती सर्व महसुल अधिकारी,कर्मचारी,तलाठी,नागरीक यांना व्‍हावा या साठी सर्व सुधारणांचे PDF  कॉपी खालील लिंक वर ठेवण्‍यात आल्‍या आहे.
                     

                                                                     * संकलन*
                                                 श्री शशीकांत सानप तलाठी-ता.पनवेल
                                                 श्री कामराज चौधरी तलाठी-ता.पुसद 



    २८ ऑक्टोबर, २०१७

    विभागीय दुय्यम सेवा परीक्षा नमुना उत्तर पत्रिका (ssd notes)

    तलाठी संवर्ग सेवा प्रवेश केल्यानंतर सेवेत कायम होणेसाठी 4 वर्षात 3 संधीत विभागीय दुय्यम सेवा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.त्यानुसार शासन निर्णया नुसार दरवर्षी सप्टेंबर / ऑक्टोबरमध्ये सदर परीक्षेचे आयोजन प्रत्येक जिल्हावार होत असते नवीन तलाठी यांना सदर परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही किंव्हा परीक्षेचे स्वरूप माहिती होत नाही. या साठी आपले महसूल मित्र श्री मोहसीन शेख तलाठी ता.कर्जत जिल्हा अहमदनगर यांनी विभागीय दुय्यम सेवा परीक्षेच्या सर्व 1 ते 4 पेपरच्या नमुना उत्तर पत्रिका तयार केल्या आहे.  त्या आपल्याला खलील पेपर क्रमांक नुसार लिंक वरून pdf स्वरूपात डाउनलोड करता येईल


    लेख 
    महसूल मित्र श्री मोहसीन शेख तलाठी ता.कर्जत

    ४ ऑगस्ट, २०१७

    नविन खाता मास्‍टर पुर्व तयारी software फाईल

    खाता मास्‍टर मध्‍ये दुरुस्‍ती साठी आपनास खात्‍याची पुर्व तयारी करावी लागेल .त्‍यात समान आलेली नावे,नावातील स्‍पेलींगमध्‍ये चुका ई. शोधावे लागेल. त्‍यासाठी आपनास Excel sheet मध्‍ये सदर Data घ्‍यावा लागतो व वरिल कार्यवाही करावी लागते. ती पुर्वतयारी अधिक सुलभ व्‍हावी या करिता आपनासर्वां साठी New  Data  arrange software Split file  श्री इकबाल मुलाणी तांत्रीक सहाय्यक यांनी तयार केले आहे.हे सॉफ्टवेअर वापरुन आपन अगदी कमी वेळात खाता मास्‍टर पुर्व तयारी अचुक तय्यार करु शकाल.


    ई-फेरफार किंवा रिएडीट मधून जी ८अ ची यादी आपण खाते विभागणी व एकत्रीकारणासाठी वापरत होतो त्याच यादीचा उपयोग करून आपण Split_Final मध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने उत्कृष्ट प्रतीचे काम करू शकतो. आपणास हस्तलिखित अभिलेखामध्ये खातेदारांच्या नावांमध्ये नजरचुकीने झालेल्या संपूर्ण चुका लक्षात येतील. व खाते विभागणी व एकत्रीकारण कामात अत्यंत सुलभता येते.

    • १)      जी ८अ ची यादी सॉर्ट करून आपण खाते विभागणी व एकत्रीकारणासाठी वापरात होतो या यादीमधील १.खाते क्रमांक व २. खातेदारांच्या नावांची संपूर्ण गावाची यादी कॉपी करून Split_Final फाईल मधील Sheet1 मध्ये दिलेल्या कॉलम मध्ये नमुन्यासाठी दिलेला (फक्त खातेदारांचा डाटा सिलेक्ट करून डीलीट करून) पेस्ट करा. व (खातेदारांची यादी Split करणेसाठी येथे क्लिक करा.) या बटनवर क्लिक करा ......... आणि Sheet2 पहा.
      २)      Sheet 2  मध्‍ये  खाते क्रमांक A कॉलम ला पेस्‍ट करा.

      फक्त इतकंच काम करून आपणास असे लक्षात येईल कि आपल्या गावामधील सर्व डुप्लीकेट असलेली खाती Sheet2 मध्ये लाल रंगामध्ये दिसून येतील.  ते पाहून पुढील कार्यवाही करावी.

    Created By

    श्री इकबाल मुलाणी. तांत्रीक सहाय्यक, 
    कोरेगांव जि.सातारा

    Published By 

    कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    ckamraj@outlook.com 
    www.talathiinmaharashtra.in 

    ३० जुलै, २०१७

    खाता मास्‍टर व RE-Edit मार्गदर्शक PPT

    DILRMP प्रकल्‍पांतर्गत हस्‍तलिखीत 7/12 व संगणीकृत 7/12 जुळविणेचे दुष्‍टीने चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत 7/12 तपासणी माहीमेस प्रारंभ झाला व त्‍यातुन निघणा-या त्रुटीच्‍या दुरुस्‍ती साठी खाता मास्‍टर व रिएडीट प्रणाली  उपलब्‍ध करुन दिली आहे. त्‍या प्रणालीत कशा प्रकारे काम करावे या साठी राज्‍य समन्‍वयेक ई-फेरफार प्रकल्‍प व महाराष्‍ट्रातील अनेक तलाठी यांनी तयार केलेल्‍या मार्गदर्शक सुचनांच्‍या PPT  फाईल सर्व तलाठी यांना खालील लींंक वरुन उपलब्‍ध करुन घेता येेेेईल. 


    • संकलन 
    • कामराज चौधरी तलाठी पुसद जि.यवतमाळ 



    २४ जुलै, २०१७

    प्रधानमंत्री पीक विमा योजना 2017

    संपूर्ण देशात एकाच प्रकारचा पीक विमा असावा या साठी सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे . त्यानुसार पिकाच्या एकूण जोखिम स्तराच्या 2% प्रीमियम भरावे लागेल उदा.सोयाबीन पिकास जोखीम स्तर 40000 रु आहे त्याचा प्रीमियम 800 रु आहे . सदर पीक विमा या वर्षी महा ई सेवा केंद्रात सुद्धा भरता येईल अधिक माहिती साठी खालील माहीती पत्रक पहा.

    संकलन 
    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ



    १८ जुलै, २०१७

    Re-edit खाता मास्‍टर पुर्व तयारी Data arrange software

    DILRMP प्रकल्‍पांतर्गत हस्‍तलि‍खित 7/12 व संगणीकृत 7/12 जुळविणेचे दृष्‍टीने आपन Edit Module वापरुन 7/12 मधिल दुरुस्‍ती केल्‍या आहे. त्‍यानंतर चावडी वाचनामध्‍ये आढळुन आलेल्‍या चुका,तपासणी अधिकारी यांनी तपासणीतील चुका ई.दुरुस्‍ती साठी Re-edit मोडुल दिले  आहे. आणी त्‍यातच आपनास खात्‍या संबंधी दुरुस्‍ती साठी खाता मास्‍टर दिले आहे. या खाता मास्‍टर मध्‍ये दुरुस्‍ती साठी आपनास खात्‍याची पुर्व तयारी करावी लागेल .त्‍यात समान आलेली नावे,नावातील स्‍पेलींगमध्‍ये चुका ई. शोधावे लागेल. त्‍यासाठी आपनास Excel sheet मध्‍ये सदर Data घ्‍यावा लागतो व वरिल कार्यवाही करावी लागते. ती पुर्वतयारी अधिक सुलभ व्‍हावी या करिता आपनासर्वां साठी  Data  arrange software श्री इकबाल मुलाणी तांत्रीक सहाय्यक यांनी तयार केले आहे.हे सॉफ्टवेअर वापरुन आपन अगदी कमी वेळात खाता मास्‍टर पुर्व तयारी अचुक तय्यार करु शकाल.
    • सर्व प्रथम OCU मधुन खातेदार यादी कॉपी करुन घ्‍या.
    • सदर कॉपी यादी या Excel Sheet मधील Data Sheet मध्‍ये पेस्‍ट करा 
    • त्‍यानंतर पुठील Sheet वरील गटक्रमांक, खाता क्रमांक व खातेदाराचे नाव ई कोण्‍ातेही ऑपश्‍न वापरुन आपन यादी Short करु शकतो. 
    सदर Excel Sheet Data  arrange software डाउुनलोड करणे साठी खालील लिंक वर क्‍लीक करुन मिळवा


    श्री इकबाल मुलाणी. तांत्रीक सहाय्यक, 
    कोरेगांव जि.सातारा

    Published By 

    कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    ckamraj@outlook.com 
    www.talathiinmaharashtra.in 





    २८ जून, २०१७

    शेतजमिनीची खरेदी

    सर्वसामान्य शेतकरी,व्यक्ती यांना शेतजमिनी खरेदी करताना अनेक प्रश्न निर्माण होतात उदा. जमिनीचा प्रकार ,जमिनीची मालकी ,क्षेत्र इत्यादी या सर्व प्रश्नावर सर्वात सोप्या भाषेत उत्तर डॉ संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी आपल्या ‛शेतजमिनीची खरेदी’ या अत्यंत उपयुक्त लेखात दिले आहे.
    खालील लिंकवरून सदर लेख pdf स्वरूपात प्राप्त करा.


    लेखातील ठळक वैशिष्टे.
    1. शेतजमिनीचे सर्वसामान्य प्रकार
    2. जमिनीचे धारणा प्रकार 
    3. सातबारा कसा संबंधी माहिती
    4. शेतकरी नसलेल्या व्यक्तीने जमीन खरेदी करणे
    5. आदिवासी ,गैर आदिवासी जमीन खरेदी
    इत्यादी सर्व बाबींची माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडण्यात आली आहे..

    लेखक
    डॉ संजय कुंडेटकर ,सर उपजिल्हाधिकारी 
    संकलन 
    कामराज चौधरी,तलाठी - पुसद जिल्हा यवतमाळ


    २० मे, २०१७

    'एकशे एक महसूली लेख'

    आदरणीय डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्‍हाधिकारी, सातारा यांनी त्‍यांच्‍या महसूल खात्‍यातील सेवेच्‍या अनुभवातुन व त्‍यांना अनेक लोकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांच्‍या आधारे, महसूल कायद्‍यातील अडचणींवर मात  करण्‍यासाठी आजपर्यंत शंभरपेक्षा जास्‍त लेख लिहीले आहेत. महसूल विभागामध्‍ये कार्यरत असणार्‍या  सर्वच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सरांच्‍या या सर्व लेखांचा दैनंदिन कामकाजात मोठ्‍या प्रमाणात उपयोग आणि मदत होत आहे. तसेच अनेक सामान्‍य नागरीकांना सुद्धा कायद्याचे ज्ञान होण्‍यास या लेखांमुळे मोठी मदत झाली आहे.
    त्‍यामुळेच सरांचे सर्व लेख एकत्र एकाच पुस्‍तकात राहावे अशी कल्‍पना उदयास आली.व आज ती 'एकशे एक महसूली लेख' या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातुन आपल्‍या पर्यंत पोहचवीत आहो.सरांनी आज पर्यंत लिलीलेले सर्व लेख या पुस्‍तकात समाविष्‍ठ केले आहे.त्‍या सर्वांचा आपनास निष्‍चीतच फायदा होईल याच अपेक्षेने प्रकाशीत. आदरणीय डॉ.संजय कुंडेटकर,सरांचे खुप खुप आभार.



    • लेखक 
    डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी,सातारा
    • संकलन व प्रकाशक 
    कामराज चौधरी.तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in



      

    १४ एप्रिल, २०१७

    डॉ.संजय कुंडेटकर सर,यांची सचित्र MLRC 1966

               महसुल विभागाची सर्व कार्यपद्धती ज्‍या न‍ियमावर  आधारीत आहे.ज्‍या कायद्यानुसार संपुर्ण कामकाज चालते तो अधिनियम म्‍हणजे महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 होय. सामान्‍य व्‍यक्‍तीस व कर्मचारी यांना कायदे किंवा नियमांची रचना त्‍यातील भाषेमुळे समजण्‍यास बरेच वेळेस कठीण जाते. म्‍हणुनच डॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्‍हाधिकारी, यांनी सचित्र 1) महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966  2) गाव नमुना 8  व 3) कलम 150 फेरफार नोंदवही व विवादगस्‍त नोंद ईत्‍यादी बाबत सचित्र  ( PPT) तयार केली आहे. त्‍यातील काही कलम सर्वांन साठी खालिल लिंक वर उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. 

     डॉ.संजय कुंडेटकर सर, 
    उपजिल्‍हाधिकारी,महा.शा.