• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २४ फेब्रुवारी, २०१८

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

            शेती व्‍यवसाय करताना होणरे अपघातविज पडणेपूर,सपदंशविचूदुंशविजेचा शॉक बसणे इनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघातरस्‍त्‍यावरील अपघातवाहन अपघाततसेच,अन्य कोणत्‍याही कारणा मुळे होणारे अपघातयामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते.घरातील कर्त्‍या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्‍पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते.अशा अपघातग्रस्‍त शेतकऱ्यांस/त्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” कार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00लाख इतक्‍या विमा संरक्षण देण्यात येते.
      
    लाभार्थ्‍याचे पाञता निेकष
    शेतकरी म्‍हणून म‍हसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्‍ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.   

    विमा संरक्षणासाठी सामाविष्‍ट असलेले अपघात
    • रस्‍ता/रेल्‍वे अपघात
    • बुडून मृत्‍यु
    • विष बाधा
    • विजेचा धक्‍का
    • विज पडणे
    • नक्षलवादी हल्‍ला
    • उंचावरून पडणे
    • सर्पदंश
    • प्राणीदंश
    • खुन
    • जनावराचा हल्‍ला
    • दंगल
    • जंतूंनाशके हाताळताना होणारी विष बाधा
    • इतर अपघात


    दावा सादर करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपञे
    • दावा पञ
    • ६- (फेरफार/ गाव नमुना ६)
    • वारस नोंद-उतारा ६ क
    • शव विच्‍छेदन अहवाल
    • शेतक-याचा वयाचा पुरावा
    • पोलिस स्‍थळ पंचनामा
    • पोलिस (F.I.R.) किंवा जवाब
    • अंपगत्‍व आल्‍यास टक्‍केवारी प्रमाणपञ
    • बॅंक पासबुक प्रत
    • लाभारर्थ्‍याचे स्‍टॅम्‍प पेपरवर प्रतिज्ञापञ
    • सातबारा उतारा
    • मृत्‍यु प्रमाणपञ
    • तलाठी प्रमाणपञ
    • पोलिस मरणोत्‍तर पंचनामा


    विम्‍यापासुन मिळणारे आर्थिक लाभ
    • अपघाती मृत्‍यु                                      -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे   -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे       -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे   -  रू १,००,०००/-


    अर्ज सादर कुठे करावा
    सदर योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्‍हा / तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे आवश्‍यक कागद पञांस‍हीत दावा अर्ज दाखल करा.

     अधिक माहितीसाठी ...www.krishi.maharashtra.gov.in
    व ओरी एन्टल इन्शुरन्स कंपनी ली पुणे   1800 118 485/02026450382

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.