• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २१ फेब्रुवारी, २०२२

    Income Tax Software 2021-2022

     सन 2021-22 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी-२०२२ महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही  आयकर कर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी-२०२२ च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे .त्याकरिता आयकर चे दोन भाग करण्यात आलेले आहे.

    जुन्या स्लॅप इन्कमटॅक्स आणि  नवीन स्लॅप ( Inome Tax Calculation u/s 115BAC ) इन्कमटॅक्स त्यानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता एकत्रीत अशी माहिती एकाच EXL.FILE मध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल.

    Income Tax Software GPF



    निर्मिती
    श्री सुधाकर गिरे तलाठी खामगाव जिल्हा बुलढाणा

    संकलन व प्रसिद्धी 
    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ



    ३१ जानेवारी, २०२२

    🌎 One Click Software 🌏

    Dsc लॉगिन करिता आवश्‍यक Windows Update झाल्यावर होणारा प्रॉब्लेम किंवा Format केल्याच्या नंतर Explorer & Microsoft Edge

    🌍 Internet Option Enable करावे लागतात वरील  Security Setting Enable कराव्‍या लागतात त्‍यास आपला बराच वेळ जातो व काही Settings करावयाच्‍या राहील्‍यास Login होत नाही व परत वारंवार Settings कराव्‍या लागतात. हा होणारा त्रास वाचवण्‍यासाठी ActiveX Controls (Internet Explorer) New Updated-2022 हे  सर्वांकरिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदर Setting Software' One Click  व Raptop वर Run करा. ActiveX Controls (Internet Explorer) च्‍या सर्व Settings सेकंदात करा....🙏🙏

    तलाठी:- ज्योती इंदल गुसिंगे
    Arjitsingal@gmail.com
    Youtube Channel 🎥
    https://youtube.com/channel/UCbVfiI658_VbzuBk8CO_dyg
    https://www.youtube.com/watch?v=51fN45MEAxo 
    https://www.youtube.com/watch?v=H9poaxnvy5A
    खालिल लिंक वरुन डाऊनलोड करा👇


    संकलन व प्रसिद्धी
    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

    २७ जानेवारी, २०२२

    गाव नमुना 8ब,8ड ब,10 तेरीज file..


    तलाठी यांनी सेवेत आल्यावर त्यांनी कोणते कार्य करावे कोणती नमुने दप्तरी असावे तलाठी यांचे कार्य व कर्तव्ये हे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमात दिले आहे आणी त्या नुसार तलाठी हे करतही असतात .. बदलत्या काळानुसार यात बदल होत आहेत .. तलाठी दप्तरात काही नमुने ऑनलाईन सुद्धा झालेले आहे . त्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तलाठी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील वसुली साठी आवश्यक गाव नमुना 8 ब हा सहज व सोप्या पद्धतीने एक्सल शीट कसा तयार करावा या बाबत व्हिडिओ व एक्सल file  (8 ब )8 ड)10 तेरीज ( 1 ची तेरीज ) ऑटोमॅटिक तलाठी:-ज्योती इंदल गुसिंगे रा. जि.जालना ता.अंबड गांव. निहालसिंगवाडी ता. अमळनेर जि. जळगांव 

    यांनी सर्वांन साठी उपलब्ध करून दिले आहे. 

    खालील प्रमाणे त्यात बदल करून काम करू शकतो

     अ.क्र. सुचना करावयाची कार्यपध्दती

    गावाचे नाव बदलवणे गावाचे नाव शिट वर वर्ष व गावाचे नाव बदलवणे

    तेरीज १ तेरीज १ ले पान या शिट गोषवारा वर कोणतेही काम करु नये.

    खातेदाराचे नाव गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील नावे कॉपी करुन पेस्ट करावी

    एकूण क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील एकुण क्षेत्र कॉपी करुन पेस्ट करावी

    मागील थकबाकी मागील वर्षी ८ ब मधे ज्या खातेदार यांचे खात्यावर जी थकबाकी असेल ती रक्कम नमुद करावी

    आकारणी गावाचे कृषीक (शेतीचे) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी

    आकारणी गावाचे अकृषीक ( बिनशेती ) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी

    पावती नं.                या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावती क्रमा

    पावती दिनांक या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीचा दिनांक टाकावा

    १० एकूण वसुली या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीची एकुण रक्कम टाका

    ११ संपर्क याबाबत कुठलीही अडचण असल्यास खालिल मेल वर संपर्क करावा.             Arjitsingal@gmail.com


    8ब,8ड,10 ची तेरीज एक्सल file

     
                                                                             8 ब प्रींट करणे बाबत



    संकलन

    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ





    २४ डिसेंबर, २०२१

    अनधिकृत अकृषक वापर आकारणी अहवाल

     महाराष्ट्र जमीन महसूल 1966 कलाम 45 अंतर्गत तलाठी यांचे साज्यात असलेल्या गावांमध्ये जर कोणी जमिनीचा वापर हा अनधिकृत अकृषक, वाणिज्य किव्हा औद्योगिक कामा साठी केलेला असेल तर तलाठी यांना तसा वापरात बदल केल्या बाबत मा तहसीलदार यांना अहवाल सादर करावा लागतो.अहवाल सादर करते वेळी त्या वापरात बदला साठी आकारणी करावी लागते तसेच त्या वरील उपकर व दंडाचीही आकारणी करावी लागते ती आकारणी करून अहवाल सादर करण्यासाठी तलाठी श्री राजू मेरड जिल्हा अहमदनगर यांनी खूप सोप्या स्वरूपात एक्सल फाईल तयार केली आहे त्या फाईल मध्ये केवळ डेटा एन्ट्री त काम करावे लागेल आपला अहवाल हा तयार होईल.

    अनधिकृत अकृषक वापर फाईल



     
    निर्मिती 
    श्री राजू मेरड तलाठी जिल्हा अहमदनगर
    प्रसिद्धी
    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ


    १२ डिसेंबर, २०२१

    गाव नमुना 1 विषयी सविस्तर माहिती

    महसूल विभागातील अभ्यासक मा  डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारीयांचे महसूल गुरू you tube चॅनेल वरील गाव नमुना 1 विषयी सविस्तर माहिती या विडिओ ची लिंक पुढे दिली आहे त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता व आपल्या मनातील सर्व शंकांचे समाधान करू शकता


    https://youtu.be/_R6_GC0Ow-U

    गाव नमुना 1 चे उपप्रकारांची सविस्तर माहिती



    संकलन 

    कामराज चौधरी 

    तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

    🟢🟣🟠🔴🟢🟣🟠🔴🟢🟣🟠🔴

    ६ डिसेंबर, २०२१

    गांव नमुने 1 ते 21 परिचय

    महसूल विभागातील अभ्यासक मा.डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांचे महसूल गुरू Youtube चॅनेल वरील गांव नमुने 1 ते 21 परिचय या व्हिडीओ ची लिंक पुढे दिली आहे. त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

    (सर्व अधिकार व कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त)

     गांव नमुने 1 ते 21 परिचय

    https://youtu.be/GoIMX9DqSSI



    ५ डिसेंबर, २०२१

    महत्वाचे विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे

    महसूल विभागातील अभ्यासक मा  डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारीयांचे महसूल गुरू you tube चॅनेल वरील महत्वाचे विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे या विडिओ ची लिंक पुढे दिली आहे त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता व आपल्या मनातील सर्व शंकांचे समाधान करू शकता 


    महत्वाचे विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे


    २ डिसेंबर, २०२१

    नियंत्रीत सत्ता प्रकार भोगवटार वर्ग २ जमीनी भोगवटदार वर्ग १ करण्याच्या तरतुदी

     शासनाचे विविध निर्णया नुसार खालील नमुद बाबींन नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार असलेल्या भोगवटदार वर्ग २ जमीनी  खालील ३ प्रकारा नुसार भोगवटदार वर्ग १ करता येईल. त्यांच्या पध्दती खालील प्रमाणे .

    1.      विदर्भातील भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीत करणे

    ·         महाराष्ट्र शासनाने सन 2018 साली विदर्भातील भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीत करणे तसेच  ज्या व्यक्तींना मध्य प्रदेश भु संहिता  १९५४ अर्तंगत अधिक धान्य पिकवा योजने अर्तंगत किंवा इतर योजने अर्तंगत वाटप केलेल्या जमीनी  ज्या महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ अस्तीतवात येण्या आधी वाटप केलेल्या जमीनी बाबत दि ०७/६/२०१८ रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णय क्रमांक  :-जमीन-२०१८/प्र.क्र.३५/ज-१ नुसार वर्ग १ करणे बाबत कार्य पध्दती.

    ·         १ ) विदर्भातील भुमीधारी आणी हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग २ जमीनी ज्या मध्य प्रदेश भु संहिता  १९५४ अर्तंगत वाटप केल्याचा पट्टा  किंवा आदेश

    ·         २) हक्क नोंदणी .......

    इत्याइी कागदपत्रा सह मा  तहसिलदार यांचे कडे अर्ज सादर करावा

    शासन निर्णय क्रमांक:-जमीन-२०१८/प्र.क्र.३५/ज-१ दिनांक ०७/०६/२०१८

    भुमीस्वामी धारणधीकार जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीतकरणे बाबत मा तहसिलदार यांचा आदेश


    2.      महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप केलेल्या भाडे पट्टाने वाटप केलेल्या जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे नियम २०१९

    ·         महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप केलेल्या भाडे पट्टाने वाटप केलेल्या जमीनी ज्या कृषक/अकृषक /वाणीज्य वापरात  प्रदान केलेल्या जमीनी  हृया त्याचे अधिमुल्याचे किंमती भरुन भोगवटदार वर्ग १ करणे बाबत तरतुद  शासनाचे  निणर्य क्रमांक जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१  दि ०८/०३/२०१९ नुसार नमुद केले आहे.

    ·         ( टिप :- यात केवळ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मध्ये वाटप केलेल्या जमीनीच अर्तंभुत आहेत सिलींग, कुळ, भुदान वाटप जमीनी यात येणार नाही.)

    वरील पदधतीने आपन आपली भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार वर्ग १ करु शकाल

    शासनाचे  निणर्य क्रमांक जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१  दि ०८/०३/२०१९

    3.      कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार (भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार वर्ग १ करणे बाबत.)

    ·         मुबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ मध्ये,हैद्राबाद कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९५९ कलम ५०ब मध्ये व मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग )अधिनियम १९५८ कलम ५७ मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र दि ०७/०२/२०१४ नुसार विक्री साठी पुर्व परवानगी घेण्याची तरतुद मध्ये सुधारणा करण्यात आले आहे.

    ·         उक्त सुधारणेच्या अनुषंगाने संबंधित कुळ कायद्यानुसार प्राप्त जमीनीस, कुळहक्क मान्य होवुन कुळांची खरेदी केलेल्या आहेत अशा जमीनीच्या दिनांकापासुन १० वर्ष पुर्ण झालेल्या जमीनींची खरेदी,विक्री,अदलाबदल,गहाण ठेवणे,पट्टयाने देणे,७/१२ उताऱ्यावरील नियंत्रीत सत्ता प्रकार आसलेल्या नोंदी सुधारीत करणे हया या सुधारीत तरतुदी नुसार करणे आवश्यक आहे.

    ·         त्या नुसार मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ मध्ये,हैद्राबाद कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९५९ कलम ५०ब मध्ये व मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग )अधिनियम १९५८ कलम ५७ मध्ये शासन निर्णय क्रमांक:-टिएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ नुसार कुळ कायद्यानुसार प्राप्त जमीनीस १० वर्ष पुर्ण झालेल्या जमीनी विक्री न करता विक्रीपुर्वीच एक कायम स्वरुपी सोय म्हणुन जमीन महसुलाच्या आकारणीच्या ४० पट इतकी रक्कम शासन जमा करुन मा तहसिलदार यांचे कडुन  /१२ उताऱ्यावरील नियंत्रीत सत्ता प्रकार आसलेल्या नोंदी सुधारीत करता येतील ((कुळाने प्राप्त भेागवटदार वर्ग २ जमीन भेागवटदार वर्ग १ करता येईल).

    कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३  सुधारणे  बाबत शासन निर्णय क्रमांक:-टिएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४

    कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३  सुधारणे  बाबत मा.डॉ संजय कुंडेटकर सर यांचा विस्तुत लेख.


                                                            लेखन ,निर्मीती व प्रसिध्दी

                                                                    कामराज ब चौधरी 

                                                                    तलाठी पुसद खंड १

    ckamraj@outlook.com/ www.talathinmaharashtra.in/https://www.facebook.com/talathiinmaharashtra

     

     


    १० नोव्हेंबर, २०२१

    महसूल गुरु

    महसूल विभागातील आपल्या प्रदीर्घ सेवेतील अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग सर्व अधिकारी , कर्मचारी,शेतकरी व नागरिकांना व्हावा या साठी महसूल अभ्यासक श्री संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी त्यांचे you tube चॅनल सुरू केले आहे त्यातील सर्व विडिओ सर्वांन सोबत राहावे या साठी या महसूल गुरू विभागाची सुरुवात होत आहे .

    महसूल गुरू youtube चॅनेल