महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक तरतुदी. हा विषय अत्यंत किचकट असून हिंदू, मुस्लिम आणि पारसी धर्मियांसाठी यात भिन्न तरतुदी समाविष्ट आहेत. महसूल खात्यात अनेक वेळा सर्व धर्मिय वारसांच्या नोंदी हिंदू धर्मिय लोकांना लागू असलेल्या कायद्यानुसार नोंदविल्या जातात. यामुळे भविष्यात अनेक कायदेशीर गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता असते. वारस नोंद हा विषय तलाठी स्तरापासून ते अधिकारी स्तरापर्यंत अनेक वेळा हाताळला जातो. हा विषय किचकट असल्याने याबाबतीतला प्रकरणे काहीशी उपेक्षीत असतात.
महसूल खात्यातील दुसरा किचकट व संभ्रमात पाडणारा विषय म्हणजे मृत्यूपत्राची नोंद. अनेक वेळा तलाठी स्तरावर मृत्यूपत्राच्या नोंदी चुकीच्या घेतल्या जातात किंवा संबंधीताला न्यायालयाचा रस्ता दाखविण्यात येतो. अधिकारी स्तरावरही याबाबत बराच संभ्रम आहे.
खरेतर वारस नोंद किंवा मृत्यूपत्राची नोंद हा खुप काळजीपूर्वक व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करुन हाताळण्याचा विषय आहे. यात वारसा हक्क समाविष्ट असल्याने तो सामान्य जनतेसाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे.
वारस विषयक तरतुदी आणि मृत्यूपत्राची नोंद याबाबत महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा संभ्रम दुर व्हावा या दृष्टीकोनातून "हिंदू, मुस्लिम, पारसी वारसा कायदे आणि मृत्यूपत्राबाबत महत्वाच्या तरतुदी" हा लेख जमेल तितक्या सोप्या भाषेत डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार करुन सादर केला आहे. सदर लेख पुस्तक (PDF) स्वरुपात मिळविण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.
लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर ,बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,एम.डी., पीएच.डी. उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग) मो. ९९२२९६८०५५ e-mail-dcsanjayk@gmail.com

thanks for important information.
उत्तर द्याहटवा