• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २० मे, २०१७

    'एकशे एक महसूली लेख'

    आदरणीय डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्‍हाधिकारी, सातारा यांनी त्‍यांच्‍या महसूल खात्‍यातील सेवेच्‍या अनुभवातुन व त्‍यांना अनेक लोकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांच्‍या आधारे, महसूल कायद्‍यातील अडचणींवर मात  करण्‍यासाठी आजपर्यंत शंभरपेक्षा जास्‍त लेख लिहीले आहेत. महसूल विभागामध्‍ये कार्यरत असणार्‍या  सर्वच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सरांच्‍या या सर्व लेखांचा दैनंदिन कामकाजात मोठ्‍या प्रमाणात उपयोग आणि मदत होत आहे. तसेच अनेक सामान्‍य नागरीकांना सुद्धा कायद्याचे ज्ञान होण्‍यास या लेखांमुळे मोठी मदत झाली आहे.
    त्‍यामुळेच सरांचे सर्व लेख एकत्र एकाच पुस्‍तकात राहावे अशी कल्‍पना उदयास आली.व आज ती 'एकशे एक महसूली लेख' या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातुन आपल्‍या पर्यंत पोहचवीत आहो.सरांनी आज पर्यंत लिलीलेले सर्व लेख या पुस्‍तकात समाविष्‍ठ केले आहे.त्‍या सर्वांचा आपनास निष्‍चीतच फायदा होईल याच अपेक्षेने प्रकाशीत. आदरणीय डॉ.संजय कुंडेटकर,सरांचे खुप खुप आभार.



    • लेखक 
    डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी,सातारा
    • संकलन व प्रकाशक 
    कामराज चौधरी.तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in



      

    १४ एप्रिल, २०१७

    डॉ.संजय कुंडेटकर सर,यांची सचित्र MLRC 1966

               महसुल विभागाची सर्व कार्यपद्धती ज्‍या न‍ियमावर  आधारीत आहे.ज्‍या कायद्यानुसार संपुर्ण कामकाज चालते तो अधिनियम म्‍हणजे महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 होय. सामान्‍य व्‍यक्‍तीस व कर्मचारी यांना कायदे किंवा नियमांची रचना त्‍यातील भाषेमुळे समजण्‍यास बरेच वेळेस कठीण जाते. म्‍हणुनच डॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्‍हाधिकारी, यांनी सचित्र 1) महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम 1966  2) गाव नमुना 8  व 3) कलम 150 फेरफार नोंदवही व विवादगस्‍त नोंद ईत्‍यादी बाबत सचित्र  ( PPT) तयार केली आहे. त्‍यातील काही कलम सर्वांन साठी खालिल लिंक वर उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. 

     डॉ.संजय कुंडेटकर सर, 
    उपजिल्‍हाधिकारी,महा.शा.



    २१ फेब्रुवारी, २०१७

    INCOME Tax फाईल. (Software)

      आपले इन्कम TAX आपणच भरा..

    प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 




    *Softwareनिर्मिती*
    श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि.बुलढाणा

    *संकलन व प्रसिध्‍दी* 
    कामराज चौधरी, तलाठी-पुसद जि.यवतमाळ

    ९ फेब्रुवारी, २०१७

    ई-महाभूमी प्रकल्‍प अंमलबजावणी (NLRMP)

    राष्‍ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात शेती संदर्भातील सर्व दस्‍तऐवज  संगणीकृत करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असुन .त्‍याच कार्यक्रमांचा महत्‍वाचा भाग म्‍हणजे ई-फेरफार हा आहे. ई-फेरफार पुर्वतयारी , Edit module मध्‍ये करावयाची पुर्व तयारी ई,आवश्‍यक असणा-या सर्व बाबींची माहीती सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी,DBAनायब तहसिलदार , DDE उपजिल्‍हाधिकारी यांना व्‍हावी या साठी मा. रामदास तगताप सर,उपजिल्‍हाधिकारी तथा राज्‍य समन्वयक ई-फेरफार प्रकल्‍प जमाबंदी आयुक्‍त कार्यालय पुणे यांनी माहीतीची चित्र फित (PPT) तय्यार केली आहे. सदर चित्र फित (PPT) PDF  स्‍वरुपात मिळविण्‍यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
    -:लेख:-
    मा. रामदास तगताप सर,
    उपजिल्‍हाधिकारी तथा राज्‍य समन्वयक
     ई-फेरफार प्रकल्‍प जमाबंदी आयुक्‍त कार्यालय पुणे

    ३ फेब्रुवारी, २०१७

    NPS (National pension system) मध्‍ये जमा रक्‍कमेचा व DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमेचा तपशिल शोधणे.

    महाराष्‍ट्र शासनाने ऑक्‍टोंबर 2005 नंतर सेवेत रुजु होणा-या कर्मचारी/ अधिकारी यांना अंशदायी निवृृत्‍ती योजना लागु केली आहे.त्‍या नुसार पगारातील 10% रक्‍कम कपात करुन DCPS खात्‍यात जमा करणे व तेवढीच रक्‍कम शासनाने जमा करणे अशा स्‍वरुपाची ती योजना आहे. आता महाराष्‍ट्र शासनाने सदर योजना  दि 01/04/2015 पासुन केंद्राच्‍या  NPS ( National pension system) या योजनेत रुपांतर केली आहे.त्‍या नुसार आपले  पगारातील 10% रक्‍कम कपात करुन NPS खात्‍यात जमा  केली आहे. त्‍या योजनेतील  जमा रक्‍कमेचा तपशिल कसा शोधावा व  DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमे सोबत त्‍याचा कसा ताळमेळ बसवावा या साठी PDF फाईल तयार केली आहे . ती PDF फाईल खालील लिंक वरुन download करुन जमा रक्‍कमेचा ताळमेळ बसवु शकाल.


    -: लेख :- 
    कामराज बसवन्‍ना चौधरी
    तलाठी पुसद जि यवतमाळ 



    ३ जानेवारी, २०१७

    आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्‍याचे सॉफ्टवेअर( new version)

    गाव नमुना 7/12 वरिल खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढणे  आपनास सुत्र माहीत नसेल तर कठीण व अवघड जाते  त्‍या साठीच कोणतेही सुत्र न वापरता खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र  काढण्‍यासाठी श्री ईकबाल मुलानी कोरेगांव जि.सातारा यांनी अत्‍यंत सोप्‍या पध्‍दतीचे आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्‍याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे.  या सॉफ्टवेअर चा उपयोग सर्वांना व्‍हावा या साठी डॉ.संजय कुंडेटकर,उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी ते उपलब्‍ध करुन दिले आहे. खाली दिलेल्‍या लिंक वरुन सदर सॉफ्टवेअर मिळवीता येईल. महसुल मधिल सर्व कर्मचारी /अधिकारी यांना अत्‍यंत उपयुक्‍त सॉफ्टवेअर
    (नविन बदलासह तयार केले आहेत.NLRMPसाठी आवश्‍यक बदल करण्‍यात आले आहे.)





    🔶 आपला🔷
      कामराज चौधरी
    तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in
    🔶🔵🔴🔶🔵🔴🔶🔵🔴🔶

    २ जानेवारी, २०१७

    Forticlient SSLVPN सॉफ्टवेअर online लॉग ईन करण्‍याची पध्‍दती.

    NLRMP मधिल सर्व URL ला  तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या Laptop लॉग ईन करण्‍यासाठी Laptop वर VPN कनेक्टीव्हीटी आवश्‍यक आहे. त्‍या साठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी  Forticlient SSLVPN Software  वापरतात परंतु ते Software  वापरतांना आपनास ब-याच  अडचणी येत  आहे  जसे की वारंवार disconnect होणे, लॉग इन न होणे किंवा लॉग इन साठी बराच वेळ  लागणे. या सर्व समस्‍ये वर  एक उपाय म्‍हणुन सदर Software जर आपन online वापरले तर या सर्व समस्‍या दुर होण्‍यास  मदत होईल. सदर Software online वापरण्‍याची कार्यपध्‍दती खालील PDF फाईल मध्‍ये दिली आहे. त्‍या प्रमाणे कार्यवाही करता येईल. 




    ·        मुळ संकल्‍पना *
    श्री ईकबाल मुलानी रा.कोरेगांव जि सातारा.
    ·         Created by *
    कामराज ब चौधरी तलाठी पुसद  जि यवतमाळ


    ३० नोव्हेंबर, २०१६

    ACTIV X CONTROLL(INTERNET EXPLORER) SETTING SOFTWEAR

                       राष्‍ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात ई- फेरफार प्रकल्‍प सर्व तालुक्‍यात कार्यंवित झाला आहे. त्‍यात मागील काही दिवसान पासुन बदल करण्‍याचे कार्य चालु आहे.त्‍या नुसार प्रत्‍येक विभागास नविन सर्वर देण्‍याची कार्यवाही सुरु आहे.व काही जिल्‍हयांचा 7/12 चा डेटा नविन सर्वर वर हस्‍तांतरीत झाला आहे. त्‍यामुळे सदर सर्वर वर login होणे करिता आवश्‍यक INTERNET EXPLORER वरील security settingenable कराव्‍या लागतात त्‍यास आपला बराच वेळ जातो व काही setting करावयाच्‍या राहील्‍यास login होत नाही व परत वारंवार settingsकराव्‍या लागतात. हासर्वांना होणारा त्रास वाचवण्‍यासाठी ACTIV X CONTROLL(INTERNET EXPLORER)  SETIING SOFTWEAR मा श्री ईकबाल मुलानी यांनी तयार केले असुन डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी सर्वान करिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदर SETIING SOFTWEAR खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्‍या व laptopवर run करा. active x controll (internet explorer)च्‍या सर्व settings सेकंदात reset करा




    ११ नोव्हेंबर, २०१६

    शेतातील रस्‍ते व नकाशे

                             कोणत्‍याही गावाचा नकाशा पाहीला की, त्‍यात प्रदेश वर्णनात्‍मक  तपशिल जसे नदी ,नाला,तलाव ,विहीर,झााडे, पर्वत,टेकडी,झुडपी,जंगल इत्‍यादी तसेच तसेच रस्‍ते ,लोहमार्ग हे सुद्धा आढळतात . रस्‍त्‍याविना गाव नकाशा असणे अशक्‍य प्राय आहे. शेतातील रस्‍ते हे सन 1928चे वेळी जमाबंदी झाल्‍यापासुन आजतगायत काही गावात त्‍यात बदल झाला आहे. शेतामधिल रस्‍तांचा उद्देश हा की,शेतमालकास त्‍यांचे शेतातील होणारे  उत्‍पन्‍न हे बैलगाडीने /डोक्‍यावरुन वाहुन किंवा अन्‍य वाहनाने वाहुन नेता आले  पाहीजे प्रत्‍येक स.नं. चे धारकास एकमेकाचे धु-यावरुन जाणे येण्‍याचा हक्‍क आहे.                      महसुल विभागातील दैनिक कामकाजातील एक विषय म्‍हणजे शेतातील रस्‍ते या वर ब-याच प्रमाणात वाद व समस्‍या निर्माण होतात त्‍या वेळेस आपनास त्‍या गावातील नकाशा पहावा लागतो व त्‍या नकाश्‍या वरिल खुणां नुसार रस्‍त्‍याची लांबी रुंदी ठरवावी लागते. परंतु हृया खुणांची व त्‍यांच्‍या लांबी व रुंदी ची माहीती वेळेवर  उपलब्‍ध होत नाही. त्‍या करिता नकाशातील रस्‍त्‍यांचे प्रकार,त्‍यांची रुदी व रस्‍ते दर्शविण्‍या करिता वापरावयाची चिन्‍हे  इत्‍यादी बाबींचा तपशिलाची माहीती लेख महसुल कर्मचारी / अधिकारी व शेतकरी वर्ग यांचे साठी तयार केला आहे. खालील लिंक वर जावुन सदर लेख मिळवीता येईल.



    ----------------------
    👉लेख👈
    कामराज ब चौधरी 
    तलाठी-पुसद जि.यवतमाळ 
    ckamraj@outlook.com 
    ---------------------

    २० ऑक्टोबर, २०१६

    महसुल संबंधित व्‍याख्‍या.

    महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकदा टिपणी, अहवाल, निकाल किंवा पत्राला उत्तर लिहीतांना एखादया शब्‍दाची कायदेशीर व्‍याख्‍या नमुद करावी लागते. महसूल खात्‍यात दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षा देतांना व्‍याख्‍यांचे महत्‍व लक्षात येते आपन अनेक कायदे राबवीत असतो त्‍यामुळे प्रत्‍येक व्‍याख्‍या लक्षात राहीलच असे नाही.कधीकधी एक व्‍याख्‍येचा कायदेशीर अर्थ जाणुन घेण्‍यासाठीकायद्याची अनेक पुस्‍तके चाळावी लागतात. कधी कधी व्‍याख्‍या लक्षात असते परंतु नेमक्‍या कोणत्‍या कायद्याखाली, कोणत्‍या कलमान्‍वये ती व्‍याख्‍या दिलेलीआहे. हे आठवत नाही. या सर्व गोष्‍टींचा विचार करुन , तातडीच्‍या वेळेला किंवा  दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षाचा अभ्‍यास करतांना ,कोणती व्‍याख्‍या कोणत्‍याकायद्याखाली आणि कोणत्‍या कलमान्‍वये दिलेली आहे हे नेमके कळावे या दुष्‍टीकोणातुन 'महसुल संबंधीत व्‍याख्‍या ' ची रचना डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा. यांनी केली आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्‍याख्‍या , कायदा व कलमांचा उल्‍लेख करुन आपले 'महाराष्‍ट्रातील तलाठी' संकेत स्‍थळावर www.talathiinmaharashtra.in वर उपलब्‍ध करुन दिले आहे. तेव्‍हा सदर महसुली व्‍याख्‍या मिळविण्‍यासाठी खालिल लिंक ला क्‍लिक करा. 





    *लेखक*                                                * संकलन *            
    डॉ.संजयकुंडेटकर,सर                          कामराज चौधरी
    उपजिल्‍हाधिकारी,सातारा.               तलाठी-पुसद जि.यवतमाळ 
                                                               ckamraj@outlook.com 
                           www.talathiinmaharashtra.in