महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.
या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून *डॉ संजय कुंडेटकर सर यांनी* "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. या लेखात महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.* विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्यायालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.
"महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
लेख- डॉ. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी परभणी
संकलन- कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ

सदर संकेत स्थळ खूप महत्त्वाचे असून माहितीबाबत खूप सोईचे आहे... धन्यवाद सर..
उत्तर द्याहटवा