• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २६ जून, २०१५

    “0029-जमीन महसूल,करमणूक शुल्क व गौण खनि‍जे उत्खनन लेखाशिर्षखाली वसूल करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS) या प्रणालीद्वारे जमा करण्याबाबत .

                              महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्‍दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात येत आहे. राज्यातील सहा महसूली विभागांतर्गत सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व त्‍या अतर्गत येणा-या   उपविभागीय आणी तहसिल कार्यालया मध्‍ये सदर प्रणाली दि.1.8.2015 पासून न चुकता लागू होईल हे सुनिच्‍छीत  करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधीकारी यांची असुन त्‍या बाबतचे प्रशिक्षणची जबाबदारी हि वित्त विभागाच्या व्हच्‍र्युअल ट्रेझरी  कार्यालयामार्फत देण्यात येऊन ते दि.31.7.2015 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
                              या बाबत दि.26/06/2015 चा शासन निर्णय येथे पहा.

    GRAS side 

    २० जून, २०१५

    ई-फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचणी.

                                              ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर. ई- फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचण्‍ाी करणे  करिता eMutation.capabillity.Test(ECT) हया लींक चा वापर करुन ई- फेरफार ७/१२ पुर्व ऑनलाईन चाचणी घेता  येईल  येईल.७/१२ मध्ये फेरफार घेण्यापुर्वी त्या गटात काही त्रृटी आहेत काय ? हे फेरफार घेण्यापुर्वीच तपासता येइल . गटामध्ये त्रृटी  असल्यास कोणत्या प्रकारात काय त्रृटी आहे. उदा. अहवाल क्रमांक १ते१४,DBATool ईत्यादी मधील त्रृटी समजेल त्यामुळे फेरफार नोंदविण्यापुर्वी त्रृटी  दुरुस्तकेल्यास प्रलंबित फेरफारची संख्या   कमी होइल.

    ११ जून, २०१५

    रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्‍ये सुधारणा करणेबाबत.( L.T.C )

                    राज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-याांना मुख्‍यालयापासुन त्यांच्या स्वग्रामी जाण्यासाठी चार वर्षाच्‍या एका गटवर्षात दोन स्वग्राम किंवा एक महाराष्‍ट्र दशर्न व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सदर सवलतीच्या अनुषांगाने दि.10/06/2015च्‍या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार अटी व शर्ती एकत्रितपणे  विहीत करण्यात येत आहेत. सदर सुधारीत निर्णयात अविवाहीत कर्मचारी यांची कुटुंब व्‍याख्‍या दिली आहे.
                      सदर शासन निर्णय येथे पहा.

    ४ जून, २०१५

    संगणीकृत 7/12 डेटा ऑनलाईन दुरस्‍ती बाबत.(NLRMP)

                    ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्‍पासाठी आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP 7/12 चा डेटा स्‍टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्‍यावर  संगणीकृत 7/12 डेटामध्‍ये जर काही दुरुस्‍ती करावयाची तर  online data correction  हया लींक चा वापर करुन संगणीकृत डेटा मध्‍ये ऑनलाईन दुरुस्‍ती करता येईल. 

    २३ मे, २०१५

    केंद्रशासनाची नवीन पेन्शन योजना सुरु.

    केंद्रशासनाची नवीन योजना अटल पेन्शन योजना.
    उतार वयात किमान गुंतवणुक,जास्तीत जास्त फायदा.
    हप्‍ता-  मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबुन आहे म्हणजे दरमाह रू ४२ ते रू २१० . लाभार्थी - वयोगट ज्यांचेवय  १८ ते ४०वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी.
    लाभ- ६० वर्ष वयापासुन रू १,००० पासून ते रू ५,००० पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ.
    अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    २२ मे, २०१५

    संगणीकृत 7/12 चा डेटा तपासणी व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन

                 महाराष्‍ट्र राज्‍य  तलाठी मंडळ अधिकारी समन्‍वय महासंघाच्‍या निवेदनाच्‍या अनुषंगाने दि.17/3/2015 रोजी मा. महसुलमंत्री महोदय यांचेशी झालेल्‍या बैठकीतील मुद्या क्र 5 नुसार NLRMP  कार्यक्रमांगर्त संगणीकरण 7/12 चा डेटा ची तपासणी  व्‍हेरीफीकेशन अॅंड व्‍हॅलीडेशन बाबत कार्यवाही  करणे बाबतचे मा.जमाबंदी आयुक्‍त आणी संचालक भुमी अभिलेख ( महाराष्‍ट्र राज्‍य ),पुणे यांचे दिनांक 07/05/2015 चे परिपत्रक पहावयास मिळेल.

    ४ मे, २०१५

    केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

      केंद्र शासनाने दोन नविन योजना सुरु केल्‍या आहेत.

    • ) प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना.  हप्‍ता-  रुपये 330 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 50 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
    • )  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हप्‍ता-  रुपये 12 वार्षिक हप्‍ता .  लाभार्थी - वयोगट  18 ते 70 वर्ष.  लाभ- मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रु. जखमी झाल्‍यास 1 लाख रु.  अट- फक्‍त बॅंकेत खाते असणेआवश्‍यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

    • दोन्‍ही योजनेचा लाभ तुम्‍ही एकत्रीत रित्‍या घेवुन रु.342 च्‍या वार्षिक हप्‍त्‍यामध्‍ये 4 लाख रु.संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्‍या बॅंकेशी संपर्क साधा.

    २८ एप्रिल, २०१५

    हस्‍तलिखीत फेरफार संगणकावर घेणेबाबत.

     आपल्‍या तालुक्‍याचा NLRMP data CD  सब डाटा सेंटरवर ऑनलाईन (ई-फेरफार) साठी अपलोड झाल्‍यावर जर हस्‍तलीखीत फेरफार संगणकात घेण्‍याचे राहुन गेले असतील तर हया (online data updation) लिंक चा वापर करुन सदर राहीलेले फेरफार संगणकात ऑनलाईन टाकु शकता.  या शिवाय आणखी महत्‍वाच्‍या लिंक साठी येथे( NLRMP Project Important URLs/Links ) पाहा.

    ४ एप्रिल, २०१५

    ई-फेरफार ट्रायल रन साठी डाटाकार्ड वापर 750/- रु .

     “ई-फे रफार“व “ई-चावडी“ प्रकल्प संपुर्ण राज्यात राबवि‍णे कामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटाकार्ड वापरासाठी दरमहा रक्कम रूपये 750/- प्रमाणे ऑगस्ट 2014 ते मार्च 2015 अखेर शुल्क अदा करण्याकामी प्रतीपूती रक्कम देणेबाबत चा शासन निर्णय येथे पाहा.“ई-फे रफार” व “ई-चावडी” हा प्रकल्प 1 एप्रिल 2015 पासून संपुर्ण राज्यात सुरु होणे अपेक्षित असल्यानेज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी डेटा काडर् खरेदी के लेले  आहेत व ज्या तालुक्यात ई फे रफार आज्ञावलीचे किमान ट्रायलरन सुरु झाला आहे अशा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी डेटाकार्ड वापराबाबतचेशुल्क ट्रायलरन सुरु झाल्याचे महिन्यापासून रक्कम रूपये(प्रती कर्मचारी रू.750/-) अदा करणे आवश्यक आहे. 

    २९ मार्च, २०१५

    अंशदान निवृत्तीवेतन योजना

    1) नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2014-15  करिता व्याज दर   8.7 %  ठरविण्‍यात आले आहे.सदर व्‍याज दर हा दि.01/04/2014 पासुन लागु करण्‍यात आले आहे करिता शासन निर्णय येथे पाहावयास मिळेल