• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २२ फेब्रुवारी, २०२४

  Income Tax Software 2023-24

   सन 2023-24 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी-2024 महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही  आयकर कर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी-2024 च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे .त्याकरिता आयकर चे दोन भाग करण्यात आलेले आहे.

  जुन्या स्लॅप इन्कमटॅक्स आणि  नवीन स्लॅप ( Inome Tax Calculation u/s 115BAC ) इन्कमटॅक्स त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता एकत्रीत अशी माहिती एकाच EXL.FILE मध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल.

  Income Tax Software GPS NPS
  निर्मिती
  श्री सुधाकर गिरे तलाठी तथा ई-चावडी समन्वयक 
   ई-फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे

  संकलन व प्रसिद्धी 
  कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ


  ८ नोव्हेंबर, २०२३

  तलाठी दप्तरातील महसूल विषयक करांचा भरणा करणे करीता नागरिकांना ऑनलाइन पर्याय उपलब्ध


  तलाठी दप्तरातील महसूल विषयक करांचा भरणा करणे करीता नागरिकांना ऑनलाइन पर्याय उपलब्ध नागरिकांना तलाठी स्तरावरील महसूल कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देणारे तलाठी साजा पुसद खंड दोन तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील श्री कामराज चौधरी तलाठी पुसद खंड 2 यांनी हा प्रयोग राज्यात प्रथम केला आहे. राज्य शासनाने तलाठी यांचे संपूर्ण दप्तर सन 2023 24 पासून ऑनलाईन करण्याचे निश्चित केले वरून सर्व राज्यातील तलाठी दप्तर हे ई- चावडी या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन केले आहे तलाठी दप्तरातील महत्त्वाचा विशेष भाग म्हणजे महसूल विषयक कर/वसुली ही देखील ऑनलाइन मागणी निश्चिती करिता उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार तलाठी आपले सजा अंतर्गत मागणी ऑनलाइन पद्धतीने निश्चित करून महसूल कर वसूल करत आहे परंतु नागरिकांना सदर कराचा भरणा हा रोख पद्धतीने करावा लागत आहे थेट ऑनलाइन पर्यायने भरणे करिता उपलब्ध करून देण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालय मध्ये जाऊन महसूल कराचा भरणा रोखपद्धतीने करावा लागतो. आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात ह्यात बदल होणे आवश्यक असल्याने नेमकी हीच बाब हेरत आणि नागरिकांची निकट लक्षात घेता पुसद खंड दोन तालुका पुसद जिल्हा यवतमाळ सज्याचे तंत्रस्नेही तलाठी श्री कामराज बसवण्णा चौधरी यांनी त्यांचे सज्यातील खातेदार /नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या महसुली कराचा भरणा करणे करिता ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नागरिक जेव्हा तलाठी कार्यालयात महसुली कराचा भरणा करण्याकरिता येतात तेव्हा सदर तलाठी हे त्यांचे गावातील महसूल मागणीनुसार त्यांची पावती तयार करतात व नागरिक जर तो भरना रोख स्वरूपात न करता ऑनलाईन करण्याची विनंती करीत असेल तर त्या पावतीची सदर तलाठी हे ग्रास प्रणालीवर चलन तयार करतात व चलन रक्कम भरणे करिता यूपीआय पर्यायचा वापर करून किंवा QR कोड स्कॅन चा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देतात त्यानुसार नागरिक खातेदार हे त्यांचे मोबाईल वरून यूपीआय पर्यायातून QR कोड स्कॅन करून सदर कराचा भरणा करतात. आणि नागरिकांचा कराचा भरणा तात्काळ शासन जमा होतो. या प्रयोगाचा /कल्पनेचा वापर करून संपूर्ण राज्यात हा प्रयोग केल्यास महसूल विषयक कराचा भरणा व इतर करांचा भरणा करणे अत्यंत सुलभ होणार आहे..  श्री कामराज चौधरी तलाठी पुसद खंड 2 
  ता पुसद जिल्हा यवतमाळ 
   www.talathiinmaharashtra.in   २७ जानेवारी, २०२३

  7/12 कसा वाचवा


  शेतकरी बांधवानसाठी सर्वात महत्वाचा उतारा म्हणजे 7/12, हा 7/12 कृषक व अकृषक या 2 रूपात असतो त्यावर कोणत्या बाबी नमूद असतात या बाबत माहिती खालील बॅनर वरून आपल्याला सहज  लक्ष्यात येईल.

  7/12 वाचन   लेखन व निर्मिती

  कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ

  १० नोव्हेंबर, २०२२

  ई चावडी मागणी निश्चिती व कामकाज

   ई चावडी प्रकल्पा अंतर्गत पुढील टप्प्यात प्रत्येक तहसील निहाय 15 नवीन गावांची इ चावडी साठी निवड केली आहे .त्यात आता प्रत्यक्ष काय कामकाज करावे या बाबत मंडळ अधिकारी जिल्हा अकोला  श्री अन्सार शेख यांनी त्यांचे you tube चॅनेल वर व्हिडिओ तयार केला आहे तो आपल्याला प्रत्यक्ष कामकाज करतांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खालील लिंक वरून तो आपण पाहू शकतो व संग्रही ठेऊ शकाल..  गाव नमुने तपशील


  अहवाल पाहणे 


  नमुने कसे भरावे 
  मागणी दुरुस्ती 
  निर्मिती

   श्री अन्सार शेख मंडळ अधिकारी अकोला

  प्रसिद्धी

  कामराज चौधरी तलाठी पुसद

  १३ ऑगस्ट, २०२२

  ई पीक पाहणी सुधारीत मोबाईल ॲप :व्हर्जन 2

  शेतकरी बांधवांनी शेतातील पीकांची/फळे माहिती (हंगाम निहाय )थेट गाव नमुना 7/12 मध्ये दर्शविण्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प पुर्ण् राज्यात सन 2020-21 पासून  राबविण्यात येत आहे.यासाठी आम्ही राज्यातील तलाठी/मंडळ अधिकारी तसेच शेतकरी बांधवांना या प्रकल्पाची परिपुर्ण माहिती होण्यासाठी पीपीटी तयार केली असून ती सर्वासाठी उपयोगी होईल असा आमचा मानस आहे… तसेच ज्याठिकाणी शेतकरी बांधवांची कार्यशाळा/तलाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील त्याठिकाणी ही पीपीटी उपयुक्त ठरेल,यामध्ये ई पीक & nbsp; ॲप मधील नवीन सुधारणा,कामकाज टप्पे इ. माहिती सविस्तर पणे दिलेली आहे.


  ई पीक पाहणी सुधारीत मोबाईल ॲप :व्हर्जन 2 PPT


  सौजन्य

  महाराष्ट्रातील तलाठी…परिवार.  २ जुलै, २०२२

  गाव नमुना सहा क मध्ये अतिरिक्त तपशील

  1.सहा क भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही अतिरिक्त तपशील यापुर्वी आपल्याला भरता येत नसे,मात्र आता सुविधा मेन्यू तील वारस नोंदवही मधील गाव नमुना 6 क वारस नोंदवही प्रमाणीत वारस फेरफारांच्या व्यवहाराची अतिरिक्त माहिती भरणे या पर्याय चा वापर करावा… ( मंडळ अधिकारी यांनी सहा क  मंजुर केल्यानंतर ही सुविधा वापरता येईल.)


   2. येथे ज्या वारस नोंदी मध्ये आपणास अतिरिक्त तपशील भरायचा आहे तो फेरफार क्र. निवड करावा,खालील प्रमाणे माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल.. खालील Blank Box मध्ये आपणास आवश्यक ती अतिरिक्त माहिती भरता येईल 


  3. अतिरिक्त माहिती भरुन झालेनंतर माहिती साठवा करावी 


  4.अतिरिक्त भरलेला तपशील फेरफार मध्ये दिसून येईल…


  गाव नमुना 6 क अतिरिक्त माहिती PPT

  *REMARK* 

  माहिती साठवा करून झालेनंतर अजुनही आपणास काही माहिती भरायची आवश्यक वाटत असल्यास पुन्हा फेरफार निवड करून माहिती भरता येईल.मात्र नमुना 9 / वर्दी नोटीस ची प्रिंट काढल्यानंतर अतिरिक्त माहिती भरण्यासाठी फेरफार क्रमांक उपलब्ध/ खुला होणार नाही..

  तसेच सहा क मधील मूळ तपशील edit/बदल करता येणार नाही

  यांची नोंद घ्यावी

  PPT निर्मिती 

  शशिकांत सानप तलाठी जुई जि रायगड


  २१ जून, २०२२

  ई-चावडी गाव नमुना 1 ची माहिती भरणे📝

  ई-चावडी मध्ये सर्व नमुने ऑनलाईन भरावे लागणार आहे त्या अनुषंगाने राज्यातील 365 तालुक्यातील प्रायोगिक तत्वावर 1 गावाची निवड केली आहे.. त्या गावातील ई चावडी मध्ये गाव नमुना 1 ची माहिती कश्या प्रकारे भरावी या बाबत सविस्तर   माहिती या video मध्ये दिली आहे.. त्या माहितीचा उपयोग करून योग्य पद्धतीने माहिती भरण्यास मदत होईल..


  ई-चावडी  गाव नमुना 1 ची माहिती भरणे  https://www.talathiinmaharashtra.in/p/youtube.html?m=1


  प्रसिद्धी

  कामराज चौधरी तलाठी पुसद

  डिझाईन व चॅनल निर्मिती 

  इकबाल मुलाणी सातारा


  www.talathiinmaharashtra.in


  २० जून, २०२२

  ई-चावडी महाराष्ट्र

  सर्वांना कळविण्यात आनंद होतो की, DILRMP प्रकल्पातंर्गत शासनाने नव्याने सुरु केलेल्या ई-चावडी प्रकल्पा संबंधी विस्तुत माहीती  देण्या साठी  ई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनल  नव्याने तयार केले आहे.सदर चॅनेल चे माध्यमातुन या पुठे ई-चावडी विषयीचे सर्व  माहीती  आणी  ई फेरफार बाबत ची सर्व माहीती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी सर्वांना विनंती की आपन सर्वांनी सदर ई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनल ला भेट द्यावी व SUBSCRIBE करावे. आजचा पहीला video 


  आपला

  कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ

  www.talathiinmaharashtra.in

  डिझाईन व निर्मीती.

  ईकबाल मुलाणी सातारा.

  १४ मे, २०२२

  तुकडे जोड तुकडे बंदी कायदा रद्द झालेला नाही. न्यायालयाने नेमके काय आदेश दिले होते ?

   या व्हिडिओमध्ये माननीय उच्च न्यायालयाने नोंदणी कायद्याबद्दल नेमका काय निर्णय दिला आहे याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक नागरिकाने जमीन खरेदी करताना, अंमलात असलेल्या कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.  एखाद्या खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त जर कायदेशीर तरतुदी विरुद्ध असेल तर कदाचित त्याची नोंदणी होईल परंतु सातबारा सदरी नाव दाखल होणार नाही याची नोंद घ्यावी.

   त्यामुळे कोणताही खरेदी-विक्री व्यवहार करताना तो व्यवहार प्रचलित कायद्याविरुद्ध नाही याची प्रत्येकाने खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.  २ एप्रिल, २०२२

  तलाठी दप्‍तरातील गाव नमुने 1 ते 21

  तलाठी दप्‍तरातील गाव नमुने 1 ते 21 | ✔️ डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी | Mahsul Guru