• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    ४ ऑगस्ट, २०१६

    मोजणी अभिलेख

                          महसुल विभागातील जमिनी संदर्भातील महत्‍वाचे अभिलेख तयार करणे,जमिनीची मोजनी करणे ई.अनेक प्रकारचे कामे भुमीअभिलेख विभाग करित असतो , तलाठी यांचा वारंवार संबंध भुमीअभिलेखाशी येत असतो.त्‍यामुळेच जमीनीच या मोजणीशी संबंधित  कोणते अभिलेख उपलब्ध असतात याची माहिती तलाठी संंवर्गाला व्‍हावी या दुष्‍टीकोणतुन डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा यांनी  ' मोजणी अभिलेख' हा लेख लिहीला  आहे.
    ठळक बाबी.

    1. टिपण बुकः कच्‍चे टिपण / पक्‍के टिपण 
    2. शेतवार पत्रक
    3. कच्‍चा सुड 
    4. प्रतिबुक 
    5. वसलेवार बुक
    6. वाजिब उल अर्ज 
    7. निस्‍तार पत्रक 
    8. आकारबंंद 
    ईत्‍यादी सर्व बाबींची माहीती लेख PDF स्‍वरुपात प्राप्‍त करण्‍यासाठी खालि‍ल लिंक चा उपयोग करा.

    लेखः- डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा
    संकलनः- कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ 



    २ ऑगस्ट, २०१६

    बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार जमिनीची वर्गवारी

    महसुल विभागात काम करत असतांना मुख्‍यताः आपला संबंध हा जमिनी किंवा शेतजमिनींशी येत असतो.त्‍याामुळे महसुल व वन जमिनीची वर्गवारी आपनास माहीती असणे गरजेचेे ठरते म्‍हणुनच त्‍या बाबत सर्व महसुल मधिल कार्य कारणा-या सर्वांंना याची माहीती व्‍हावी या करिता बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार जमिनीची वर्गवारी यावर छोटासा लेख सादर करित आहो.

    1) सेंट्रल प्रोव्‍हीनसेस अॅंड बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल भाग-1  
    नुसार वन जमिनीची वर्गवारी.
    ( भाग 3, प्रकरण -9 )

    2) बेरार जमिन महसुल संहिता भाग-1  प्रकरण 5 
    नुसार महसुल खात्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनात असलेल्‍या जमिनीची वर्गवारी

    या माहीती चा  फायदा नक्‍कीच  सर्व  महसुल 
    मध्‍ये  काम करणा-या बंधु भगीनींना होईल. वरिल फाईल PDF स्‍वरुपात मिळवीण्‍यासाठी.


    लेखः- कामराज बसवन्‍ना चौधरी
    तलाठी-पुसद जि.यवतमाळ
    9011797779 ckamraj@outlook.com
    www.talathiinmaharashtra.in


    २४ जुलै, २०१६

    गौण खनिज विषयक तरतुदी

       
    महसुल विभागात कार्य करतांना अधिकारी व कर्मचारी वर्गांना विवीध प्रकारची कामे करावी लागतात. त्‍यातील ब-याच कामांबद्दल पुरेशी कायद्यासह माहीती वेळेवर उपलब्ध होत नाही.म्‍हणुन आपले हातुन केवळ माहीती अभावी काही किरकोळ चुका होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.अश्‍याच महत्‍वाच्‍या कामांपैकी  एक म्‍हणजे 'गौण खनिज' .गौण खनिज यातुन आपल्‍या महसुल विभागास बराच महसुल गोळा करता येतो.म्‍हणुनच 'गौण खनिज' विषयक महत्‍वाच्‍या तरतुदी,नियम,अधिनियम व वेळोवेळी  झालेलेे नविन बदल या विषयी संपुर्ण माहीती डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी यांनी त्‍यांंचे गौण खनिज या लेखात दिली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय लातुर,येथे गौण खनिज विभागातील प्रधीर्ग काळाच्‍या अनुभवातुन श्री.पी.डी.पेंडकर,अव्‍वल कारकुन उपविभागीय कार्यालय,लातुर यांनी संंकलीत केलेली  गौण खनिज विषयक माहीती PPT स्‍वरुपात तयार केली आहे.
             वरिल 'गौण खनिज' विषयक दोन्‍ही लेख PDF  स्‍वरुपात मिळविण्‍यासाठी खालील लिंक वर click करा.



    १८ जुलै, २०१६

    पिक पाहणी व वहिवाट प्रकरणे

                                              1 ऑगष्‍ट पासुन महसुली वर्ष सुरु झाल्‍यावर तलाठी यांना म.ज.म.अधि 1966 खंड 4 प्रमाणे नेमुन दिलेेल्‍या वेेळापत्रका प्रमाणे कामे करणे अपेक्षीत आहे. परंतु आज तलाठी संवर्गाला याआपल्‍या मुळ कामांसाठी त्‍यांचेवर असलेल्‍या अनेक गैरमहसुली कामांच्‍या अवाजवी जबाबदारी मुळे मुळ तलाठी महसुली कामे वेळेवर करणे शक्‍य नाही.व त्‍या गैरमहसुली कामांच्‍या व्‍यापामुळे मुळ महसुली माहेवारी कामांबद्दल जाणुन घेणे किंवा त्‍याची माहीती घेणे शक्‍य होत नाही.त्‍यामुळेच डॉ.संजय कुंडेटकर ,सर उपजिल्‍हाधिकारी,यांनी तलाठी यांना त्‍यांचे कामामध्‍ये मदती सााठी अनेकलेख लिहीले आहे. त्‍यापैकीच एक लेख  आज प्रकाशित करीत आहो. 'पिक पाहणी व वहीवाट प्रकरणे ' सदर लेखातील ठळक बाबी.
    1. जमिन कसणे म्‍हणजे काय ?
    2. वहीवाट रित.
    3. पिकपाहणी कायदेशिर तरतुद.
    4. कार्यवाही.
    5. पिक पााहणीतील संभाव्‍य चुका
    6. वहीवाट प्रकरणे.     वरिल सर्व माहीती साठी खालील दुव्‍यावर जा.

    १ जुलै, २०१६

    *गोष्टीरुपी एकशेएक फेरफार फ्लिप बुक*

                                                   
                      डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "महाराष्ट्रातीलतलाठी"www.talathiinmaharashtra.in)या संकेत स्थळा साठी सर्व प्रथम "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे.महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवणे साठी सदर पुस्तकाची फ्लीप बुक स्वरुपातील प्रत प्रकाशित करीत आहो. खाली दिलेल्या लिंक वरुन पुस्तक संगणकावर डाऊनलोड करुन त्यास पासवर्ड १२३४५ देवुन साध्या पुस्तकाप्रमाणे संगणकावर वाचता येईल.

    २७ जून, २०१६

    महसुल अहर्ता परिक्षा (RQT) नियम,अभ्यासक्रम व नमुना प्रश्न पत्रीका.

                         तलाठी संवर्गातुन मंडळअधिकारी व कनिष्ठ लिपीक संवर्गातुन अव्वल कारकुन पदोन्नती साठी आवश्यक असणारी सर्वात महत्वाची परिक्षा म्हणजे "महसुल अहर्ता परिक्षा".या परिक्षेसंदर्भातील सर्वअटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे. तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्न पत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व महसुल मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ७ देण्यात येत आहे.महसुल अहर्ता परीक्षा (RQT)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित. 
    . 

    * संकलन:-*
    १) गजानन वि.कुरणे, लिपीक भुसंपादन ११ 
    जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापुर 
    २) शशिकांत सानप, तलाठी पळस्पे
       ता.पनवेल.जि.रायगड

    संकलन 
    आशिष पैठणकर अव्वल कारकून 
    विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद 

    :-Created By.!:-
    Kamraj Chaudhari Talathi Pusad.
    dist yavatmal 9011797779
    www.talathiinmaharashtra.in

    ८ जून, २०१६

    *गोष्टीरुपी एकशेएक फेरफार *

                     
             तलाठी यांचे दैनिक कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे "फेरफार".
    महसुल खात्यामध्ये नव्याने रुजु झाल्यावर तलाठीयांना फेरफार नोंदी बाबत बराच संभ्रम असतो.नेहमीपेक्षा वेगळी फेरफार नोंद आली की काहींचा गोंधळ उडतो.कोणतीही घटना गोष्टीरुपात सांगितली तर ती बऱ्याच काळ लक्षात राहते. गोष्टीरुपी सांगितलेला फेरफार नोंदीचा ही असाच उपयोग होऊ शकतो याच कल्पनेतुन डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक  सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे..  महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवावे म्हणजे आपले दैनदिनफेरफाराचे काम अधिक सुलभ होईल.सदर पुस्तक PDFस्वरुपात मिळविण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.


    लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी 
           महाराष्ट्र शासन dcsanjayk@gmail.com

    संकलन:- कामराज ब चौधरी तलाठी-पुसद 
                 ता.पुसद जि.यवतमाळ ckamraj@outlook.com
    प्रकाशक:- www.talathiinmaharashtra.in
    ( महाराष्ट्रातील तलाठी यांचे कार्यासाठी उपयुक्त असे एकमेव संकेत स्थळ. )


    २३ मे, २०१६

    महत्वाचे शासन निर्णय (भाग १)

    📄महत्वाचे शासन निर्णय (भाग १)✍🏻
    ☄महसुल विभागातील  सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे “तलाठी”. गाव पातळीवर काम करत असतांना अनेक वेळा वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त निर्देशा नुसार.विवीध प्रकारचे पंचनामे व स्थनिक चौकशी करावी लागते.बरेच वेळी सदर चौकशी ,पंचनामे करतांना संदर्भा करीता शासन निर्णयाची आवश्यकता भासते...त्याच करीता  श्री.शशिकांत सानप. तलाठी. ता. पनवेल यांनी संकलीत केलेल्या महत्वाच्या शासन निर्णयाचा भाग १
    “महाराष्ट्रातील तलाठी”  ह्या संकेत स्थळावर प्रकाशित होत आहे.
    धन्यवाद.....!


    🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
    संकलन- शशिकांत सानप.तलाठी पळस्पे ता. पनवेल.जि.रायगड
    Created By.
    Kamraj Chaudhari Talathi Pusad.dist yavatmal 9011797779
    www.talathiinmaharashtra.in


    १८ मे, २०१६

    विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम व नमुना प्रश्न पत्रीका.

                                                           महाराष्ट्रातील सर्व तलाठी यांचे साठी अत्यंत महत्वाची सेवांतर्गत परिक्षा म्हणजे " विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)"या परिक्षेसंदर्भातील सर्व अटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे.तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्नपत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व तलाठी मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ४ देण्यात येत आहे. विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (SSD)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित. 


    ८ मे, २०१६

    ई-फेरफार Edit Module Usermannaul

                  ई-फेरफार प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी साठी शासनाने ई-फार प्रकल्पांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख ( गा.न.७/१२) तंतोतंत जुळविणे बाबत दि नांक ०७/०५/२०१६ रोजी परि पत्रक काठुन त्यानुसार कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे ह्या Edit Module चा उपयोग कसा कराव या बाबत user mannual दिले आहे ते Manual व मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचे ई-चावडी व ई-फेरफार संबंधी सर्व परिपत्रक प्राप्त करुन घेणे साठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा.