• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १९ एप्रिल, २०१८

    गावठाण हद्यीपासुन २०० मी परिघीय क्षेत्रास अकृषक बाबत कार्य पध्दती.


                                        
                         गावाच्या ,नगराच्या ,शहराच्या हद्यीपासुन २०० मी आतील क्षेत्रातील जनतेस अकृषीक वापराची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधिल कलम ४२ ड नुसार गावठाणाच्या २००मी हद्यीपासुन परिघीय क्षेत्राातील जमीन अकृषक रुपांतरणासाठी खालील प्रमाणे तरतुद करण्यात आली आहे. 

    ५ मार्च, २०१८

    महसूल प्रश्नोत्तरे

    महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.
           या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून *डॉ संजय कुंडेटकर सर यांनी* "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. या लेखात महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.* विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.

           "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.


     लेख- डॉ. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी परभणी
    संकलन- कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ

    २४ फेब्रुवारी, २०१८

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

            शेती व्‍यवसाय करताना होणरे अपघातविज पडणेपूर,सपदंशविचूदुंशविजेचा शॉक बसणे इनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघातरस्‍त्‍यावरील अपघातवाहन अपघाततसेच,अन्य कोणत्‍याही कारणा मुळे होणारे अपघातयामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते.घरातील कर्त्‍या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्‍पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते.अशा अपघातग्रस्‍त शेतकऱ्यांस/त्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” कार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00लाख इतक्‍या विमा संरक्षण देण्यात येते.
      
    लाभार्थ्‍याचे पाञता निेकष
    शेतकरी म्‍हणून म‍हसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्‍ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.   

    विमा संरक्षणासाठी सामाविष्‍ट असलेले अपघात
    • रस्‍ता/रेल्‍वे अपघात
    • बुडून मृत्‍यु
    • विष बाधा
    • विजेचा धक्‍का
    • विज पडणे
    • नक्षलवादी हल्‍ला
    • उंचावरून पडणे
    • सर्पदंश
    • प्राणीदंश
    • खुन
    • जनावराचा हल्‍ला
    • दंगल
    • जंतूंनाशके हाताळताना होणारी विष बाधा
    • इतर अपघात


    दावा सादर करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपञे
    • दावा पञ
    • ६- (फेरफार/ गाव नमुना ६)
    • वारस नोंद-उतारा ६ क
    • शव विच्‍छेदन अहवाल
    • शेतक-याचा वयाचा पुरावा
    • पोलिस स्‍थळ पंचनामा
    • पोलिस (F.I.R.) किंवा जवाब
    • अंपगत्‍व आल्‍यास टक्‍केवारी प्रमाणपञ
    • बॅंक पासबुक प्रत
    • लाभारर्थ्‍याचे स्‍टॅम्‍प पेपरवर प्रतिज्ञापञ
    • सातबारा उतारा
    • मृत्‍यु प्रमाणपञ
    • तलाठी प्रमाणपञ
    • पोलिस मरणोत्‍तर पंचनामा


    विम्‍यापासुन मिळणारे आर्थिक लाभ
    • अपघाती मृत्‍यु                                      -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे   -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे       -  रू २,००,०००/-
    • अपघाता मुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे   -  रू १,००,०००/-


    अर्ज सादर कुठे करावा
    सदर योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्‍हा / तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे आवश्‍यक कागद पञांस‍हीत दावा अर्ज दाखल करा.

     अधिक माहितीसाठी ...www.krishi.maharashtra.gov.in
    व ओरी एन्टल इन्शुरन्स कंपनी ली पुणे   1800 118 485/02026450382

    १७ फेब्रुवारी, २०१८

    INCOME TAX FILE 2017-2018

    आपले इन्कम TAX आपणच भरा..

    प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 







    *Softwareनिर्मिती*
    श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि.बुलढाणा

    *संकलन व प्रसिध्‍दी* 
    कामराज चौधरी तलाठी पुसद

    १६ जानेवारी, २०१८

    Date setting software..

    आपल्यातील बऱ्याच तलाठी बंधू/भगिनींना नमुना ९ ची नोटीस बजावल्याची तारीख भरत असताना बऱ्याच वेळा “सदर माहितीचे स्वरूप चुकीचे आहे  अशा आशयाची एरर येते.
          सदरची एरर ही आपल्या Desktop/Laptopदिनांकाची सेटिंग चुकीची असल्यामुळे येते.
    यासाठी आपण सेटिंग बदलण्याचा प्रयत्नही करतो, परंतु बऱ्याच Desktop/Laptop मध्ये सेटिंग व्यवस्तीत करूनही सदरची एरर येते.
    हा होणारा त्रास वाचवण्‍यासाठी DateSetting Software हे सर्वांकरिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदरDateSetting Software खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्‍या व Desktop/Laptop वर रन करा.

    इतके केल्यावर चुकीच्या दिनांकाबाबत च्या एरर येणार नाहीत.
                    For Windows 7 & 8 all version
      

    Windows 10 all version


    सौजन्य
    इकबाल मुलांनी कोरेगाव